2024 Lok Sabha Election Updates, 10 May 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. प्रचारात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शरद पवार यांनी महाराष्ट्रात ३० ते ३५ जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा दावा केला होता. यावर आता भाजपाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. तसेच ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर हैं’ असं लिहिलेलं असतं, असं विधान केल्यामुळे राजकारण तापलं आहे. याबरोबरच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सांयकाळी जाहीर सभा होणार आहे. तसेच महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबारमध्ये आज सभा पार पडणार आहे. तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल आज पुणे सत्र न्यायालयाकडून दिला जाण्याची शक्यता आहे. यासह इतर अनेक घडामोडी वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करा.
Marathi News Today, 10 May 2024
भारतीय जनता पार्टीने खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने दिले आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा प्रचारावर परिणाम झाला. रॅलीवर पाणी फेरले. दरम्यान, पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
पुणे : शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दहा ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. झाडांच्या फांद्या रस्त्यात पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस मोकळे करून दिले.
बुलढाणा: अपघातामुळे वादग्रस्त ठरलेल्या समृद्धी महामार्गावर आता गुन्हेगारी कृत्याचा धोका वाढला आहे. आज शुक्रवारी पहाटे चार प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील रोकड, वस्तू, दागिने असा ऐवज लुटण्यात आला. हृषिकेश शिवाजी दुरगुळे (रा. तेरखेडा, ता. वाशी, जिल्हा धाराशिव) हे आपल्या नातेवाईकांसह समृद्धीवरून प्रवास करीत होते. आराम करण्यासाठी त्यांनी वाहन एका पेट्रोल पंपाजवळ लावले. आराम करीत असताना पहाटे ३ वाजता तिघा जणांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून रोकड, ३ लॅपटॉप असा १ लाख ६५ हजारचा ऐवज हिसकावून नेला.
पुणे शहर आणि परिसरात आज संध्याकाळी ५ च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वाऱ्यासह आलेल्या या अवकाळी पावसामुळे पुणे शहरात १० ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. त्यामुळे काही वाहनांचे नुकसान झाले. पावसामुळे शहरातील विविध भागात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
सदर कंपनीतील गोडाऊन ला आग लागल्याचे प्राथमिक माहिती आहे. या गोडाउन मध्ये केमिकल ड्रम मोठ्या प्रमाणात ठेवले असल्याने अगीचा मोठा भडका झाला. MIDC फायर ब्रिगेड जवळच सदर आगीची घटना घडली आहे.
या ठिकाणी टाटा स्टीलची फायर ब्रिगेड, खोपोली नगरपालिकेची फायर ब्रिगेड, मंगलम कंपनी, पनवेल महानगर पालिका फायर ब्रिगेड, सह पातळगंगा फायर ब्रिगेड टिम व स्थानिक पोलीस प्रशासन सह अपघात ग्रसतांच्या मदतीसाठी ची टिम व स्थानिक मोठया प्रमाणात आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे.आता पर्यंत २ कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी मंगलम, अलाना, AM /NS इत्यादी कंपनीच्या फायर ब्रिगेडलारवाना केले आहे.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध आरक्षण असलेल्या १७ भूखंडाचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. भूखंडांच्या ई लिलावासाठी मागविण्यात आलेल्या निविदेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुकांना २५ मेपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत.
मालवणी, कांदिवली, टागोरनगर (विक्रोळी), कन्नमवारनगर (विक्रोळी), प्रतीक्षानगर आणि जोगेश्वरी येथील भूखंडांचा ई लिलावात समावेश आहे. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, मनोरंजन मैदान अशा विविध वापरासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. विविध क्षेत्रफळाचे हे भूखंड असून या भूखंडासाठी मुंबई मंडळाने एक बोली निश्चित केली आहे. प्रति चौरस मीटर ४५ हजार ३०० रुपयांपासून १ लाख ६ हजार १७० रुपये प्रति चौरस मीटर दराने बोली निश्चित करण्यात आली आहे. या बोलीपेक्षा सर्वाधिक बोली लावणारी निविदाकार संस्था, व्यक्तींना हे भूखंड वितरीत केले जाईल. ई लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना बोली रक्कमेच्या एक टक्के अनामत रक्कम अदा करावी लागणार आहे. मुंबई मंडळाला या भूखंड विक्रीतून किमान १२५ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे.
नागपूर: उपराजधानीतील एका ऑटोरिक्षा चालकाने बुधवारी एका शाळकरी विद्यार्थीनीशी अश्लिल चाळे केल्याची चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली. ही विकृती ठेचून काढण्यासाठी या ऑटोरिक्षा चालकावर कठोर कारवाई करा, अशी मागणी खुद्द विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनकडून केली गेली.
कराड: सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या खटल्याचा पुण्याच्या विशेष न्यायालयाने आज निकाल दिला आहे. त्या निकालावर आम्ही व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्ते व डॉ .नरेंद्र दाभोलकर यांचे समाजवादी युवक दलातील सहकारी अजिबात समाधानी नाही. सरकारी पक्षाने या निकालावर अपिलात जावे तसेच डॉ नरेंद्र दाभोलकर खुन प्रकरणाचा मास्टरमाईंड हा शोधावाच लागेल आणि त्याला शिक्षाही झालीच पाहिजे अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विजय मांडके यांनी केली आहे.
मांडके यांनी यासंदर्भातील प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की मुंबई उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली डॉ नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचा तपास केला जातो. डॉ दाभोलकर कुटुंबीयांना यात न्यायालयाचे दार ठोठवावे लागते. यातच तपास यंत्रणेचे अपयश आहे असे नाईलाजाने म्हणावेसे वाटते.
मतदानाच्या दोन दिवस अगोदर हा निर्णय घेऊन कोल्हे यांनी टीकाकारांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला आहे.
पनवेल : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आणि दुकानाची जाहिरात होण्यासाठी पनवेलमधील एका साडी विक्रेत्या व्यापाऱ्याने अनोखी शक्कल लढविली आहे. १३ मे रोजी मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्रात मतदान होणार आहे.
पुणे : पुणे लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यात चुरस निर्माण झाली असतानाच पुणे महापालिकेतील भाजपचे मात्र मूळचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ माजी नगरसेवक हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याने भाजपची त्यांना थोपविण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर रवींद्र वायकर यांना शिंदे गटाकडून लोकसभेची उमेदवारीही जाहीर झाली. पण आता शिवसेना ठाकरे गटाने रवींद्र वायकर यांना नोटीस बजावली असून तुम्हाला अपात्र का करु नये?, असा प्रश्न केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणामध्ये काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांना ई़डीकडून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुगांत आहेत. मात्र, आता त्यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.
तीन आरोपींंची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे निरीक्षण नोंदवून विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी तपास अधिकाऱ्यांना सुनावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारमध्ये भाजपाच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत शरद पवार यांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला. “लोकसभा निवडणुकीनंतर छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे शरद पवार म्हणत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे आमच्याबरोबर यावे. त्यांची सर्व स्वप्न पूर्ण होतील”, असा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांनी दिला होता. यावर आता शरद पवार यांनी आपली प्रत्युत्तर दिले आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नंदूरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली. या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र यांनी शरद पवार यांच्या प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या विधानावर भाष्य करत शरद पवार यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली.
पनवेल : अपंग आणि वयोवृद्ध अशा व्यक्तींच्या घरापर्यंत मतपेटी घेऊन जाऊन निवडणूक आयोगाचे पथक मतदान करुन घेतात. याच योजनेतून मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्रामधील ५२ व्यक्तींनी त्यांच्या घरुन मतदानाचा हक्क बजावला.
अकोला : कुतूहल लागून असलेला शून्य सावली दिवस विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये १५ ते २८ मे दरम्यान अनुभवता येणार आहे. सदैव साथ देणारी आपली सावली काही क्षणांसाठी साथ सोडणार आहे.
वर्धा : नॅशनल मेडिकल कमिशन अर्थात राष्ट्रीय वैद्यक आयोगाने २०२४ – २५ या शैक्षणिक सत्रासाठी घेतलेला निर्णय या क्षेत्रासाठी खुशखबर देणारा ठरला आहे. पदव्युत्तर शाखेतील नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी तसेच या शाखेतील जागा वाढविण्यासाठी १५३ अर्ज मंजूर केले आहे. त्याचा लाभ ११० वैद्यकीय महाविद्यालयात नवे पीजी अभ्यासक्रम तसेच ४३ महाविद्यालयांत पीजी अभ्यासक्रमच्या जागा वाढविण्यास होणार आहे. येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललित वाघमारे यांनी यास दुजोरा दिला.
ठाकुर्ली चोळे भागातील पंचायत बावडी भागात रस्त्याच्या मध्यभागी असलेला जलवाहिनीवरून एक व्हॉल्व्ह मागील महिन्यापासून नादुरुस्त झाला आहे. या नादुरुस्त व्हॉल्व्हमधून सतत पाणी बाहेर पडून ते रस्त्यावरून वाहून जात आहे. सविस्तर वाचा…
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आपल्या देशाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे.
मुलुंड, भांडुप आणि कांजूरमार्ग येथील ७८२ एकर मिठागरांच्या जमिनीचा भाडेपट्टा रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवताना जमिनीचा ताबा मीठ आयुक्तांकडे सोपवण्याचे आदेश पट्टेदाराला दिले आहेत. सविस्तर वाचा…
वाहतूक कोंडीची ही समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या आश्वासनाचा समावेश मोहोळ यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘संकल्पपत्रा’तही आहे.
सहाव्या महिन्यात जन्म झालेला असल्याने त्याच्या फुफ्फुस आणि हृदयाची वाढ पूर्णपणे झालेली नव्हती.
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याच्या संशयावरून ३८ वर्षीय परदेशी नागरिकाला ताब्यात घेतले होते. या परदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेनने भरलेल्या ७७ कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. सविस्तर वाचा…
ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी केलेल्या उपाययोजनांमुळे अपघाती मृत्यू कमी झाल्याचा दावा शासकीय यंत्रणांकडून केला जात आहे.
रेल्वे प्रवाशाला तातडीची वैद्यकीय मदत आता स्थानकातच उपलब्ध होत आहे. यासाठी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू आहे.
पिंपरी-चिचंवड येथे मेट्रो इको पार्कसाठी आरक्षित असलेला मोकळा भूखंड ताब्यात घेऊन तेथे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रे ठेवण्यासाठी गोदाम बांधल्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कृतीची उच्च न्यायालयाने गुरुवारी गंभीर दखल घेतली. सविस्तर वाचा…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनिमित्त शुक्रवारी (१० मे) दुपारी चारनंतर सारसबाग परिसरात वाहतूकबदल करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.