गेल्या आठ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. या आठ दिवसांत अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह सत्तेतील नेत्यांनीही जरांगे पाटलांना आंदोलनासाठी बळ दिलं आहे. दरम्यान, आज सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांशी चर्चा करायला उपोषण स्थळी आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना जरांगे पाटलांनी खडेबोल सुनावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी काल (४ सप्टेंबर) मराठा समाजाच्या उपसमितीसोबत बैठक घेतली. या बैठकीवेळी अर्जुन खोतकर उपोषणस्थळी उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री मोठी घोषणा करतील, असं खोतकरांनी सांगितलं. परंतु, प्रत्यक्षात सरकारने आंदोलकांकडून एक महिन्याची मुदत मागितली. ही मुदत द्यायची की नाही हे मनोज जरांगे पाटलांच्या हातात आहे. दोन दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि नितेश राणेही जरांगे पाटलांची समजून काढायला गेले होते. परंतु, त्यांचीही चर्चा निष्फळ ठरली होती. दरम्यान, आज पुन्हा गिरीश महाजन उपोषणस्थळी पोहोचले असून जरांगे पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा >> “…तरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल”, संभाजी छत्रपतींनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मनोज जरांगे दरवर्षी…”

अर्जुन खोतकर, गिरीश महाजन यांची मनोज जरांगे पाटलांशी चर्चा सुरू असतानाच आंदोलनकर्त्यांनी उपोषणस्थळी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. घोषणाबाजी करू नका, असं बजावूनही कार्यकर्ते शांत बसले नाहीत. त्यामुळे चर्चेत व्यत्यय येत असल्याने मनोज जरांगे पाटील कार्यकर्त्यांवर संतापले.

“सरकारबरोबची चर्चा बंद करायची का?” असा संतप्त सवाल जरांगे पाटलांनी कार्यकर्त्यांना विचारला. “त्यांनी आरक्षण दिलं नाही, तरी ५० वेळा सांगितलं घोषणा देऊन देऊन उभ्या आयुष्याचं वाटोळं झालं. भानावर या ना आता तरी. ते चर्चेला आले आहेत. आपण चर्चा करू, आपल्याला नाही पटलं तर ते परत जातील. ठरवू ना काय करायचं. लगेच पाहिजे आरक्षण? मग मी कशाला बसलोय? लगेच पाहिजे म्हणूनच बसलोय ना”, अशा रागाच्या सुरात त्यांनी आंदोलकांना खडसावले.