Lok Sabha Election 2024 Updates, 17 May 2024 : सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान होणार आहे. या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या निमित्ताने आज मुंबईत जंगी सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. तसंच, महायुतीचे अनेक नेतेही येथे सामील होतील. तर बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे. दुसरीकडे, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेल्या भावेश भिंडेला काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं. आज सकाळी त्याला मुंबईत घेऊन आले आहेत. त्याची आता पुढील चौकशी करण्यात येणार आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी वाचा.

महायुतीची सभा लाईव्ह पाहा

मविआची सभा लाईव्ह पाहा

Live Updates

Lok Sabha Election 2024 Live Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

20:49 (IST) 17 May 2024
शिवतीर्थवरून नरेंद्र मोदींचं शरद पवारांना आव्हान; म्हणाले "राहुल गांधींकडून..."

मुंबई हल्ल्यानंतर पार्टी करणाऱ्यांबरोबर हे लोक सत्तेसाठी निघून गेले. जी काँग्रेस दिवसरात्र वीर सावरकरांना शिव्या देते, आज त्यांच्या मांडीवर बसले आहेत. मी एनसीपीच्या नेत्यांना आव्हान देतो की, मी आयुष्यभर स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात एकही शब्द बोलणार नाही, असं राहुल गांधींकडून वदवून घ्या. ते असं नाही करणार. आता निवडणुका आहेत म्हणून ते गप्प आहे. त्यांच्या तोंडाला टाळा लावला आहे. पण एकदा तरी त्यांच्याकडून असं वदवून घ्या. ते असं नाही करणार, कारण त्यांना माहीत आहे की निवडणूक संपल्यावर पुन्हा ते सावरकरांना शिव्या द्यायला सुरुवात करणार आहेत - नरेंद्र मोदी</p>

20:40 (IST) 17 May 2024
"मी अमित शाह आणि नरेंद्र मोदींना फोन करून सांगत होतो...", उद्धव ठाकरेंची टीका

मुंबईत तुमच्या कंपन्या दादागिऱ्या करतात. मी सर्वच गुजरातींविरोधात नाही. गुजरातीसुद्धा आमचाच आहे. पण मोदींमुळे दोन-पाच मस्तवाल झालेत त्यांना वेळीच सुधरा. मराठी माणसाला प्रवेश दिला नाही तर तुमचे दरवाजे बंद करून तुम्हाला गुजरातला पाठवणार. मराठी, गुजरात, हिंदी, मुस्लमान एकत्र राहतो. त्यात मिठाचा खडा टाकू नका. करोनोच्या वेळेला अजूनही विसरलेले नाही. मी स्वतः अमित शाह आणि नरेंद्र मोदींना फोन करून सांगत होतो, माझ्याकडे उत्तर प्रदेशात राहणारे गावी जाऊ इच्छितात. मी पैसे देतो पण ट्रेन उपलब्ध करून द्या. पण ते नाही म्हणाले. शेवटी काही दिवसांनी सर्वांचा संयमाचा बांध सुटला आणि लोंढेच्या लोंढे निघाले. सात ते आठ लाख लोकांच्या छावण्या उभ्या केल्या. त्यांना जेवण आणि औषधपाणी देत होतो. पण मोदींनी ट्रेन दिली नाही. महाराष्ट्रात एकाही मृतदेहाची विटंबना होऊ दिली नाही - उद्धव ठाकरे</p>

20:29 (IST) 17 May 2024
"मी मुंबईचा हक्क परत द्यायला आलो आहे", पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवतीर्थवरून मुंबईकरांना साद

जनादेश चोरून यांनी सरकार बनवलं तेव्हा विकासकार्यातही त्यांनी शत्रूत्त्व बाहेर काढलं. मुंबई मेट्रो काम, जेएनपीटी टर्मिनल काम, अनेक मोठे प्रकल्प यांनी लटकवले. अटकवले आणि भटकवले. हे मुंबईच्या लोकांचं शत्रूत्व काढत आहेत. मोदींचा एक महत्त्वपूर्ण संकल्प आहे, मोदी मुंबईला त्यांचा हक्क परत द्यायला आला आहे. आधुनिक पायाभूत सुविधा मुंबईला मिळत आहे - नरेंद्र मोदी

https://x.com/narendramodi/status/1791477747006464381

20:09 (IST) 17 May 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राज ठाकरेंनी मांडल्या महाराष्ट्राच्या 'या' अपेक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रिपल तलाक कायदाच रद्द करून टाकला आणि हिंदुस्तानातील सर्व मुस्लीम महिलांमध्ये समाधानाचं वातावरण तयार झालं.

मी या सर्व गोष्टींना सर्वांत धाडसी निर्णय मानतो. इतकी वर्ष होऊ शकलं नाही ते करून घेणं हे फार धाडसी आहे. अनेक वर्षे अनेक योजना राबवल्या. पुढच्या पाच वर्षांसाठी मोदी उभे आहेत. पुढच्या पाच वर्षांत महाराष्ट्राकडून अनेक अपेक्षा आहेत. अपेक्षा बोलून दाखवायच्या आहेत.

१. गेले अनेक वर्षे खितपत पडलेला प्रश्न म्हणजे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही गोष्ट पंतप्रधान झाल्यावर तो सन्मान मिळेल अशी अपेक्षा करतो. तितक्याच धाडसाने हा निर्णय होईल अशी खात्री आहे.

२. या देशाच्या अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याचा इतिहासात शालेय शिक्षणात मुलांना शिकवला जावा हा देश कसा उभा राहिला हे पुढच्या पिढीला कळेल.

३. समुद्रात छत्रपतींचा पुतळा केव्हा उभा राहिला, नाही राहील माहिती नाही. पण माझी विनंती आहे की छत्रपतींची खरी स्मारकं असतील तर ती गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांना पूर्वीचं ऐतिहासिक वैभव प्राप्त करण्याकरता आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. येणाऱ्या पिढ्यांना आमचा राजा काय होता ही गोष्ट कळावी.

४. देशभरात अनेक ठिकाणी आम्ही पाहिलं की अनेक उत्तम रस्ते बनवले, ब्रिज बनवले. गेले १८-१९ वर्षे मुंबई गोवा महामार्ग अजूनही तसाच आहे. तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी विनंती आहे.

५. खडसावून सांगावं म्हणून सांगतो, या भारतामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या संविधानाला धक्का लावणार नाही. ते तुम्ही लावणार नव्हताच, पण या विरोधकांची तोंडं एकदाची बंद व्हावीत अशी अपेक्षा आहे.

६. या भारतात अनेक देशभक्त मुसलमान आहेत. जे या देशावर प्रेम करतात. त्यांची निष्ठा आहे. सांगायची गरज नाही. मूठभर आहेत. जे आज उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारे त्यांचा उद्देश गेल्या १० वर्षात डोकं काढता आला नाही. डोकं वर काढण्याकरता काँग्रेससारखा सुलभ मार्ग नाही. ते देशाचा नागरिक आहेत, पिढ्यानपिढा राहणारा आहे. औवेसींच्या मागून फिरणारे लोक आहे, त्यांचे अड्डे तपासून घ्या. तिथं माणसं घुसवा. देशाचे सैन्य घुसवा.

https://x.com/mnsadhikrut/status/1791483829879808475

19:53 (IST) 17 May 2024
आता तुरुंग भाजपा नेत्यांची वाट पाहतंय - संजय राऊत

४ जून नंतर मोटा भाई, छोटा भाई सर्व जण जाणार आहेत. या सभेला अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह येत आहेत. दोघेही तुरुंगातून सुटून येत आहे. मीही काही काळापूर्वी तुरुंगातून बाहेर आलो आहे. आता तुरूंग भाजपाच्या नेत्यांची वाट पाहत आहे. ईडी, सीबीआय आणि त्या कोठड्या भाजपाच्या नेत्यांची वाट पाहत आहेत - संजय राऊत

19:52 (IST) 17 May 2024

रोड शो च्या नावाने मुंबईकर जमा होत नाहीत म्हणून गुजरातमधून लोक आणले - नाना पटोले</p>

19:49 (IST) 17 May 2024
...तर मोदी घुसके मारेगा - एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून एकही बॉम्बस्फोट झाला नाही. कारण, पाकिस्तानला माहितेय की मुंबईत काही झालं तर मोदी घुसके मारेगा - एकनाथ शिंदे</p>

काल एकजण म्हणाले की पंतप्रधान व्हायचं आहे. पण फेसबूक लाईव्ह करून देश चालवणार का - एकनाथ शिंदे

19:40 (IST) 17 May 2024
"माझ्यावर उद्धवजींचा दबाव होता", शिवतीर्थवरून देवेंद्र फडणवीसांचा आरोप

माझ्यावर उद्धवजींचा दबाव होता. उद्धवजी मला म्हणाले होते की वाझेला परत घ्या. मी म्हणालो नाही. पण त्यांनी वाझेला परत घेतलं. त्याच्यावर उद्धवजींना विचारलं त्यावर ते म्हणाले की वाझे काय लादेन आहे का? - देवेंद्र फडणवीस</p>

18:44 (IST) 17 May 2024
मुंबई : मोतीलाल नगरचे ड्रोनने सर्वेक्षण

मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरच्या अभिन्यासाचे ड्रोनने सर्वेक्षण करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. आतापर्यंत अभिन्यासात काय बदल झाले आहेत, अतिक्रमणे वाढली आहेत का यासह अन्य काही बाबींची माहिती या ड्रोन सर्वेक्षणाअंतर्गत घेण्यात येणार आहे. यासाठी मंडळाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर...

18:43 (IST) 17 May 2024
मोफा कायदा रद्द करण्यासाठी पुन्हा हालचाली!

मुंबई : स्थावर संपदा कायद्याच्या (रेरा) स्थापनेनंतर महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट कायदा (मोफा) रद्द झाल्याच्या राज्याच्या न्याय व विधि विभागाच्या अभिप्रायामुळे गृहनिर्माण विभागाची पंचाईत झाली होती. मात्र गृहनिर्माण विभागाने ठाम भूमिका घेतल्यामुळे मोफा कायदा अस्तित्वात राहिला होता.

वाचा सविस्तर...

18:42 (IST) 17 May 2024
धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण; देवेंद्र कोठेंविरूध्द अखेर गुन्हा दाखल

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांच्या झालेल्या जाहीर सभेत दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावणारे भाषण केल्याप्रकरणी भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेले माजी नगरसेवक देवेंद्र राजेश कोठे यांच्या विरूध्द अखेर जेलरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वाचा सविस्तर...

18:11 (IST) 17 May 2024

थोड्याचवेळात शिवाजी पार्क येथे महायुतीच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

18:10 (IST) 17 May 2024
गुंगीचे पेय देऊन लैंगिक अत्याचार, तीन कॉफी शॉपची युवा शिवप्रतिष्ठानकडून तोडफोड

सांगली : अल्पवयीन मुलीला कॉफीमधून गुंगीचे औषध देउन लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आल्यानंतर युवा शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सांगलीतील तीन कॉफी हाउसवर हल्लाबोल करत प्रचंड तोडफोड केली.

वाचा सविस्तर...

18:09 (IST) 17 May 2024
कोल्हापूरात अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई

कोल्हापूर : शहरातील एका अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई करण्यात आली. येथून १५ घरगुती वापराचे एलपीजी सिलेंडर, वजन काटा तसेच मोटर असे अंदाजे ६० हजार रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.

वाचा सविस्तर...

17:53 (IST) 17 May 2024
अखेर ना. म. जोशी मार्ग बीडीडीतील ३०५ रहिवाशांना मिळाली घराची हमी

मुंबई : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत येथील ३०५ रहिवाशांना अखेर मंगळवारी पुनर्वसित इमारतीतील हक्काच्या घराची हमी म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडतीद्वारे दिली. मुंबई मंडळाने ३०५ घरांसाठी सोडत काढली असून या ३०५ रहिवाशांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता लवकरच या रहिवाशांबरोबर करार करण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर...

17:21 (IST) 17 May 2024
नाशिक : मतदानासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात, गैरप्रकार रोखण्यासाठी ४४ भरारी पथके

नाशिक – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार असून या अनुषंगाने प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता प्रचार संपणार असून यानंतर होणारे लक्ष्मी दर्शन, अवैधरित्या होणारी मद्याची देवाणघेवाण तसेच अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी दोन्ही मतदारसंघात भरारी पथके व अन्य यंत्रणा लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सविस्तर वाचा...

17:00 (IST) 17 May 2024
‘उत्तम आरोग्यासाठी दुधाचा चहा टाळा’

मुंबई : चहाचे अधिक सेवन केल्यास रक्तदाब वाढतो, हृदयात अनियमितता येते. तसेच चहाचे सतत सेवन केल्यास लोहाची कमतरता निर्माण होते आणि अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे दुधाचा चहा टाळावा, असे ‘आयसीएमआर’ने संशोधनाअंती जाहीर केले आहे.

वाचा सविस्तर...

16:49 (IST) 17 May 2024
नागपूर: मेट्रो सुरक्षारक्षकांनी सराईत सायकल चोराला पकडले

नागपूर:- मागील ३ महिन्यापासून झांसी राणी चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान सायकल चोरीच्या अनेक घटना घडल्या.स्टेशन परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये एकच व्यक्ती या सर्व घटनांमध्ये सहभागी असल्याचे निदर्शनास आले.

सविस्तर वाचा

16:27 (IST) 17 May 2024
नवी मुंबई : महिला पोलिसाचे कौतुक

पनवेल ः कडक शिस्तीचे आणि कर्तव्यदक्षतेचे खाते म्हणून पोलीस खात्याकडे पाहिले जाते. नूकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने अशाच पद्धतीच्या कर्तव्यदक्षतेचा नमुणा पुन्हा एकदा या पोलीस खात्याबद्दल दाखवून दिला. पोलीस अंमलदार शितल रविंद्र कोकणी असे या महिला पोलिसाचे नाव असून त्यांचा विवाह होऊन काही तास उलटले होते. तरी त्यांनी लग्नानंतर लगेच नंदूरबार ते पनवेल असा प्रवास करुन  बंदोबस्तामध्ये आपले कर्तव्य बजावले.

मावळ लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे १० मे रोजी शितल यांचा विवाह नंदुरबार येथे संपन्न झाला. आयुष्याचा नवा जोडीदार शितल यांना सापडला. मात्र शितल यांना निवडणुकीचा बंदोबस्तही सोपविला होता. अखेर कर्तव्यदक्षतेला प्राधान्याने निवडत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नंदुरबार ते पनवेल असा प्रवास करून पुन्हा त्या कर्तव्यावर हजर झाल्या.

16:24 (IST) 17 May 2024
.. तर राज्यात वीज संकट.. कोराडीतील ६६० मेगावाॅटचा संच बंद

नागपूरः राज्यातील काही भागात उकाडा वाढला असतांनाच दुसरीकडे महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील ६६० मेगावॉटचा संच क्रमांक ८ तांत्रिक कारणाने (१४ मे) पासून बंद पडला आहे. राज्यात विजेची  मागणी अचानक वाढल्यास वीज पुरवठ्यावर परिणामाची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

16:24 (IST) 17 May 2024
Video: शेतात सुरू होती धानकापणी…समोर उभे ठाकले साक्षात वाघोबा….

भंडारा: धानपीक कापणीसाठी गेलेल्या महिला मजुरांना शेतात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघ दिसताच महिला मजुरांची भंबेरी उडाली आणि त्यांनी गावच्या दिशेने पळ काढला. तुमसर तालुक्यातील सोनेगाव येथे आज  १७ मे रोजी सकाळी ८ वाजता वाघाचा शेत शिवारातील पळतानाची चित्रफीत प्रसारित झाली.

सविस्तर वाचा

16:23 (IST) 17 May 2024
बियाणे उत्पादनात घट? शेतकरी चिंतेत, मागणी अधिक पुरवठा कमी

वर्धा: पाऊस बऱ्यापैकी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्ताविला. त्याची दखल घेत शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग उडाली. मात्र, बाजारात बियाण्यांचा ठणठणात असल्याची स्थिती दिसून आल्याने शेतकरी चिंतेत पडले.

सविस्तर वाचा

16:23 (IST) 17 May 2024
एमपीएससी: लिपिक-टंकलेखक परीक्षेतील गोंधळाबाबत मोठा निर्णय; ‘या’ उमेदवारांना कारवाईचा इशारा

नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लिपिक-टंकलेखक परीक्षेचा घोळ अखेर संपला आहे.आयोगाने यासंदर्भात सविस्तर उत्तर सादर करत उमेदवारांना दिलासा दिला आहे. यामुळे आता मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांचे टंकलेखन प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या उमेदवारांवर कारवाईचा इशाराही आयोगाने दिला.

सविस्तर वाचा

16:23 (IST) 17 May 2024
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तुळजाभवानी दानपेटी प्रकरणी गुन्हा नोंद करण्यास दिरंगाई

धाराशिव : कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आठ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला. त्यात अनेक सनदी अधिकारीही गुंतले आहेत. म्हणूनच प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आता रद्द केला आहे.

वाचा सविस्तर...

16:05 (IST) 17 May 2024
ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयौध्या पौळ यांची पोस्ट चर्चेत

https://x.com/PoulAyodhya/status/1791387255015395537

15:52 (IST) 17 May 2024
पुणे : वर्चस्वाच्या वादातून कोयत्याने वार करून तरुणाचा खून

पुणे : वर्चस्वाच्या वादातून टोळक्याने एका मुलावर हल्ला केल्याची घटना कोथरुड भागातील डहाणूकर कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री घडली. त्यावेळी टोळक्याच्या तावडीतून सुटलेल्या मुलाच्या मित्रावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला.

सविस्तर वाचा...

15:51 (IST) 17 May 2024
पिंपरी : आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा…पोलिसांनी सुरू केला अनोखा उपक्रम…

पिंपरी : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये तसेच तक्रारींचा वेळीच निपटारा व्हावा यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

15:48 (IST) 17 May 2024
सावधान! राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा

नागपूर : अवकाळी पावसाने अवघा महाराष्ट्र कवेत घेतला आहे. उन्हाळ्यातील काही दिवस वगळले तर अवकाळी पावसाचा मारा सुरुच आहे. अशातच आता हवामान खात्याने शुक्रवारी पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे.

सविस्तर वाचा...

Lok Sabha Election 2024 Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

Story img Loader