|| शफी पठाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक

यवतमाळमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाची आयोजक संस्था आणि मराठी साहित्य महामंडळ यांच्यातील तीव्र मतभेदांची परिणती रविवारी संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात झाली.

साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच अशी नामुष्की ओढवल्याची प्रतिक्रिया साहित्यवर्तुळात व्यक्त होत आहे. निमंत्रण रद्द करण्यामागे राजकीय दबाव आहे की केवळ दोन संस्थांतील कथित मतभेद, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय या संस्थेकडे संमेलनाचे यजमानपद आहे.संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी नयनतारा सहगल यांना पत्र पाठवून उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण रद्द करीत असल्याचे कळवले आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखिकेला का बोलावले, असा आक्षेप नोंदवत काही स्थानिक संघटनांनी संमेलन उधळण्याचा इशारा दिल्याने आम्ही हे निमंत्रण रद्द करीत असल्याचे कारण त्यांनी या पत्रात दिले आहे. सहगल यांनी याबाबत जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर महामंडळ आणि आयोजक संस्थेवर चौफेर टीका सुरू होताच या नामुष्कीचे खापर या दोन्ही संस्था परस्परांच्या डोक्यावर फोडत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोजक संस्था आणि महामंडळात सुरुवातीपासूनच मतभेद होते. शिवाय आयोजकांतही दोन गट पडले. त्यातील दुखावलेल्या गटाने या संमेलनाला वादाचे गालबोट लागावे, म्हणून विरोधासाठी बाहेरच्या मंडळींना रसद पुरवली. त्यामुळे विरोधकांचा आवाज वाढला आणि दुखावलेल्या गटाचा अंत:स्थ हेतू साध्य झाला, अशी चर्चा आहे. दोन संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमधील टोकाची ईर्षां आणि हेव्यादाव्यांमुळे मायमराठीच्या उदार भूमिकेला गालबोट लागले आहे. हे नुकसान ही मंडळी कशी भरून काढतील, असा सवाल साहित्य क्षेत्रातून विचारला जात आहे.

महामंडळाच्या निर्देशानंतरच निर्णय

संमेलनात गोंधळ होऊ  नये, म्हणून नयनतारा सहगल यांच्या नावाचा फेरविचार करण्याची विनंती संमेलनाच्या आयोजन समितीने मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना केली. त्यांच्या निर्देशावरून सहगल यांना निमंत्रण रद्द केल्याचे कळवले आहे, असे मराठी साहित्य संमेलन आयोजन समितीचे सहसचिव पद्माकर मलकापुरे यांनी सांगितले.

राजकीय दबावाची शक्यता?

नयनतारा सहगल यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ पुरस्कार परत केले होते. त्यात साहित्य अकादमी पुरस्काराचाही समावेश होता; परंतु तो परत घेण्याची तरतूद नव्हती. सहगल पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कुटुंबाशी नाते सांगतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहगल यांनी सरकारविरोधात विधान केले तर मुख्यमंत्र्यांची पंचाईत होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन आयोजकांवर राजकीय दबाव आला असावा आणि त्यातूच त्यांनी सहगल यांचे निमंत्रण रद्द केले असावे, अशीही एक शंका व्यक्त होत आहे.

..तर संमेलनही रद्द करणार का?

न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक शाखेने इंग्रजी लेखिका असल्याच्या कारणावरून सहगल यांना विरोध केल्यानेच त्यांचे निमंत्रण रद्द केल्याचे आयोजक सांगत आहेत. विरोध हाच निकष असेल तर देवानंद पवार यांनी शेतकरी आत्महत्यांच्या मुद्दय़ावरून या संमेलनाच्या आयोजनावरही आक्षेप घेतला आहे. हा आक्षेप लक्षात घेऊन आयोजक हे संमेलनही रद्द करणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

महामंडळ निर्देश का देईल.. संमेलनात कोणालाही महामंडळ निमंत्रित करत नाही, ते काम आयोजक करतात. त्यामुळे त्यांच्या अडचणीमुळे असेल किंवा अन्य काही दबावांमुळे त्यांनी हा मार्ग निवडला असेल तर तो स्थानिक आयोजकांचा निर्णय आहे. महामंडळ तसे निर्देश देण्याचे कारणच नाही, असे अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी स्पष्ट केले.

माझे भाषण मुख्यमंत्र्यांना आवडले नसावे – सहगल

संमेलनाच्या आयोजकांचे पत्र वाचून मला धक्काच बसला. या संमेलनात उद्घाटक म्हणून माझे भाषण मी आयोजकांना पाठवले होते. माझी भूमिका आयोजकांपर्यंत पोहोचली होती. या संमेलनाला राज्याचे मुख्यमंत्रीही येणार आहेत हे मला खरेच माहिती नव्हते. कदाचित मुख्यमंत्र्यांना माझे भाषण आवडले नसेल म्हणून आयोजकांनी माझे निमंत्रण ऐन वेळी रद्द केले असावे, अशी प्रतिक्रिया नयनतारा सहगल यांनी व्यक्त केली आहे.