Maharashtra News Updates : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. काल दक्षिण मुंबईत शिवसेना शिंदे गटाने अरविंद सावंत यांच्या विरोधात आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली. तर आता ठाण्यातून राजन विचारे यांच्याविरोधात नरेश म्हस्के यांना मैदानात उतरविले आहे. तसेच कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांचे नाव अखेरच्या टप्प्यात जाहीर केले आहे. महायुतीमध्ये काही जागावरून गेल्या काही दिवसांत तिढा निर्माण झाला होता. यापैकी आता पालघर लोकसभा मतदारसंघ उरला आहे. नाशिकमधून छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची आज घोषणा केली. तसेच लोकसभेचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून महाराष्ट्रात तीन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. राज ठाकरे यांचा मनसे पक्षही आता प्रचारात उतरणार असून कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसेकडून सभा घेतली जाणार आहे.
Marathi News Live Today, 01 May 2024
काँग्रेस नेते आणि पलूस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांची पुणे लोकसभा निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती.
वाई : साताऱ्यात मोठ्या उत्साहात गुलमोहर दिन साजरा करण्यात आला. १ मे हा गुलमोहर दिन म्हणजे चित्र, कविता, लेखन संगीत तसेच कला अविषकारांचा संगम सातारामध्ये पहायला मिळतो. भारतातून वेगवेगळ्या भागातून कलाकार या महोत्सवात सहभागी होत असतात.
मुंबई : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली आणि राष्ट्रीय महामार्ग गोवाद्वारे कोकण रेल्वेवरील माजोर्डा ते मडगाव विभागात उड्डाणपूलाचे (आरओबी) बांधकाम करण्यात येणार आहे. मडगाव वेस्टर्न पर्यायी मार्गासाठी तुळया उभारण्यात येणार असल्याने कोकण रेल्वेवर जवळजवळ संपूर्ण मे महिना हा ब्लॉक सुरू राहणार आहे.
वाई: महाबळेश्वर पालिकेच्या वेण्णा तलावात ड्रॅगन, फ्लेमिंगो, राजहंस, बदक आणि मोटार आदी विविध आकारात सुमारे १६ बोटी दाखल झाल्या आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे.
ठाणे : देशासह राज्यात झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या मतदानाची टक्केवारी निवडणुक आयोगाने जाहीर केली आहे. परंतु या मतदान टक्केवारीत घोटाळा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मुंबई : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २ मे रोजी सीएसएमटी ते नागपूर दरम्यान एकेरी विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०२१०३ ही अतिजलद एकेरी विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून २ मे रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३ वाजून ३२ मिनिटांनी नागपूर येथे पोहचेल.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार न केल्यामुळे त्यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यांच्यासह ५० इतर कार्यकर्त्यांनाही नोटीस देण्यात आली आहे. तर दोन पदाधिकाऱ्यांना पदावरून हटविण्यात आले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन समाजवादी पक्षाने (सपा) केले आहे. यासंदर्भात समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी बुधवारी खुले पत्र लिहिले आहे. त्याव्दारे त्यांनी कोल्हापूर परिसरातील सपा कार्यर्त्यांना आवाहन केले आहे. समाजवादीचे शिवाजीनगर- मानखुर्द आणि भिवंडी पूर्व, असे राज्यात दोन आमदार आहेत.
१ मे या महाराष्ट्र स्थापना दिनाच्या निमित्ताने समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी कोल्हापूरकरांना आवाहन केले आहे. त्यासंदर्भात लिहिलेल्या खुल्या पत्रात ते म्हणतात की, उच्चवर्णियांच्या सर्वंकष गुलामगिरीतून महाराष्ट्रातील बहुजनांची मुक्तता राजर्षी शाहू महाराज यांनी केली. देश आज निर्णायक वळणावर उभा आहे. तोच वसा जिवंत ठेवण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज यांनी महाविकास आघाडीच्या आग्रहास्तव उमेदवारी स्वीकारली आहे.
कोल्हापूर शहराला हिंदू-मुस्लिम ऐक्याची महान परंपरा आहे. अलिकडच्या काळात उसवत चाललेली सामाजिक-धार्मिक वीण कोल्हापूरकरांसाठी चिंतेचा विषय आहे. थेट छत्रपतींचा वारसा असणारी, ज्यांच्याबद्दल जनमानसात आदर आहे, ज्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वमान्य आहे, असे उमेदवार कोल्हापूरकरांना लाभले आहेत. आपल्या शहराची उज्वल पुरोगामी परंपरा कायम राखण्यासाठी शाहू महाराज लोकसभेत जाणे अगत्याचे आहे, असे आवाहन आमदार रईस शेख यांनी केले आहे.
गेल्या आठवडाभर डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकांंदरम्यान प्रवाशांचे लोकलमधील गर्दीमुळे पडून मृत्यू होत आहेत.
ठाणे लोकसभेची उमेदवारी बुधवारी शिंदे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांना जाहीर झाली आहे.
कोल्हापूर : उद्धव ठाकरे शिवसेनेचे कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख, इचलकरंजी नगरपालिकेचे माजी नगरसेवक महादेव गौड यांनी महाराष्ट्र दिनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. उद्योगमंत्री उदय सामंत, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या उपस्थितीत त्यांनी हा निर्णय घेतला. तर उद्या गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाचा कल पाहता भारतीय जनता पक्षाला धक्का बसणार असे चित्र आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर बेछूट आरोप चालवले आहेत. मोदी यांच्या मनात निर्माण झालेली ही भीती आहे, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील उपस्थित होते.
बेकायदा इमारतीची कल्याण डोंबिवली पालिकेत तक्रार केली तर भूमाफियांंकडून त्रास होईल या भीतीने स्थानिक रहिवासी तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.
पहिल्या घटनेत शाळेच्या शिक्षिकेकडे बालिकेने सावत्र बापाकडून अत्याचार होत असल्याचे सांगितल्यावर घटनेला वाचा फुटली.
एक महिन्यापासून नाशिक लोकसभेचा उमेदवार कोण? अशी चर्चा रंगत असताना आता हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्याने भाजपकडून इच्छुक असलेले दिनकर पाटील नाराज असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे मांडली आहे. तसेच हेमंत गोडसे यांचे निवडून येणे अवघड असल्याचेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तलाठी भरती संदर्भातील नेमणुकांबाबत “जैसे-थे” परिस्थिती ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. आर. बोरा व विनय कारगांवकर यांनी दिले आहेत.
वसई : विरारच्या ग्लोबल सिटी सांडपाणी प्रकल्पात चार कामगारांचा मृत्यू झाला होता. ही घटना निष्काळजीपणामुळे घडल्याने याप्रकरणी ठेकेदारावर कडक कारवाईचे तसेच प्रत्येक मृताच्या वारसांना कंपनीने ३० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचेही निर्देश आयोगाच्या अध्यक्षांनी दिले आहेत.
आदिवासी वस्त्या तहानेने व्याकुळ झाल्या आहेत. रात्रीबेरात्री पाण्यासाठी आदिवासी बांधवांची भटकंती सुरू आहे.
दोन्ही मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन विक्रम रचतील, असा विश्वास भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आतापर्यंत ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील १४,७१६ मीटर लांबीचे रस्ते वाहतुकीसाठी खुले केले आहेत. दक्षिण मुंबईतील ‘मेट्रो ३’ प्रकल्पाच्या कामासाठी बंद केलेले रस्ते एमएमआरसी येत्या १५ दिवसांत मोकळे करणार आहे.
भाईंदर :- ठाणे लोकसभा जागेवर शिवसेनेचा उमेदवार घोषित झाल्यामुळे मिरा भाईंदर भाजपमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे याचा थेट फटका महायुतीच्या प्रचारावर होणार असल्याची शक्यता आहे.
रामटेक लोकसभा निवडणुकीत महायुतीचा परिभव होतोय, अशी शक्यता महायुतीच्याच अंतर्गत सर्वेक्षणातून वर्तवली जात असल्याने नेते धास्तावले आहेत.
पनवेल शहरातील जिल्हा अतिरिक्त न्यायालयासमोर एका वृद्धाला बेदम मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. अब्दुल अजिज अल्लिमीया पटेल असे जखमी ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.
मंगळवारी दुपारी पावनेदोन वाजता न्यायालयाच्या बाहेर अब्दुल यांना मारहाण झाली. याबाबत रितसर तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. तळोजा येथे राहणा-या गुलजार पटेल हा अब्दुल यांना खबरी असल्याची आरडाओरड करु लागला. अब्दुल यांच्या शर्टाला पकडून त्यांना गुलजार न्यायालयाबाहेर घेऊन गेला आणि त्याने शिविगाळ करुन गाडीच्या वायरने अब्दुल यांना मारहाण केली. काही दिवसांपूर्वी पनवेल न्यायालयाबाहेर एका महिलेचा विनयभंग जेष्ठाने केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या जेष्ठाने महिलेला डोळा मारल्याने ही तक्रार नोंदविली गेली होती.
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आतापर्यंत ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील १४,७१६ मीटर लांबीचे रस्ते वाहतुकीसाठी खुले केले आहेत. दक्षिण मुंबईतील ‘मेट्रो ३’ प्रकल्पाच्या कामासाठी बंद केलेले रस्ते एमएमआरसी येत्या १५ दिवसांत मोकळे करणार आहे. हुतात्मा चौक, वरळी, दादर आदी भागांतील हे रस्ते असून त्यामुळे वाहनचालक, प्रवासी आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनीही मताधिक्य कायम राहावे, यासाठी भोसरीत लक्ष घातले आहे.
“शरद पवारांना मी दैवत मानत होतो, पण आता माझी भूमिका वेगळी आहे”, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. या विधानावर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभे राहणार आणि लढत राहणार आहे. २०२४ ला सरकार बदलणार आणि केंद्रात नरेंद्र मोदी नसणार तेव्हा अजित पवारांना पुन्हा ईडीची नोटीस येईल. तेव्हा त्यांना पुन्हा एकदा दैवत बदलले असेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
नागपुरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये मोठी चढाओढ असते. शासनाकडून दंडाची रक्कम वाढवल्यानंतर वाहतूक नियम पाळणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी आशा होती.
मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे होणारे रॅगिंग, अभ्यासाचा ताणतणाव, घरापासून दूर असल्याने येणारा तणाव असे विविध प्रश्न वैद्यकीय विद्यार्थ्यांना भेडसावत असतात. वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे होणारे रॅगिंग रोखण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून वेळोवेळी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. यातूनच आता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची माहिती जाणून घेण्यासाठी आयोगाकडून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.