सोलापूर : नेहरू युवा केंद्राच्या  कार्यालयात दारूच्या बाटल्या सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कार्यालयातील मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून नियुक्त असलेल्या एका व्यक्तीने या दारूच्या बाटल्या आणल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे नेहरू युवा केंद्र तरुणातील व्यसनधीनता संपवण्यासाठी व्यसनमुक्ती कार्यक्रम देखील चालवते. परंतु त्याच नेहरू युवा केंद्राच्या कार्यालयात दारूच्या बाटल्या आढळणे धक्कादायक असून संबधितावर कारवाई करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> एकीवर कौटुंबिक हिंसाचार, दुसरीचा जमिनीवरून वाद; दोघींनी एकत्र येऊन जे केलं त्याने गडचिरोलीत खळबळ

सुभाष चव्हाण नावाच्या व्यक्तीबाबत भाजपच्या काही कार्यकर्त्यांना तक्रारी केल्या होत्या. त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे आणि यतीराज होनमाने हे नेहरू युवा केंद्रात गेले होते. त्यावेळी कार्यालयात दारूचे रिकामे ग्लास आणि बाटल्या भाजप पदाधिकऱ्यांना आढळून आल्या. दरम्यान, कार्यालयात अशा पद्धतीने दारू बाटल्या आणून ठेवणे चुकीचे असून योग्य त्या कारवाईसाठी राज्य कार्यक्रम अधिकाऱ्यांना कळवू असे स्पष्टीकरण जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार यांनी दिले आहे.