Lok Sabha Election 2024 Updates, 17 May 2024 : सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान होणार आहे. या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या निमित्ताने आज मुंबईत जंगी सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. तसंच, महायुतीचे अनेक नेतेही येथे सामील होतील. तर बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे. दुसरीकडे, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेल्या भावेश भिंडेला काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं. आज सकाळी त्याला मुंबईत घेऊन आले आहेत. त्याची आता पुढील चौकशी करण्यात येणार आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी वाचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महायुतीची सभा लाईव्ह पाहा

मविआची सभा लाईव्ह पाहा

Live Updates

Lok Sabha Election 2024 Live Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

15:47 (IST) 17 May 2024
पिंपरी : मोशीतील कोसळलेल्या होर्डिंगसंदर्भात समोर आली ही माहिती…दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या मोशीतील होर्डिंगच्या मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपल्याचे समोर आले असून या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

15:30 (IST) 17 May 2024
“नरेंद्र मोदींच्या सभेमुळे मुंबईत…”, एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मोदी साहेबांच्या सभेमुळे मुंबईतील सहाच्या सहा जागा जिंकून येतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे</p>

14:56 (IST) 17 May 2024
मुंबई : वडाळा दुर्घटनेच्या चौकशीचा निर्णय

मुंबई : वडाळ्यात वाहनतळासाठी उभारण्यात आलेला लोखंडी टॉवर कोसळल्याच्या घटनेची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली आहे. ही घटना नेमकी कशी घडली, त्याची कारणे काय आणि पार्किंग टॉवरच्या रचनेत काही संरचात्मक त्रुटी होत्या का याचा तपास करण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर…

14:55 (IST) 17 May 2024
पोलीस निवडणूक बंदोबस्तावर असल्याने कल्याण, डोंबिवलीत घरफोड्या वाढल्या

कल्याण : कल्याण, डोंबिवली हद्दीतील पोलीस लोकसभा निवडणूक कामावर व्यस्त असल्याने रात्रीच्या वेळेत घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. या आठवड्यात सलग चार दिवस कल्याण पूर्वे, डोंबिवलीत घरफोड्या करून चोरट्यांनी लाखो रूपयांचा ऐवज लांबविला आहे.

वाचा सविस्तर…

13:58 (IST) 17 May 2024
मतदारसंघाचा आढावा : कल्याण- डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यापुढे ठाकरे गटाचे आव्हान कितपत?

कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे रिंगणात असल्याने साऱ्यांचे लक्ष वेधलेल्या कल्याण मतदारसंघातील लढत अगदीच एकतर्फी होते की चुरशीची होते याचीच उत्सुकता आहे. भाजपची नाराजी असली तरी मोदी हे खणखणीत नाणे शिंदे यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे.

वाचा सविस्तर…

13:41 (IST) 17 May 2024
“शरद पवार सेक्युलर नाहीत, ते संधीसाधू आहेत”, प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका

माझ्या अंदाजाने परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवारसुद्धा भाजपाबरोबर जातील. शरद पवारांचीही गॅरंटी मी देत नाही. काही कारण काढून ते भाजपाबरोबर जातील. नाविन्य त्यात काहीच नाहीय. शरद पवार सेक्युलर आहे हे खोटं बोलत आहेत. ते संधीसाधू आहेत. त्यामुळे ते सेक्युलर असल्याचं आम्ही मानत नाही. उद्धव ठाकरे धर्मवादी आहेत हे उघड आहे. काँग्रेसचं आणि त्यांचं पटलं नाही. एनसीपीचा त्यांना काही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांना भाजपाबरोबर जाणं भाग आहे- प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी

13:39 (IST) 17 May 2024
मुंबई : पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मोनोरेल गाडीची चाचणी सुरू

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेलच्या ताफ्यात पहिली स्वदेशी बनावटीची मोनोरेल गाडी दाखल झाली आहे. या गाडीची जोडणी करून तिच्या चाचणीला आता सुरुवात करण्यात आली आहे. महिनाभर ही चाचणी चालणार असून त्यानंतर म्हणजेच जूनच्या मध्यावर ही गाडी सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

वाचा सविस्तर…

13:28 (IST) 17 May 2024
उच्च न्यायालयाचा महानगरपालिकेला तडाखा; कार्यक्रम रद्द झाल्यानंतरही परवानगीसाठी जमा केलेली रक्कम परत न करणे भोवले

मुंबई : ‘मुंबई शांती महोत्सव २०२२’च्या आयोजनासाठी पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यात अपयशी ठरलेल्या अहमदनगर येथील एका धार्मिक ट्रस्टच्या सदस्याला नऊ लाख रुपयांची रक्कम परत करण्यास नकार देणाऱ्या मुंबई पालिकेच्या भूमिकेबाबत उच्च न्यायालयाने गुरुवारी आश्चर्य व्यक्त केले. त्याचप्रमाणे, ही रक्कम याचिकाकर्त्याला परत करण्याचे आदेश दिले.

वाचा सविस्तर…

13:04 (IST) 17 May 2024
कल्याण लोकसभेत चार महिन्यात वाढले ८३ हजार नवमतदार

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात ३ जानेवारी २४ ते ३ मे २०४ या कालावधीत करण्यात आलेल्या नव मतदार नोंदणी मोहिमेत एकूण ८३ हजार ८०७ मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवली.

वाचा सविस्तर…

12:53 (IST) 17 May 2024
“छगन भुजबळ नाराज असल्याचं ऐकलंय”, जयंत पाटलांचा दावा

छगन भुजबळ नाराज असल्याचं आम्ही ऐकलंय. बाकीचे कोणी नाराज आहेत हे माहीत नाही. माझ्याशी कोणी संपर्कात नाही. भाजापाला महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडून देखील जनाधार मिळत नाही त्यामुळे आणखी एका पक्षाला बरोबर आहे. पण जेवढे पक्ष एकत्रित करायचे प्रयत्न करत आहे ते जनाधार कमी करणारे आहेत. ४ जूनला संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केले – जयंत पाटील</p>

12:40 (IST) 17 May 2024
मुंबई ते मांडवा जलवाहतुक २६ मे पासून बंद होणार

अलिबाग : मुंबई ते मांडवा दरम्यान चालणारी जलवाहतुक सेवा २६ मे पासून बंद होणार आहे. पावासाळ्याच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक मेरीटाईम बोर्डाने जारी केले आहे. दरम्यान भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान चालणारी रो रो जलवाहतुक सेवा नियमितपणे सुरु राहणार आहे.

वाचा सविस्तर…

12:04 (IST) 17 May 2024
घाटकोपर दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

मुंबई : घाटकोपर दुर्घटना प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश प्रभूदास भिंडे (५१) याला उदयपूर येथून अटक केली होती. आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे.

वाचा सविस्तर…

11:13 (IST) 17 May 2024

भावेश भिंडे याला उदयपूरमधून अटक. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवला.

10:46 (IST) 17 May 2024
भावेश भिंडे मुंबईत दाखल

Lok Sabha Election 2024 Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा