2024 Lok Sabha Election Updates, 10 May 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. प्रचारात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शरद पवार यांनी महाराष्ट्रात ३० ते ३५ जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा दावा केला होता. यावर आता भाजपाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. तसेच ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर हैं’ असं लिहिलेलं असतं, असं विधान केल्यामुळे राजकारण तापलं आहे. याबरोबरच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सांयकाळी जाहीर सभा होणार आहे. तसेच महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबारमध्ये आज सभा पार पडणार आहे. तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल आज पुणे सत्र न्यायालयाकडून दिला जाण्याची शक्यता आहे. यासह इतर अनेक घडामोडी वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Today, 10 May 2024

12:35 (IST) 10 May 2024
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य शुक्रवारी दाखविण्यात आला.

सविस्तर वाचा…

12:34 (IST) 10 May 2024
मुलुंडमध्ये नाकाबंदी दरम्यान आढळली ४७ लाखांची रोकड

मुंबईत सध्या नाकाबंदी दरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड मिळत आहे. मुलुंड परिसरात गुरुवारी एका मोटारीत पोलिसांना ४७ लाखांची रोकड जप्त केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. सविस्तर वाचा…

12:34 (IST) 10 May 2024
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात अपयश…डॉ. हमीद दाभोलकर जाणार उच्च न्यायालयात

पुण्यातील विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

12:33 (IST) 10 May 2024
कान्होजी आंग्रे समाधी स्थळाचे सुशोभिकरण रखडले; दोन महिन्यांपासून काम बंद

सरखेल कान्होजी आंग्रे समाधी स्थळ परिसराच्या सुशोभीकरणाचे काम रखडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सुशोभिकरणाचे काम ठप्प झाले आहे. पुरातत्व विभागाच्या हस्तक्षेपामुळे हे काम थांबविण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

सविस्तर वाचा…

11:29 (IST) 10 May 2024
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात दोन जणांना जन्मठेप

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल आज पुणे सत्र न्यायालयाने दिला. डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल तब्बल अकरा वर्षांनी लागला आहे. सचिन अंदुरे, शरद कळसकर हे या प्रकरणात दोषी ठरले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर दोन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

11:06 (IST) 10 May 2024
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये वाढ; जानेवारी-एप्रिलदरम्यान साडेनऊ हजारांहून अधिक कारवाया

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा मुंबईतील प्रतिबंधात्मक कारवाईत प्रचंड वाढ झाली असून यावर्षी ९,५९३ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. जानेवारी – एप्रिल या चार महिन्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

11:05 (IST) 10 May 2024
गोखले पुलाच्या दुसऱ्या तुळईचे काम लांबणीवर; ३० सप्टेंबरची नवी मुदत

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या दुसऱ्या तुळईचे (गर्डर) सर्व सुटे भाग अद्याप मुंबईत आलेले नाहीत. त्यामुळे दुसरी तुळई बसवण्याचे काम सुमारे तीन महिने लांबणीवर गेले आहे. सविस्तर वाचा…

11:04 (IST) 10 May 2024
मुंबईः सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्या कंटेनरमधून ४२ लाखांच्या कपड्यांची चोरी

सीमाशुल्क चुकवून चीनमधून आलेल्या कंटेनरमधून ४२ लाखांच्या कपड्यांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा कंटेनर २०२२ मध्ये ताब्यात घेऊन शिवडीतील गोदामात ठेवण्यात आला होता. सविस्तर वाचा…

11:03 (IST) 10 May 2024
निवडणूक प्रचारावर तटकरेंकडून ५८ लाख रुपयांचा खर्च; अनंत गितेंकडून प्रचारासाठी ३० लाखांचा खर्च

रायगड लोकसभा मतदारसंघातील १३ उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा खर्च निरीक्षक धीरेंद्रमनी त्रिपाठी यांनी तिसरा व अंतिम आढावा घेतला. यात सुनील तटकरे यांनी प्रचारासाठी सर्वाधिक खर्च केल्याची दिसून आहे. त्याखालोखाल अनंत गीते आणि कुमूदीनी चव्हाण यांनी प्रचारासाठी खर्च केल्याचे समोर आले. सविस्तर वाचा…

11:02 (IST) 10 May 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी