2024 Lok Sabha Election Live Updates, 09 May 2024 : लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर राज्यातील २४ मतदारसंघातील मतदान पूर्ण झाले असून आता उरलेल्या २४ मतदारसंघात पुढील दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे उर्वरित मतदारसंघात प्रचार करण्यावर आता सर्वच राजकीय पक्षांचा जोर दिसत आहे. दरम्यान तीन टप्प्याच्या मतदानानंतर आता प्रचारात नवीन मुद्दे येत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींवर टीका करत असताना अदाणी-अंबानी यांचा उल्लेख केला. दोन्ही उद्योगपतींनी टेम्पो भरून काळा पैसा काँग्रेसला दिला, असा आरोप केल्यामुळे चौथ्या टप्प्याआधी आता अदाणी-अंबानी यांचा प्रचारात उल्लेख झाला आहे.

Live Updates

Marathi News Live Today, 09 May 2024

19:11 (IST) 9 May 2024
बाँम्बस्फोटातील आरोपी अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारफेरीत, भाजप आमदार अमित साटम यांचा आरोप

मुंबई : वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारयात्रेत मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा सहभागी झाल्याचा, तसेच तो कीर्तिकर यांच्यासोबत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे.

वाचा सविस्तर...

18:46 (IST) 9 May 2024
अल्पवयीन मेव्हणीवर लैंगिक अत्याचारासह खुनी हल्ला; बापलेकाला जन्मठेपेसह तीन लाखांचा दंड

सोलापूर : अल्पवयीन मेव्हणीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल मेव्हण्यासह त्याच्या वडिलास बार्शीच्या सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी दीड लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड वसूल झाल्यास त्यातील एक लाख रूपये पीडित मुलीस देण्याचा आदेशही न्यायालयाने जारी केला आहे.

वाचा सविस्तर...

18:37 (IST) 9 May 2024
वीज बिल घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष समिती

सांगली : महापालिकेच्या १ कोटी ३७ लाख रूपयांच्या वीज बिल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत असल्याचे गुरूवारी लोकायुक्तापुढे झालेल्या सुनावणीवेळी जाहीर करण्यात आले.

महापालिकेतील कर्मचार्‍यांच्या संगनमताने खासगी लोकाकडून रोखीने वीज बिले जमा करून ती बिले महापालिकेच्या वीज देयकातून भागविण्याची पध्दत अवलंबून सुमारे १ कोटी ३७ लाख ९१ हजार ५४८ रूपयांचा अपहार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच जणाविरूध्द गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

18:36 (IST) 9 May 2024
सांगली : दोन दिवसाच गटारीतून काढला ५२ टन कचरा

सांगली : मान्सूनपूर्व नालेसफाईच्या मोहिमेत सांगलीतील शंभर फुटी भोबे गटारीतून दोन दिवसात तब्बल ५२ टन प्लास्टिक मिश्रित कचरा काढण्यात आला. या गटारीची स्वच्छता मोहिम अंतिम टप्प्यात आली असल्याचे महापालिकेच्यावतीने गुरूवारी सांगण्यात आले.

वाचा सविस्तर...

18:01 (IST) 9 May 2024
शिवाजी पार्क मैदानातील सभेसाठी मनसेला परवानगी, १७ मे रोजी भाजप आणि महायुतीचा मेळावा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या १७ मे रोजी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सभा घेण्यासाठी नगरविकास विभागाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परवानगी दिली आहे. नगरविकास विभागाने तसे पत्र मुंबई महापालिका प्रशासनाला पाठवले आहे.

वाचा सविस्तर...

17:45 (IST) 9 May 2024
उबाठा आधीच 'लीन', आता त्यांना विलीन व्हायचे असेल - मुख्यमंत्र्यांची टीका

लोकसभा निवडणुकीनंतर छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे शरद पवार यांनी म्हटल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. "शरद पवार म्हणत आहेत की प्रादेशिक पक्षाने काँग्रेस मध्ये विलीन झालं पाहिजे म्हणजे त्यांनी हार मानली का?", असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. तसेच उबाठा आधीच लीन होती,आता विलीन होऊ शकते, अशीही टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

17:45 (IST) 9 May 2024
विश्लेषण : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी काय? आरोपी कोण? आरोप काय?

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर ११ वर्षांनी निकाल लागणार आहे. पुण्यातील विशेष न्यायालयाकडून शुक्रवारी (१० मे) डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात निकाल देण्यात येणार आहे. विशेष न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

वाचा सविस्तर...

17:43 (IST) 9 May 2024
२,००० कुटुंबांना पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, उच्च न्यायालयाकडून महापालिकेची कानउघाडणी

मुंबई : गोराई गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून तेथील रहिवाशांना पाणी उपलब्ध करण्याची घटनात्मक आणि वैधानिक जबाबदारी महापालिका प्रशासन झटकू शकत नाही. तसेच, रहिवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही. महापालिकेने या प्रकरणी मानवी दृष्टीकोन बाळगावा, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई महापालिका प्रशासनाची कानउघाडणी केली.

वाचा सविस्तर...

17:28 (IST) 9 May 2024
प्रदूषणकारी ४ आरएमसी प्रकल्पांवर कारवाई, अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

वसई: प्रदूषण पसरविणार्‍या महामार्गावरील सिमेंट कॉक्रीटच्या (आरएमसी) ४ प्रकल्पांवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र नगररचना अधिनियाच्या विविध कलमाअंतर्गत नायगाव पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाचा सविस्तर...

16:46 (IST) 9 May 2024
धक्कादायक : पुणे महापालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा लैंगिक छळ; आरोग्य निरीक्षकासह मुकादमाविरुद्ध गुन्हा

पुणे महापालिकेतील आरोग्य निरीक्षक, तसेच मुकादमाने सफाई कर्मचारी महिलेचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात आरोग्य निरीक्षकासह मुकादमाविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा

16:45 (IST) 9 May 2024
प्राचार्याने मुलीची छेड काढली; तरूणांनी धो..धो...धुतले, नोकरीही गेली...

बागेत खेळत असलेल्या एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिची छेड काढणाऱ्या एका प्राचार्याला तेथे उपस्थित तरुणांनी चांगलाच चोप दिला. एवढेच नाही तर त्यानंतर झालेल्या पोलीस कारवाईमुळे या प्राचार्याला त्याची नोकरी ही गमवावी लागली.

सविस्तर वाचा

16:42 (IST) 9 May 2024
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! रद्दी कागदात खाद्यापदार्थ बांधून देण्यावरील पालिकेच्या बंदी आदेशास हरताळ

मुंबई : मानखुर्दमध्ये रस्त्यावर कोंबडीचे मांस शिवजून तयार केलेला शॉर्मा खाल्ल्यामुळे १५ जणांना विषबाधा झाली. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली. या घटनेमुळे रस्त्यावर शिजवून विक्री करण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वाचा सविस्तर...

16:10 (IST) 9 May 2024
प्रियांका चतुर्वेदींच्या विधानावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारेंची टीका

शिवसेना उबाठा गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गद्दार असून ते गद्दारच राहणार, अशी टीका केली होती. तसेच श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिले आहे की, माझा बाप गद्दार आहे, असे म्हटले. त्यानंतर आता शिंदे गटाकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ज्योती वाघमारे यांनी हिंदी सिनेमाच्या डायलॉगचा आधार घेत म्हटले, "दिवार सिनेमात डायलॉग आहे की, मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता. पण चतुर्वेदी उबाठाने फेकलेले पैसे उचलते. आम्ही म्हटलं, बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना. पण बसंती शेवटची नाचलीच."

15:37 (IST) 9 May 2024
ऑनलाईन बुकींगद्वारे नागपुरात देहव्यापार; दिल्ली, उत्तरप्रदेश, कोलकाताच्या पाच तरुणी ताब्यात

नागपूर : शहरात ऑनलाईन पद्धतीने सुरु असलेल्या ओयो हॉटेल यश-२४ येथील देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातला. छाप्यात दिल्ली, पश्चिम बंगाल आणि दिल्लीतील ५ तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेण्यात आले तर देहव्यापाराचे सूत्रधार पाच जणांना अटक केली. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली.

वाचा सविस्तर...

15:37 (IST) 9 May 2024
अदानी आणि अंबानी दोस्तीवरून लक्ष वळविण्यासाठी मोदी वेगळी चर्चा करतात- शरद पवार

वाई : आतापर्यंत अदानी आणि अंबानी यांची नावे कोणाबरोबर जोडली होती. ते कोणाचे दोस्त आहेत अशी चर्चा सगळीकडे होत असताना त्याची चर्चा पुन्हा पुन्हा होऊ नये व त्याचा परिणाम त्यांच्या पक्षावर होऊ नये, यापासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोदीं असे बोलत असतात असे शरद पवार यांनी सातारा येथे सांगितले.

वाचा सविस्तर...

15:36 (IST) 9 May 2024
मेट्रोच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली, कुलाब्यात शनिवारी आठ तास पाणी पुरवठा बंद राहणार

मुंबई : चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी येत्या शनिवारी ११ मे रोजी कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरात आठ तासासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर...

15:20 (IST) 9 May 2024
ठाण्याचा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात, बैठकसत्रापाठोपाठ आता प्रचार मिरवणूकांमध्ये सहभागी

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी जिल्ह्यातील घराघरात शिवसेना पोहचविली. म्हणूनच ‘आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला’ अशी घोषणा दिली जाते.

सविस्तर वाचा...

15:01 (IST) 9 May 2024
मुंबई: शिवडी-वरळी उन्नत रस्त्याचे ६५ टक्के काम पूर्ण, पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाणार

शिवडी- वरळी जोडरस्त्याचे आतापर्यंत ६५ टक्के काम पूर्ण झाले असून हा जोडरस्ता २०२५ अखेर पूर्ण करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे.

सविस्तर वाचा...

14:31 (IST) 9 May 2024
मुंबई: तीन संजय पाटील, दोन अरविंद सावंत निवडणूकीच्या मैदानात

लोकसभेच्या निवडणूकीत यंदा आधीच पक्षांच्या फोडाफोडीमुळे संभ्रमाचे वातावरण असताना त्यात आता आणखी भर पडणार आहे ती सारख्या नावांची!

सविस्तर वाचा...

14:30 (IST) 9 May 2024
लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांना पक्ष विलीन करावा लागेल

राष्ट्रवादी कांग्रेस - शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीबाबत बोलत असताना मविआला ३० ते ३५ जागा मिळतील, असे विधान केले आहे. या विधानावर बोलत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर एकतर उद्धव ठाकरे यांना पवारांच्या पक्षात विलीन व्हावे लागेल आणि शरद पवारांच्या पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्यांची तुतारी वाजणार नाही, त्यांती तुतारी बंद होणार असल्यामुळे त्यांना विलीनीकरणाशिवाय दुसरा मार्ग नाही.

13:58 (IST) 9 May 2024
डोंबिवलीत रस्त्यावर चक्कर येऊन पडलेल्या बेशुध्द महिलेला लुटले

उद्यानात फिरत असताना अचानक त्यांना चक्कर आली. त्या उद्यानातील मोकळ्या जागेत पडल्या.

सविस्तर वाचा...

12:59 (IST) 9 May 2024
परदेशी भारतीय इच्छा असुनही लोकसभेच्या मतदानापासून वंचित, परदेशातून भारतात मतदान करण्याची सुविधा नसल्याने इच्छुकांना फटका

काही भारतीय विदेशात गेल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे त्यांची कोंडी झाली. अगोदर हे माहित असते तर विदेशात आलो नसतो, असे परदेशस्थ भारतीय सांगतात.

सविस्तर वाचा...

12:46 (IST) 9 May 2024
शिंदे गटाच्या मेळाव्यात ’सलीम कुत्ता‘ नावाने घोषणाबाजी, दुसऱ्याच दिवशी नाशिक जिल्हा ठाकरे गटाचे प्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे झालेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी बडगुजर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.

सविस्तर वाचा...

12:35 (IST) 9 May 2024
शिवसेना पदाधिकाऱ्याविरोधात १० लाखांच्या वीजचोरीचा गुन्हा दाखल

परेश पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे पनवेल ग्रामीणचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत.

सविस्तर वाचा...

12:09 (IST) 9 May 2024
कल्याण: गर्दीच्या वेळेत लोकल प्रवाशांना गर्दुल्ले, मद्यपी आणि गजरे विक्रेत्यांचा उपद्रव

लोकलच्या दारात अनेक वेळा हे फिरस्ते आडवे पडलेले असतात. अनेक प्रवासी दररोज या मद्यपींना ठेचकळून पडतात. काही मद्यपी महिला प्रवाशांचा डब्यात पडलेले असतात.

सविस्तर वाचा...

11:53 (IST) 9 May 2024
रविंद्र धंगेकर यांचं काम दाखवा, हजार रुपये मिळवा – भाजप नेते हेमंत रासने

रविंद्र धंगेकर यांचं काम दाखवा, हजार रुपये मिळवा, अशी ऑफर नागरिकांना देत रविंद्र धंगेकर यांना रासने यांनी टोला लगावला.

सविस्तर वाचा...

11:39 (IST) 9 May 2024
माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सांची भूमिका अस्पष्टच, कार्यकर्ते संभ्रमावस्थेत

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मेन्डोन्सा यांच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेण्याची शर्यत महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लागली आहे.

सविस्तर वाचा...

11:29 (IST) 9 May 2024
"शरद पवार माझे दैवत पण...", अजित पवार यांचे विधान

शिरूर लोकसभेत शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार माझे दैवत होते, त्यांनी या वयात थांबावे, अशी विनंती त्यांना केली होती. पण ते थांबले नाहीत, असे अजित पवार म्हणाले.

11:28 (IST) 9 May 2024
सातारा-पुणे महामार्गावर उड्डाण पुलावरून भरधाव ट्रक कोसळला

वाई: पुणे-सातारा महामार्गावर पाचवड (ता. वाई) येथील पुलावरून भरधाव वेगाने साताराहून पुण्याकडे जाणारा कंटेनर पुलावरून खाली कोसळला. यामध्ये चालक गंभीररित्या जखमी झाला. कंटेनर साताराहून पुण्याच्या दिशेने जात होता. चालकाचा ताबा सुटल्याने तसेच पुढील टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याची घटनास्थळावरुन माहिती मिळाली.

कंटेनरमधून अवजड मालाची वाहतूक होत होती. पाचवड गावच्या हद्दीतून जात असताना उड्डाणपुलावर कंटेनरचे पुढील टायर फुटले आणि कंटेनर थेट पुलावरून खाली कोसळला. सुदैवाने सर्व्हिस रोडला कोणीही प्रवास करत नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. कंटेनर हटविण्यासाठी मोठे क्रेन मागविण्यात आले होते. उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

11:07 (IST) 9 May 2024
पोलीस कोठडीत मृत्यू किती ?

अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याने नुकतीच पोलीस कोठडीत आत्महत्या केली.

सविस्तर वाचा...

Ajit pawar on chandrakant patil statement about sharad pawar

अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना बारामतीत न येण्याचा सल्ला दिला होता.