PM Modi Nagpur Visit Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी नागपूर दौऱ्यावर असून, नागपूरमध्ये त्यांचे आगमन झाले आहे. या दरम्यान, पंतप्रधान मोदी रेशम बाग येथील संघाच्या मुख्यालयाला भेट देतील आणि संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या समाधीस्थळावर दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून संवैधानिक पदे भूषवत असताना नरेंद्र मोदी संघाच्या मुख्यालयाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असेल.

Live Updates

PM Modi to visit RSS founder's memorial in Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. याबाबतच्या लाईव्ह अपडेट्स जाणून घेऊया.

14:18 (IST) 30 Mar 2025

पंतप्रधान मोदी म्हणाले, “परकीय आक्रमनानंतरही भक्ती आंदोलन आणि संघाच्या आदर्शांनी संस्कृती रक्षण केले”

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपूर दौऱ्यावर होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी स्थापनेपासून संघाने देश आणि समाजाच्या रक्षणाचे कसे कार्य केले. भारतीय संस्कृती कशी टीकवली यावर मार्गदर्शन केले.

सविस्तर वाचा....

14:18 (IST) 30 Mar 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दीक्षाभूमीबाबत मोठे विधान; म्हणाले, गरीब, वंचित, शोषितांसाठी….

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपुरात आले. नागपूर विमानतळावर सकाळी ८:३० आगमन झाल्यावर मोदी थेट रेशिमबाग येथील संघ स्मृती मंदिर परिसरात गेले. यानंतर मोदी दीक्षाभूमीमध्ये गेले. दीक्षाभूमीमध्ये मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे दर्शन केले. भगवान गौतम बुद्ध यांना मोदी यांनी नमन केले.

सविस्तर वाचा....

13:07 (IST) 30 Mar 2025

पंतप्रधान मोदी म्हणाले, “परकीय आक्रमनानंतरही भक्ती आंदोलन आणि संघाच्या आदर्शांनी संस्कृती रक्षण केले”

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपूर दौऱ्यावर होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी स्थापनेपासून संघाने देश आणि समाजाच्या रक्षणाचे कसे कार्य केले. भारतीय संस्कृती कशी टीकवली यावर मार्गदर्शन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतावर शेकडो वर्ष परकीय आक्रमन झाले. अनेक क्रुर आक्रमकांनी आमच्या देशाची सभ्यता आणि संस्कृतीला धक्का लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतीयत्वाची मूळ जाणीव कधीच कुणी संपवू शकला नाही. भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आणि त्याची ज्वाला कायम तेवत ठेवण्यासाठी देशात अनेक चळवळींनी काम केले. त्यात भक्ती आंदोलनाचा मोठा वाटा आहे. आमच्या देशातील अनेक थोर संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रीच विचारांची भावना कायम जिवंत ठेवण्याचे काम केले. समाजामध्ये असलेली दुरी संपवून सर्वांना एका सूत्रांमध्ये बांधण्याचे काम भक्ती आंदोलनाने केले.

12:08 (IST) 30 Mar 2025

पंतप्रधान मोदी यांच्याकडून माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर इमारतीचे भूमिपूजन

नागपूरमधील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर आणि दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर इमारतीचे भूमिपूजन केले. ही इमारत २०१४ मध्ये स्थापन झालेल्या नागपूरमधील एक प्रमुख नेत्ररोग सेवेचा विस्तार आहे. ही संस्था आरएसएसचे दुसरे सरसंघचालक एम एस गोळवलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन करण्यात आली होती. या प्रकल्पात २५० खाटांचे रुग्णालय प्रस्तावित आहे, ज्यामध्ये १४ बाह्यरुग्ण विभाग आणि मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर असतील, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

11:27 (IST) 30 Mar 2025

"संघ आणि भारतीय जनता पक्षात कोणतेही मतभेद नाहीत"

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रविवारी म्हटले आहे की, "संघ आणि भारतीय जनता पक्षात कोणतेही मतभेद नाहीत". पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूर येथील आरएसएस मुख्यालयाला भेट दिल्यानंतर हे विधान करण्यात आले.

10:56 (IST) 30 Mar 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीत, बाबासाहेबांना अभिवादन…

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपुरात आले. नागपूर विमानतळावर सकाळी ८:३० आगमन झाल्यावर मोदी थेट रेशिमबाग येथील संघ स्मृती मंदिर परिसरात गेले. यानंतर मोदी दीक्षाभूमीमध्ये गेले. दीक्षाभूमीमध्ये मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे दर्शन केले. भगवान गौतम बुद्ध यांना मोदी यांनी नमन केले.

वाचा सविस्तर...

10:55 (IST) 30 Mar 2025

संघ भेटीनंतर मोदींचा विशेष संदेश; म्हणाले, “राष्ट्रवाद…”

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपुरात आले. नागपूर विमानतळावर सकाळी ८:३० आगमन झाल्यावर मोदी थेट रेशिमबाग येथील संघ स्मृती मंदिर परिसरात गेले. यावेळी त्यांनी डायरीत संदेश लिहिला. त्यांच्या ११ वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच रेशीमबाग येथील संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली.

वाचा सविस्तर...

10:44 (IST) 30 Mar 2025

संघ भेटीनंतर मोदींचा विशेष संदेश; म्हणाले, “राष्ट्रवाद…”

"हेडगेवारजी आणि पूज्य गुरूजी यांना कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या स्मृतींना जपणाऱ्या या स्मृती मंदिरात येऊन मी भारावून गेलो आहे. भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटन क्षमतांच्या मूल्यांना समर्पित ही जागा राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. संघाच्या या दोन महान स्तंभांची आठवण देणारी ही जागा देशसेवेसाठी समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जा केंद्र आहे", असे पंतप्रधान मोदी यांनी अभिप्राय वहीत म्हटले आहे.

10:17 (IST) 30 Mar 2025

पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात मोदी पहिल्यांदाच रेशीमबागेत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपुरात आले. नागपूर विमानतळावर सकाळी ८:३० आगमन झाल्यावर मोदी थेट रेशिमबाग येथील संघ स्मृती मंदिर परिसरात गेले. त्यांच्या ११ वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच रेशीमबाग येथील संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली.

09:42 (IST) 30 Mar 2025

केशव बळीराम हेडगेवार यांना पंतप्रधानांकडून पुष्पांजली

नागपूरमधील आरएसएसच्या स्मृती मंदिरात पंडित नरेंद्र मोदी यांनी आरएसएस संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना पुष्पांजली वाहिली.

09:34 (IST) 30 Mar 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीवर दाखल

पंतप्रधान सकाळी ९:३० वाजता दीक्षाभूमीवर दाखल झाले असून, यावेळी त्यांनी मध्यवर्ती स्तूपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींना पुष्पांजली अर्पण केली.

09:08 (IST) 30 Mar 2025

PM Modi In Nagpur: पंतप्रधान मोदी नागपूरमध्ये दाखल, मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरींनी केलं स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नागपूरमध्ये आगमन झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचं स्वागत केलं

09:02 (IST) 30 Mar 2025

असा असेल पंतप्रधानांचा नागपूर दौरा

या नागपूर भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये अत्याधुनिक माधव नेत्रालयाच्या भूमीपुजनाचाही समावेश आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रेशीमबाग येथील स्मृती मंदिरालाही भेट देणार आहेत. यावेळी ते दीक्षाभूमीलाही भेट देतील.