2024 Lok Sabha Election Live Updates, 09 May 2024 : लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर राज्यातील २४ मतदारसंघातील मतदान पूर्ण झाले असून आता उरलेल्या २४ मतदारसंघात पुढील दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे उर्वरित मतदारसंघात प्रचार करण्यावर आता सर्वच राजकीय पक्षांचा जोर दिसत आहे. दरम्यान तीन टप्प्याच्या मतदानानंतर आता प्रचारात नवीन मुद्दे येत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींवर टीका करत असताना अदाणी-अंबानी यांचा उल्लेख केला. दोन्ही उद्योगपतींनी टेम्पो भरून काळा पैसा काँग्रेसला दिला, असा आरोप केल्यामुळे चौथ्या टप्प्याआधी आता अदाणी-अंबानी यांचा प्रचारात उल्लेख झाला आहे.
Marathi News Live Today, 09 May 2024
मुंबई : वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारयात्रेत मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा सहभागी झाल्याचा, तसेच तो कीर्तिकर यांच्यासोबत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे.
सोलापूर : अल्पवयीन मेव्हणीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल मेव्हण्यासह त्याच्या वडिलास बार्शीच्या सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी दीड लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड वसूल झाल्यास त्यातील एक लाख रूपये पीडित मुलीस देण्याचा आदेशही न्यायालयाने जारी केला आहे.
सांगली : महापालिकेच्या १ कोटी ३७ लाख रूपयांच्या वीज बिल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत असल्याचे गुरूवारी लोकायुक्तापुढे झालेल्या सुनावणीवेळी जाहीर करण्यात आले.
महापालिकेतील कर्मचार्यांच्या संगनमताने खासगी लोकाकडून रोखीने वीज बिले जमा करून ती बिले महापालिकेच्या वीज देयकातून भागविण्याची पध्दत अवलंबून सुमारे १ कोटी ३७ लाख ९१ हजार ५४८ रूपयांचा अपहार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच जणाविरूध्द गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
सांगली : मान्सूनपूर्व नालेसफाईच्या मोहिमेत सांगलीतील शंभर फुटी भोबे गटारीतून दोन दिवसात तब्बल ५२ टन प्लास्टिक मिश्रित कचरा काढण्यात आला. या गटारीची स्वच्छता मोहिम अंतिम टप्प्यात आली असल्याचे महापालिकेच्यावतीने गुरूवारी सांगण्यात आले.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या १७ मे रोजी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सभा घेण्यासाठी नगरविकास विभागाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परवानगी दिली आहे. नगरविकास विभागाने तसे पत्र मुंबई महापालिका प्रशासनाला पाठवले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे शरद पवार यांनी म्हटल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. “शरद पवार म्हणत आहेत की प्रादेशिक पक्षाने काँग्रेस मध्ये विलीन झालं पाहिजे म्हणजे त्यांनी हार मानली का?”, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. तसेच उबाठा आधीच लीन होती,आता विलीन होऊ शकते, अशीही टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर ११ वर्षांनी निकाल लागणार आहे. पुण्यातील विशेष न्यायालयाकडून शुक्रवारी (१० मे) डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात निकाल देण्यात येणार आहे. विशेष न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबई : गोराई गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून तेथील रहिवाशांना पाणी उपलब्ध करण्याची घटनात्मक आणि वैधानिक जबाबदारी महापालिका प्रशासन झटकू शकत नाही. तसेच, रहिवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही. महापालिकेने या प्रकरणी मानवी दृष्टीकोन बाळगावा, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई महापालिका प्रशासनाची कानउघाडणी केली.
वसई: प्रदूषण पसरविणार्या महामार्गावरील सिमेंट कॉक्रीटच्या (आरएमसी) ४ प्रकल्पांवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र नगररचना अधिनियाच्या विविध कलमाअंतर्गत नायगाव पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुणे महापालिकेतील आरोग्य निरीक्षक, तसेच मुकादमाने सफाई कर्मचारी महिलेचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात आरोग्य निरीक्षकासह मुकादमाविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
बागेत खेळत असलेल्या एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिची छेड काढणाऱ्या एका प्राचार्याला तेथे उपस्थित तरुणांनी चांगलाच चोप दिला. एवढेच नाही तर त्यानंतर झालेल्या पोलीस कारवाईमुळे या प्राचार्याला त्याची नोकरी ही गमवावी लागली.
मुंबई : मानखुर्दमध्ये रस्त्यावर कोंबडीचे मांस शिवजून तयार केलेला शॉर्मा खाल्ल्यामुळे १५ जणांना विषबाधा झाली. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली. या घटनेमुळे रस्त्यावर शिजवून विक्री करण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शिवसेना उबाठा गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गद्दार असून ते गद्दारच राहणार, अशी टीका केली होती. तसेच श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिले आहे की, माझा बाप गद्दार आहे, असे म्हटले. त्यानंतर आता शिंदे गटाकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ज्योती वाघमारे यांनी हिंदी सिनेमाच्या डायलॉगचा आधार घेत म्हटले, “दिवार सिनेमात डायलॉग आहे की, मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता. पण चतुर्वेदी उबाठाने फेकलेले पैसे उचलते. आम्ही म्हटलं, बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना. पण बसंती शेवटची नाचलीच.”
नागपूर : शहरात ऑनलाईन पद्धतीने सुरु असलेल्या ओयो हॉटेल यश-२४ येथील देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातला. छाप्यात दिल्ली, पश्चिम बंगाल आणि दिल्लीतील ५ तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेण्यात आले तर देहव्यापाराचे सूत्रधार पाच जणांना अटक केली. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली.
वाई : आतापर्यंत अदानी आणि अंबानी यांची नावे कोणाबरोबर जोडली होती. ते कोणाचे दोस्त आहेत अशी चर्चा सगळीकडे होत असताना त्याची चर्चा पुन्हा पुन्हा होऊ नये व त्याचा परिणाम त्यांच्या पक्षावर होऊ नये, यापासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोदीं असे बोलत असतात असे शरद पवार यांनी सातारा येथे सांगितले.
मुंबई : चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी येत्या शनिवारी ११ मे रोजी कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरात आठ तासासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
शिवडी- वरळी जोडरस्त्याचे आतापर्यंत ६५ टक्के काम पूर्ण झाले असून हा जोडरस्ता २०२५ अखेर पूर्ण करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे.
लोकसभेच्या निवडणूकीत यंदा आधीच पक्षांच्या फोडाफोडीमुळे संभ्रमाचे वातावरण असताना त्यात आता आणखी भर पडणार आहे ती सारख्या नावांची!
राष्ट्रवादी कांग्रेस – शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीबाबत बोलत असताना मविआला ३० ते ३५ जागा मिळतील, असे विधान केले आहे. या विधानावर बोलत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर एकतर उद्धव ठाकरे यांना पवारांच्या पक्षात विलीन व्हावे लागेल आणि शरद पवारांच्या पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्यांची तुतारी वाजणार नाही, त्यांती तुतारी बंद होणार असल्यामुळे त्यांना विलीनीकरणाशिवाय दुसरा मार्ग नाही.
उद्यानात फिरत असताना अचानक त्यांना चक्कर आली. त्या उद्यानातील मोकळ्या जागेत पडल्या.
काही भारतीय विदेशात गेल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे त्यांची कोंडी झाली. अगोदर हे माहित असते तर विदेशात आलो नसतो, असे परदेशस्थ भारतीय सांगतात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे झालेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी बडगुजर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.
लोकलच्या दारात अनेक वेळा हे फिरस्ते आडवे पडलेले असतात. अनेक प्रवासी दररोज या मद्यपींना ठेचकळून पडतात. काही मद्यपी महिला प्रवाशांचा डब्यात पडलेले असतात.
रविंद्र धंगेकर यांचं काम दाखवा, हजार रुपये मिळवा, अशी ऑफर नागरिकांना देत रविंद्र धंगेकर यांना रासने यांनी टोला लगावला.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मेन्डोन्सा यांच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेण्याची शर्यत महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लागली आहे.
शिरूर लोकसभेत शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार माझे दैवत होते, त्यांनी या वयात थांबावे, अशी विनंती त्यांना केली होती. पण ते थांबले नाहीत, असे अजित पवार म्हणाले.
वाई: पुणे-सातारा महामार्गावर पाचवड (ता. वाई) येथील पुलावरून भरधाव वेगाने साताराहून पुण्याकडे जाणारा कंटेनर पुलावरून खाली कोसळला. यामध्ये चालक गंभीररित्या जखमी झाला. कंटेनर साताराहून पुण्याच्या दिशेने जात होता. चालकाचा ताबा सुटल्याने तसेच पुढील टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याची घटनास्थळावरुन माहिती मिळाली.
कंटेनरमधून अवजड मालाची वाहतूक होत होती. पाचवड गावच्या हद्दीतून जात असताना उड्डाणपुलावर कंटेनरचे पुढील टायर फुटले आणि कंटेनर थेट पुलावरून खाली कोसळला. सुदैवाने सर्व्हिस रोडला कोणीही प्रवास करत नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. कंटेनर हटविण्यासाठी मोठे क्रेन मागविण्यात आले होते. उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते.
अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याने नुकतीच पोलीस कोठडीत आत्महत्या केली.