Maharashtra News Updates : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. काल दक्षिण मुंबईत शिवसेना शिंदे गटाने अरविंद सावंत यांच्या विरोधात आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली. तर आता ठाण्यातून राजन विचारे यांच्याविरोधात नरेश म्हस्के यांना मैदानात उतरविले आहे. तसेच कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांचे नाव अखेरच्या टप्प्यात जाहीर केले आहे. महायुतीमध्ये काही जागावरून गेल्या काही दिवसांत तिढा निर्माण झाला होता. यापैकी आता पालघर लोकसभा मतदारसंघ उरला आहे. नाशिकमधून छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची आज घोषणा केली. तसेच लोकसभेचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून महाराष्ट्रात तीन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. राज ठाकरे यांचा मनसे पक्षही आता प्रचारात उतरणार असून कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसेकडून सभा घेतली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Today, 01 May 2024

12:14 (IST) 1 May 2024
डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाण पूल कोंडीच्या विळख्यात, दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत पुलावर वाहनांचा रांगा

डोंबिवली पूर्व-पश्चिम भाग जोडणारा शहरातील सर्वाधिक महत्वाचा ठाकुर्ली उड्डाण पूल गेल्या काही दिवसांंपासून दररोज सकाळी, रात्री आठ वाजल्यानंतर वाहन कोंडीत अडकत आहे.

वाचा सविस्तर…

12:02 (IST) 1 May 2024
आंबा पल्प उद्योग अडचणीत, गेल्या वर्षाचा ३० टक्के पल्प पडून ?

पुणे : राज्यातील पल्प उद्योग (कॅनिंग ) अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीचा ३० टक्के पल्प (गर) पडून आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात किती पल्प तयार करायचा, बाजारात अपेक्षित दर मिळेल का, अशी संभ्रमावस्था पल्प उद्योगात आहे.

वाचा सविस्तर…

12:01 (IST) 1 May 2024
पुणे: अपहृत बालकाची तीन लाखांत विक्री, दोघांना अटक; सूत्रधार पसार

बालकाचे अपहरण केल्यानंतर त्याची तीन लाख रुपयांमध्ये दक्षिण सोलापूरमधील एकास विक्री करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

सविस्तर वाचा…

11:53 (IST) 1 May 2024
नाशिक: उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले दोन दिवस

अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी असल्याने अखेरच्या टप्प्यात उमेदवारांची गर्दी होण्याची चिन्हे आहेत.

सविस्तर वाचा…

11:53 (IST) 1 May 2024
सिद्धेश्वरानंद महाराजांकडे दीड कोटींची संपत्ती, सोन्याचा मुलामा असणारे पावणेतीन लाखाचे घड्याळ

नाशिक मतदारसंघात आधी अर्ज भरणाऱ्या शांतिगिरी महाराजांकडे तब्बल ३९ कोटींची संपत्ती आहे.

सविस्तर वाचा…

11:52 (IST) 1 May 2024
ठाणे: बाळकूम भागात मोठे वाहतूक बदल

बाळकूम परिसरात साईबाबा मंदिर आहे. या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मंगळवारपासून साजरा केला जात आहे.

सविस्तर वाचा…

11:52 (IST) 1 May 2024
समुद्रालगतच्या १०० फूट उंच सुया सुळक्यावरून राज्याला मानवंदना

कल्याण येथील सह्याद्री रॉक ऍडवेंचर ही गिर्यारोहन संस्था आहे. या संस्थेतील गिर्यारोहक साहसी कामगिरी करत विक्रम करत असतात.

सविस्तर वाचा…

11:51 (IST) 1 May 2024
पंतप्रधानांनी आपल्या गुरूविषयी वापरलेली भाषा निषेधार्ह; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

पंतप्रधानांनी शरद पवार यांना आपले गुरू संबोधले होते. त्यामुळे आपल्या गुरूविषयी असे शब्द वापरणे योग्य नाही, असा टोला काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार यांनी लगावला.

सविस्तर वाचा…

11:50 (IST) 1 May 2024
कोव्हिशिल्ड लशीमुळे धोका किती? कोविड कृती दलाचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकरांनी दिलं उत्तर…

ब्रिटनमधील ॲस्ट्राझेनेका कंपनीने त्यांच्या करोनावरील लशीमुळे थ्रॉम्बोसिस विथ थ्रॉम्बोसायटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) दुष्परिणाम होऊ शकतात, असे म्हटले आहे.

सविस्तर वाचा…

11:50 (IST) 1 May 2024
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपट अवघड का होता? रणदीप हुडा यांनी सांगितले कारण…

हुडा म्हणाले, की सावरकर यांना पडद्यावर साकारणे कठीण नव्हते, पण पडद्यामागे सावरकर होणे कठीण होते.

सविस्तर वाचा…

11:50 (IST) 1 May 2024
तीन दिवस उष्णतेच्या लाटेचे; जाणून घ्या मुंबईसह मध्य महाराष्ट्रात काय होणार?

मुंबईसह कोकण, खान्देश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एकूण २२ जिल्ह्यांत पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 1 May 2024
जनशताब्दी, कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६ हजारांवर

मुंबई : गणेशोत्सव, होळी तसेच इतर सण – उत्सवांनिमित्त आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईस्थित कोकणवासीय कोकणाची वाट धरतात. त्यामुळे मध्य आणि कोकण रेल्वेवरील नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी २०० पेक्षा अधिक असते. गेल्या आर्थिक वर्षात जनशताब्दी आणि कोकणकन्या एक्स्प्रेसला प्रवाशांची प्रचंड मागणी होती. त्यामुळे या कालावधीत या दोन्ही एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी प्रत्येकी ७६ हजार पार गेली होती.

सविस्तर वाचा…

11:34 (IST) 1 May 2024
उद्या कोणी याचिका करून पद्म पुरस्काराची मागणी करेल, उच्च न्यायालयाचे हस्तक्षेप याचिका करणाऱ्यांना खडेबोल

मुंबई : प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीच्या शिफारशीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. परिणामी, नामनिर्देशित आमदाराच्या निकषात बसूनही आपण नियुक्ती होण्यापासून वंचित राहत आहोत, असा दावा अकोलास्थित गोपीकिशन बजोरीया यांनी हस्तक्षेप याचिकेद्वारे मंगळवारी उच्च न्यायालयात केला. मात्र, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत ही याचिका केली ? असा प्रश्न करून उद्या कोणीही जनहित याचिका करेल आणि पद्म पुरस्कारासाठी आपल्या नावाची शिफारस करण्याची मागणी करेल, अशा शब्दांत न्यायालयाने बजोरिया यांना फटकाले.

सविस्तर वाचा…

11:33 (IST) 1 May 2024
गडचिरोलीत सक्रिय जहाल नक्षल नेता जोगन्ना अबुझमाडच्या चकमकीत ठार, शंभरहून अधिक गुन्ह्यांत आरोपी

२०१० साली आर.आर.पाटील गडचिरोलीचे पालकमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी श्रीनिवास गोडसेलवार यांचे नक्षल्यानी अपहरण केले होते.

सविस्तर वाचा…

11:33 (IST) 1 May 2024
धक्कादायक! बनावट कागदपत्रांवरून परराज्यातील वाहनांची नागपूर आरटीओत नोंदणी

या प्रकरणाच्या चौकशीमुळे नागपूर ग्रामीण आरटीओतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सविस्तर वाचा…

11:32 (IST) 1 May 2024
सावधान! राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत ‘डेंग्यू’चे रुग्ण दुप्पट!

२०२४ मध्ये याच काळात राज्यात तब्बल १ हजार ४३५ रुग्ण नोंदवले गेल्याचेही आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे.

सविस्तर वाचा…

11:05 (IST) 1 May 2024
आता केवळ नाशिकचा तिढा बाकी, मतदारसंघ कुणाकडे?

शिवसेना शिंदे गटाने दक्षिण मुंबई आणि ठाण्यातील उमेदवार जाहीर केल्यानंतर आता केवळ नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा बाकी आहे. आज दुपारपर्यंत याठिकाणी उमेदवाराची घोषणा होऊ शकते, असे सांगितले जाते. भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये ठाण मांडून आहेत. तर शिवसेनेकडूनही हा मतदारसंघ स्वतःकडे राहावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

श्रीकांत शिंदे कल्याण तर नरेश म्हस्के ठाण्यातून लढवणार निवडणूक