माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. संबंधित ऑडिओ क्लीपमधील आवाज ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा दावा केला जात आहे. जितेंद्र आव्हाडांनी याबाबतचे आरोप केले असून कारवाईची मागणी केली आहे. कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या काही कार्यकर्त्यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली. या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे कारस्थान रचणाऱ्या व्यक्तीवर सक्त कारवाई झाली पाहीजे, अशी मागणी अजित पवारांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र

आव्हाडांच्या कुटुंबीयांना मिळालेल्या धमकीबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “ज्या अधिकाऱ्याचा कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे, त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे. ताबोडतोब कारवाई झाली पाहिजे. जितेंद्र आव्हाड, त्यांचं कुटुंब आणि राज्यातील प्रत्येक सामान्य नागरिकाला सुरक्षा पुरवणं, हे सरकारचं काम आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणं, हेही सरकारचं काम आहे.”

हेही वाचा- ठाणे : महेश आहेर यांचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध; आव्हाड यांचा गंभीर आरोप

“जर विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न काहीजण करत असतील आणि सरकार याकडे डोळेझाक करत असेल, तर महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. वास्तविक हे प्रकरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे. कारण तो परिसर स्वत: मुख्यमंत्र्यांचा म्हणून ओळखला जातो. तसेच उपमुख्यमंत्र्यांकडे पोलीस खातं आहे. कायदा व सुव्यवस्था राखणं, हे या दोघांचं काम आहे. संबंधित प्रकरणात कोण खरं बोलतंय? कोण याच्या पाठीमागे आहे? कुणी सुपारी दिली? या कटकारस्थानाचं कारण काय? हे सगळं शोधलं पाहिजे. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडांसह त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा दिली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.