Mumbai Maharashtra News Update : लोकसभा निवडणूक नुकताच पार पडली असून उद्या (४ जून) निकाल जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले आहेत. त्यानुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. याशिवाय राज्यात विधानपरिषदेची निवडणूक देखील जाहीर झाली आहे. आज ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब उमेदवारी अर्ज भरणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यासह इतर घडामोडींकडे आपले लक्ष असणार आहे.
Marathi News Updates 3 June 2024 : मध्य आणि पश्चिम रेल्वे खोळंबली! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारवर्गाचे पुन्हा हाल, आजही लेटमार्क!
अनेकांना त्यांच्या ठराविक वेळेतील गाड्या मिळाल्या नाही. त्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही.
गेल्या दोन वर्षापासून कपील पाटील आणि किसन कथोरे यांच्यात धुसफूस सुरू आहे. भाजप नेत्यांनी वेळोवेळी या धुसफूशीवर पांघरूण घालून हा वाद वाढणार नाही याची काळजी घेतली.
गुजरातकडून महाराष्ट्रात येणाऱ्या नायट्रोजन गॅस टँकरने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी सकाळी धुळ्याजवळ नागपूर-सुरत महामार्गावर घडली.
बोरिवली रेल्वे स्थानकात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लोकल गाड्या या १५ ते २० मिनिटे उशिराने येत आहेत.
विधानपरिषदेच्या निवडणुकाचा जाहीर झाल्या असून भाजपाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानुसार, मुंबई पदवीधर मतदासंघासाठी भाजपाकडून किरण शेलार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
BJP announces the names of candidates for the Maharashtra Legislative Council biennial elections to the Konkan Division Graduates', Mumbai Graduates' and Mumbai Teachers' constituencies. pic.twitter.com/TrIzdATWlx
— ANI (@ANI) June 3, 2024
अलिबाग : पोलादपूर तालुक्यातील करंजे गावातील पायटेवाडी येथे जमिनीला भेगा गेल्या आहेत. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. दरम्यान तालुका प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी केली आहे.
वर्धा : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जर संतप्त होत कडक कारवाई करण्याचे आदेश उपस्थितंसमोर देत असतील तर प्रकरण निश्चितच गंभीर असणार. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वरूण पाठक हे आपल्या सहकाऱ्यासोबत फडणवीस यांना प्रत्यक्ष जाऊन भेटले. वर्धा जिल्ह्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याने मोठ्या प्रमाणात अवैधपणे रेती चोरी होत आहे. त्याला पायबंद घालावा अशी लेखी मागणी या भेटीत करण्यात आली.
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात असला, तरी बियाण्यांच्या दरात झालेली वाढ, उगवण क्षमतेविषयी हमीचा अभाव आणि अधिक मागणी असलेल्या वाणांचा तुटवडा यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत.
नागपूर : शैक्षणिक वर्ष २०२४-२५पासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य पातळीवर नेमण्यात आलेल्या सुकाणू समितीकडून महाराष्ट्रातील विद्यापीठांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या. मात्र, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज्यातील विद्यापीठांमध्ये एकवाक्यता नसल्याचा आक्षेप आहे. अनेक विद्यापीठांमध्ये शिक्षकांचा कार्यभार चुकीच्या पद्धतीने लावला जात असल्याने प्राध्यापक बेरोजगार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे : ससूनमध्ये अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात बदल करण्यात आले. १९ मे रोजी अल्पवयीन मुलाला ससूनमध्ये आणण्यात आले होते. त्या दिवशीचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले असून, चित्रीकरणातून तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती मिळणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन आमदार शहाजी बापुंची भेट घेतली आहे. नुकताच शहाजी बापू यांच्या गुडघ्यावर शस्त्रकीया पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde met his party MLA Shahaji Bapu at Breach Candy Hospital today and took updates about his health. Shahaji Bapu had recently had knee surgery. CM was in his native place for a few days, he met Shahaji Bapu today after returning to Mumbai and… pic.twitter.com/5Xxmb3kcCE
— ANI (@ANI) June 3, 2024
राज्यातील विधानपरिदेची निवडणूक जाहीर झाली असून यात मुंबईतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे. मुंबई परवीधरसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते आज उमेदवारी अर्ज भरतील, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.
तब्बल ६३ तासांच्या मेगाब्लॉकमध्ये अवघ्या मुंबईकरांचा घामटा निघाल्यानंतर सोमवारी तरी वेळेत आणि आरामात कार्यालयत पोहोचू या आशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरलं आहे. कारण, आज सकाळपासूनच मध्य आणि पश्चिम रेल्वे खोळंबली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच लेटलतिफ झाल्याने सामान्य नोकरदारवर्गाने नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
Shivsena Thackeray Group On Exit Poll Numbers : लोकसभा निवडणूक नुकताच पार पडली असून उद्या (४ जून) निकाल जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाजदेखील जाहीर झाले आहेत. त्यानुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, या एक्झिट पोलच्या अंदाजांवर आता ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे. एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा आहे. त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून ही टीका करण्यात आली आहे.