लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : सांगलीपासून आठ किलोमीटर अंतरावर कर्नाळ-नांद्रे परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला असून वन विभागाने खात्री करुन लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. नावरस वाडी मधील पोलीस पाटील यांनी शनिवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वन विभागाला फोन करून बिबट पाहिल्याचे कळवले.

Three-year-old boy trapped in gallery after window locked
बुलढाणा : आई बाहेर, चिमुकला गॅलरीत ‌‌अन् ‘फ्लॅट’चे दार ‘लॉक’…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू
Paver blocks in Matheran make it difficult for horses to walk
माथेरानमधील पेव्हर ब्लॉक अश्वांच्या जीवावर
yard remodeling trains
नागपूर : यार्ड रि-मॉडेलिंगसाठी दिल्ली मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द
delhi fog flights stuck
दिल्लीत धुक्याची चादर, दृश्यमानता शून्यावर, १०० विमानांचा खोळंबा

कर्नाळ नांद्रे रस्त्यावरील नवीन झालेल्या पुलाच्या जवळ दोन महिलांनी बिबट पाहिला आहे. माहिती मिळताच वन विभाग चे कर्मचारी व वनपाल तुषार भोरे हे जागेवर पोचले. जागेची पाहणी केली असता बिबट या वन्य प्राण्याच्या पाऊल खुणा दिसून आल्या. या परिसरात फिरती करताना बिबट्याचे दर्शन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना झाले. ३ ते ४ वर्ष वयाचा बिबट समक्ष पाहिल्याचे वन विभागाने पोलीस पाटील व इतरांना सांगितले . बिबट त्याच्या त्याच्या मार्गाने निघून जाई पर्यत वन विभाग थांबून होते.तो तिथून निघून गेल्या नंतर वन विभाग माघारी गेले.

आणखी वाचा-Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान; म्हणाले, “२८८ उमेदवार उभे…”

पण पुन्हा काही तासांनी बिबट तिथून काही अंतरावर नांद्रे येथील रहिवाशी शेटे यांनी गावाकडे जात असताना रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दिसून आला. त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना या बाबत माहिती दिली व त्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले. त्यांना पाहून बिबट उसात निघून गेला. गेली ३ वर्षे सदर परिसरात त्याचा वावर दिसून आलेची माहिती वन विभाग कडून देण्यात आली आहे. तो कर्नाळ मधील ओढ्याच्या कडेने फिरती करत असल्याचे बऱ्याच वेळेस आढळून आले आहे. हा ओढा भोसे, कवठे, शिरगाव, कर्नाळ, नावरस वाडी, डिग्रज हद्दीच्या गावातून वाहत कृष्णेला मिळतो.

ओढ्याच्या कडेने दाट झाडी आहे. वर्षभर ओढ्याला भरपूर पाणी असते. या कारणांनी बिबट बरेच दिवस याच भागात फिरती करताना दिसून आला आहे. त्याने आजुन कोणावर ही हल्ला केलेला नाही अथवा पाळीव जनावर पशू मारल्याची घटना निदर्शनास नाही आहे. परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

Story img Loader