Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्याचं मतदान येत्या ७ मे रोजी महाराष्ट्रासह देशभरातील एकूण १२ राज्यांमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही नेत्यांच्या प्रचारसभा चालू आहेत. त्यातच निवडणूक आयोगाने पहिल्या दोन टप्प्यांची अंतिम टक्केवारी थेट ११ दिवसांनंतर जाहीर केल्यामुळे या आकडेवारीवर आता विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. राजकीय पक्षांची नेतेमंडळी वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती देत असून त्यातूनही अनेक दावे केले जात आहेत. या दाव्यांची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
Marathi News Live Today, 02 May 2024: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
मुंबई : कुर्ला येथील मुंबई महानगरपालिकेच्या भाभा रुग्णालयात बुधवारी रात्री ११.३० वाजता महिला रुग्ण व तिच्या नातेवाईकांनी रुग्ण कक्षातील परिचारिकेला शिवीगाळ करीत मारहाण केली. यामुळे संतप्त झालेल्या परिचारिकांनी गुरुवारी सकाळी रुग्णाच्या नातेवाईकांना त्वरित अटक करावी आणि परिचारिकांच्या सुरक्षेसाठी रुग्ण कक्षात सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी करत जोरदार आंदोलन केले. परिचारिकांच्या आंदोलनामुळे रुग्ण सेवेवर परिणाम झाला.
पिंपरी : एकजुटीनं .. दुरदृष्टिनं चला गाजवू मैदान.., राष्ट्रहितासाठी करायचं मतदान.., लोकशाहीचा करायचा सन्मान..,१०० टक्के हो करायच मतदान.., लोकशाहीचा करायचा सन्मान.. हा वासुदेवांचा आवाज अलीकडे मावळ लोकसभा मतदार संघातील पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी घुमत असल्याचे दिसते.
नागपूर : पती-पत्नीवर विश्वास ठेवून एकाने त्याचे दुकान त्यांना सांभाळायला दिले. मात्र, दररोज दुकानात जमा होणाऱ्या पैशांमुळे त्यांचा स्वार्थ जागा झाला. या दोघांनी विश्वासघात करून दुकान मालकाची १८ लाख ९० हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी दुकानदाराच्या तक्रारीवरून धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. महेश जेठानी (४५), भव्या जेठानी (३४) रा. जरीपटका अशी आरोपी पती-पत्नीची नावे आहेत.
सांंगली : देश विकासासाठी सर्वच पंतप्रधानांनी काम केले आहे, मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात आल्यावर माझ्यावर आणि उद्धव ठाकरेंवर टीका केल्याविना स्वस्थता वाटत नसावी अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी गुरुवारी तासगावमध्ये झालेल्या सभेत केली.
तुमच्या दोन आमदारांच्या जिवावर साटंलोट्याचं राजकारण करत असताना मुख्यमंत्र्यांना आमचं एक सांगणं आहे. कल्याणला त्यांच्या पुत्रासाठी त्यांनी वाटाघाटी केली. उबाठा गटानं किरकोळ उमेदवार दिला. तिथे साटंलोट्याचं राजकारण केलं. त्याची परतफेड करण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघात नरेश म्हस्केंना उमेदवारी दिली. त्यांच्या वॉर्डाच्या बाहेर त्यांचं काही चालत नाही. नवी मुंबईच्या व्हाईट हाऊसमध्ये भाजपा कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. गणेश नाईकांना डावलण्याची भूमिका जाणीवपूर्वक घेतली आहे, अशा शब्दांत नवी मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांनी आपला असंतोष व्यक्त केला आहे.
२० मे ला होणाऱ्या मतदानासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. आम्हाला सांगण्यात आलं की ठाणे भाजपाला सोडण्यात येईल. भाजपाकडून फक्त संजीव नाईक इच्छुक होते. पण काल सकाळी आम्हाला कळलं की नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या सहापैकी चार विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे आहेत. नवी मुंबईत साडेआठ लाख मतदार आहेत. नवी मुंबईसह मीरा भाईंदरमध्येही भाजपाच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचा उद्रेक झाला आहे, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
राजस्थान मधील ताल छापर या क्षेत्रावरून ग्रीन लिंक्स कोळी प्रजातीचे शास्त्रीय नाव 'पिऊसेटिया छापराजनिर्विन' असे ठेवण्यात आले आहे.
अपघातात ट्रकमधील दोन जण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झालेत.
मुंबई : वांद्रे पूर्व येथील सरकारी वसाहतीतील घरे जोपर्यंत माफक दरात मालकी हक्काने देण्याचा निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत लोकसभा तसेच यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या वसाहतीतील सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
गेल्या निवडणुकीत कुणबी समाजाने भाजपला साथ दिली होती. यावेळी हा मतदार काँग्रेसकडे परत आल्याचे सांगण्यात येत आहे.
विमानतळाला बॉम्बने उडवण्याचा ईमेल येताच बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि श्वान पथक (डॉग स्वॉड) विमानतळावर तैनात करण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आपल्या परीक्षेतील गोंधळासाठी तसे प्रसिद्धच आहे. त्यातच भर घालणारा प्रकार गुरुवारी घडला.
वाई: अवघ्या १२ व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प आई-वडील, पालकांशिवाय पूर्ण करणारी साताऱ्याची धैर्या कुलकर्णी देशातील पहिली मुलगी ठरली आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, हे आव्हानात्मक स्वप्न अनेकांचे स्वप्नच राहते. हे स्वप्न सत्यात उतरवण्याची गौरवास्पद कामगिरी साताऱ्यातील धैर्या विनोद कुलकर्णी हिने केली आहे. तीही वयाच्या फक्त बाराव्या वर्षी.
प्रचाराच्या मोहात सैरभैर झालेल्या महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या उद्या होणाऱ्या सभेच्या मैदानात झाडं अडथळाजनक ठरत असल्याने थेट निष्पाप झाडांवरच कुऱ्हाड चालवली जात आहे. पुण्यातील वारजे माळवाडीतल्या अतुल नगरमधील हा प्रकार सत्ताधारी सरकारचा नियम डावलत सुरु असणारा मनमानी कारभार स्पष्ट करतो. मतदारांनो आता तुम्हीच विचार करा. स्वतःच्या स्वार्थाकरिता झाडांची कत्तल करण्यासाठी वापरली जाणारी ही 'जेसीबी-बुलडोझर' संस्कृती एक दिवस तुमच्या घरापर्यंत यायलाही कमी करणार नाही! मुंबईतल्या आरेतील हजारो झाडांची कत्तल केल्यानंतर आता या स्वार्थी महायुती सरकारने त्यांचा मोर्चा पुण्याकडे वळवलाय हे लक्षात ठेवा! - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट
वसई- ठेकेदार निष्काळजीपणे काम करत असून त्यामुळे दुर्घटना होऊ शकते अशी लेखी सुचना आचोळे पोलिसांनी १३ दिवसांपूर्वीच महापालिकेला केली होती. मात्र त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने द्वारका आगीची दुर्घटना घडल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
ठाणे : ठाणे लोकसभेतील शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे उमेदवार खासदार राजन विचारे हे एका कार्यक्रमात एकमेकांसमोर आले.
कुलरच्या वायरचा धक्का लागल्यामुळे आकांक्षा खाली फेकल्या गेली. तिला कुटुंबियांनी लगेच मेडिकल रुग्णालयात दाखल केले.
गुरूवारी (२ मे) नागपुरात सोन्याचे दर प्रथमच ७२ हजार प्रति दहा ग्रामहून खाली आले.
मुंबई : प्रशिक्षित आणि महारेरा प्रमाणपत्रधारक दलालांमार्फतच स्थावर मालमत्ता क्षेत्रात घर खरेदी – विक्री व्यवहार करणे १ जानेवारी २०२४ पासून बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही या निर्देशाचे पालन केले जात नसल्याचे निर्दशनास आले आहे.
स्प्रिंकलरमुळे मंदिर परिसरदेखील थंड राहतो, बाहेरील तापमानापेक्षा मंदिर परिसरात ४ ते ५ अंशाचा फरक लोकांना जाणवतो.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे सोपविल्यामुळे पक्षात कोणतीही नाराजी नाही असा दावा ऐकीकडे भाजपचे नेते करत असले तरीही गुरुवारी नरेश म्हस्के आणि आमदार प्रताप सरनाईक यांना गणेश नाईक समर्थकांच्या विरोधाला सामोरे जावे लागल्याचे चित्र दिसून आले.
सविस्तर वाचा...
लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडलेत. या टप्प्यात प्रचार, सभा व मतदान आपल्या पक्षाच्या अनुकूल व्हावे म्हणून सर्वच पक्षनेत्यांनी खबरदारी घेतली होती.
सांगली : मतदानानंतर तब्बल अकरा दिवसांनी मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली. यामध्ये मतदानात ७ टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले असून निवडणूक आयोग अदृष्य शक्तीच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी सांगलीत केला.
नाशिक : भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दावेदारीमुळे महायुतीत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नाशिक लोकसभेची जागा अखेरच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाला मिळाली. प्रचारास फारसा कालावधी राहिला नसल्याने शिंदे गटाने नव्या चेहऱ्याचा विचार न करता भाजपने विरोध केलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना मैदानात उतरविले.
नाशिक : महायुतीत तीनही पक्षात तीव्र स्पर्धा, स्थानिक पातळीवर भाजपकडून उमेदवारीस झालेला विरोध आणि नंतर थेट दिल्लीहून छगन भुजबळ यांचे पुढे आलेले नाव अशा आव्हानात्मक परिस्थितीत शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा उमेदवारी मिळवली.
मध्य भारतातील नागरिकांना केनिया किंवा दक्षिण आफ्रिकेतील काही देशांमध्ये 'पिवळ्या तापा'ची लागण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिवळ्या तापाची लस टोचून घ्यावी लागते.
मुंबई : हार्बर मार्गावरील सीएसएमटी येथे एकाच आठवड्यात दोनदा लोकल रेल्वे रुळावरून घसरण्याची घटना घडली. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून हार्बर मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. परिणामी प्रवासाचा कालावधी वाढला आहे. हार्बर मार्ग पूर्णपणे विस्कळीत झाला असून एका मागे एक लोकल उभ्या आहेत.
दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवीकरणाचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला असून या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहेत.
मुंबई : लोकसभा निवडणुकांचा खरा खेळ नव्या युगातील नव्या माध्यमांवर अधिक खेळला जात आहे. प्रत्येक पक्षाच्या तथाकथित ‘वॉर रुम’मध्ये मोबाइल, लॅपटॉप या आधुनिक शस्त्रांद्वारे सेकंदागणिक पोस्ट, रील्स, ट्विट, रिपोस्टच्या माध्यमातून प्रचारयुध्द सुरू असल्याचे एकीकडे पाहायला मिळत आहे.
शालेय शिक्षण विभागाने यंदा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे पालकांनी या प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे.
Marathi News Live Today, 02 May 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर