Mumbai Maharashtra News Update : लोकसभा निवडणूक नुकताच पार पडली असून उद्या (४ जून) निकाल जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले आहेत. त्यानुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. याशिवाय राज्यात विधानपरिषदेची निवडणूक देखील जाहीर झाली आहे. आज ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब उमेदवारी अर्ज भरणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यासह इतर घडामोडींकडे आपले लक्ष असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Updates 3 June 2024 : मध्य आणि पश्चिम रेल्वे खोळंबली! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारवर्गाचे पुन्हा हाल, आजही लेटमार्क!

19:37 (IST) 3 Jun 2024
राज्यात आता पानांची शेती शक्य, फळांपेक्षा पानांमध्ये जास्त पोषण मूल्याचा संशोधकांचा दावा

राज्य फळे, फुलांच्या उत्पादनात देशात आघाडीवर आहे. आता राज्यात पानांची शेती होऊ लागली आहे.

सविस्तर वाचा…

19:23 (IST) 3 Jun 2024
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुलाला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवणार, बाल न्याय मंडळाचा आदेश

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी बाल न्याय मंडळाने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

सविस्तर वाचा…

18:53 (IST) 3 Jun 2024
एनएमएमटीने बस फेऱ्या वाढवाव्यात, उलवेकरांची मागणी

पनवेल, उलवेमध्ये झपाट्याने विकास होत असून महामुंबई म्हणून ओळखले जात आहे. या ठिकाणी गृहनिर्माण विकासाबरोबरच मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरही उभे राहत आहे.

सविस्तर वाचा…

18:19 (IST) 3 Jun 2024
पुन्हा प्रचंड मताधिक्याने विजयी होणार….. सुनील मेंढेंचा दावा

भंडारा – गोंदियाचा खासदार कोण? प्रशांत पडोळे की सुनील मेंढे? मात्र नेत्यांपासून सर्वसामान्यापर्यंत याबाबत अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

सविस्तर वाचा…

18:19 (IST) 3 Jun 2024
शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाच्या घटना किती? युजीसीने मागवली माहिती…

विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी देशातील सर्व विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांना जातीय भेदभाव रोखण्याबाबत सतर्क केले आहे.

सविस्तर वाचा…

18:18 (IST) 3 Jun 2024
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या सुटकेबाबतच्या निर्णयाला ‘सर्वोच्च’ न्यायालयाची स्थगिती…

अरुण गवळी याला हत्येच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नागपूरमधील मध्यवर्ती कारागृहात गवळी बंदिस्त आहे.

सविस्तर वाचा…

17:32 (IST) 3 Jun 2024
मुक्त विद्यालयात पाचवी, आठवीसाठी नोंदणी… कधीपर्यंत करता येणार अर्ज?

२४ जूनला संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्रे आणि यादी विभागीय मंडळात जमा करायची आहे.

सविस्तर वाचा…

16:29 (IST) 3 Jun 2024
उद्धव ठाकरेंवरील कारवाईच्या निर्देशावरून संजय राऊतांचे निवडणूक आयोगावर टीकास्र; म्हणाले..

निवडणूक आयोग ही भाजपाची शाखा आहे. भाजपाच्या तक्रारीनंतर निडणूक आयोगाने तत्काळ दखल घेतली. मात्र, विरोधकांच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाकडून दखल घेत नाही. विरोधकांनी त्यांना आतापर्यंत १७ पत्र लिहिले आहेत. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. अमित शह रामाचं दर्शन फुकटात देऊ म्हणतात, पण कारवाई होत नाही. मोदी निडणूक सुरू असताना ध्यान करतात तेव्हा आयोग कारवाई करत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

16:15 (IST) 3 Jun 2024
विधानपरिषद निवडणूक : अनिल परब यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

राज्यात विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यानुसार कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी आज कोकण भवनमध्ये जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.

15:24 (IST) 3 Jun 2024
लोकसभेच्या निकालापूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पत्रकार परिषदेप्रकरण निवडणूक आयोगाकडून कारवाईचे निर्देश

उद्धव ठाकरे यांनी २० मे रोजी मतदान सुरु असताना पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. याविरोधात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाला तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कारवाईचे निर्देश दिले आहे.

14:27 (IST) 3 Jun 2024
जळगावात पुन्हा एक हत्या; पंधरवड्यातील दुसरी घटना

आठवडाभरानंतरही हत्यांची मालिका सुरूच असून, जळगावात सोमवारी पहाटे आणखी एक हत्या झाल्याचे उघड झाले.

सविस्तर वाचा…

14:26 (IST) 3 Jun 2024
डोंबिवलीतील कोपरमध्ये वनराई नष्ट करून बेकायदा इमारतीचे काम सुरू

पालिकेच्या उद्यान विभागाच्या परवानग्या न घेता या बेकायदा इमारतीसाठी भूमाफियांनी जुनाट झाडे पालिकेच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन तोडून टाकली आहेत.

सविस्तर वाचा…

14:01 (IST) 3 Jun 2024
विजेच्या स्मार्ट प्रीपेड मीटरला नकार; सध्याच्या पोस्टपेड मीटर्स जोडण्या चालू ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे इंडिया आघाडीची मागणी

कोल्हापूर : महावितरण कंपनीने राज्यातील वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आमचा नकार आहे. तसेच, सध्याचे पोस्टपेड मीटर्स जोडण्या आहेत त्या तशाच चालू ठेवाव्यात, अशी मागणी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे, इंडिया आघाडी, विविध वीज ग्राहक व स्थानिक संघटना यांनी सोमवारी एका निवेदनाद्वारे केली आहे.

वाचा सविस्तर…

14:01 (IST) 3 Jun 2024
मतमोजणीच्या दिवशी अवजड वाहनांसाठी अटल सागरी सेतू बंद, हलक्या वाहनांना…

अटल सेतू वाहतूक जड अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे तर हलक्या वाहनांची वाहतूक सुरु असली तरी त्यांना शिवडी येथे थांबता येणार नाही.

सविस्तर वाचा…

13:51 (IST) 3 Jun 2024
गडचिरोली : सट्टाबाजाराचा कौल भाजपच्या बाजूने तर सर्वेक्षणात काँग्रेस आघाडीवर, धाकधूक वाढली…

गडचिरोली : मतदानानंतर तब्बल दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर ४ जूनरोजी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी विविध संस्थानी जाहीर केलेल्या सर्वेक्षणात गडचिरोली-चिमूर लोकसभेत काँग्रेसला झुकते माप दिले. परंतु सट्टा बाजारात भाजपला कमी भाव दिल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असून दोन्ही पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहे.

वाचा सविस्तर…

13:50 (IST) 3 Jun 2024
उत्कंठा शिगेला! यवतमाळ वाशीमचा खासदार कोण?

वाशीम : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्यात २६ एप्रिल रोजी मतदान झाले. गतवेळी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी ह्या येथून निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांची उमेदवारी कापून शिंदे सेनेने त्यांच्या जागी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील महाले यांना रिंगणात उतरविले तर शिवसेना उबाठा गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख होते.

वाचा सविस्तर…

13:42 (IST) 3 Jun 2024
“आमच्या नादाला लागू नका, आमच्या भूमिका या…”, रवी राणांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर!

नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील, असा दावा बडनेराचे आमदार रवी राणा यांनी काल माध्यमांशी बोलताना केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, रवी राणांच्या या दाव्याला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

सविस्तर वाचा

13:41 (IST) 3 Jun 2024
दुष्काळाच्या परिस्थितीबाबत शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या भीषणतेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही. जर ही दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि जर राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत तर, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल! त्यामुळे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे यांनी राज्यातील दुष्काळ निवारणाबाबत योग्य कार्यवाही करावी, ही अपेक्षा, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

13:39 (IST) 3 Jun 2024
पश्चिम रेल्वे विस्कळित झाल्याने मेट्रोची अतिरिक्त ट्रेन सेवा

बोरिवली रेल्वे स्थानकात केबल तुटल्याने पश्चिम रेल्वे वाहतूक विलंबाने धावत आहे. बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जलद मार्गावर धावणाऱ्या लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत आहेत.

सविस्तर वाचा…

13:30 (IST) 3 Jun 2024
नवी मुंबई, ठाणे परिसरात पूर्वमोसमी पावसाची हजेरी

काही दिवसांत मोसमी वारे राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सविस्तर वाचा…

13:19 (IST) 3 Jun 2024
संरक्षण आस्थापनांपासून ५०० मीटरपर्यंत बांधकामांना निर्बध कायम, सर्वोच्च न्यायालयाचेही शिक्कामोर्तब

संरक्षण आस्थापनांपासून ५०० मीटरपर्यंतच्या बांधकामांना असलेला निर्बंध कायम असल्याचे आता पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा…

13:04 (IST) 3 Jun 2024
वाशीम : ‘समृद्धी’वर पुन्हा भीषण अपघात; तीन जण ठार

वाशीम : समृद्धी महा मार्गावरील मालेगाव तालुक्यातील रिधोरा इंटर चेंज जवळ होंडाई क्रेटा कार संभाजीनगर वरून अमरावती कडे जात असताना चालकाला डुलकी लागल्याने गाडीचे नियंत्रण सुटले. कार उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एम एच १५ जे सी ९६९५ वर धडकली. धडक एव्हढी जोरदार होती की कार मधीच दोघे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली.

वाचा सविस्तर…

13:01 (IST) 3 Jun 2024
डम्पर अपघातामुळे डोंबिवलीतील कुटुंबीयांचे दुबईला जाण्याचे स्वप्न भंगले

दुबईला जाण्यासाठी पारपत्रची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुधीर आणि मयत स्नेहा दाभिलकर हे रविवारी दुपारी डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी कार्यालयात पारपत्र कामासाठी गेले होते.

सविस्तर वाचा…

12:47 (IST) 3 Jun 2024
Maharashtra Live News : लोकसभा निवडणूक होताच महायुतीत फाटाफूट? विधानसभेची नांदी?

लोकसभा निवडणूक संपुष्टात येताच आणि निकालासाठी अवघा एक दिवस बाकी असताना आता महायुतीमध्येच संघर्ष पाहायला मिळत आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीत चार जागांसाठी भाजपा, शिवसेना शिंदे गट, अजित पवार राष्ट्रवादी गट आणि मनसे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. सविस्तर बातमी वाचा

12:45 (IST) 3 Jun 2024
पनवेल: बहिणीसोबत एकटा घरात दिसल्याने त्याला ठार केले, तळोजातील घटना

देवीचा पाडा येथे राहणारा समीर हा रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सूमारास त्याची मैत्रीण आलिया शेख हीला भेटण्यासाठी तीच्या घरी गेला होता.

सविस्तर वाचा…

12:44 (IST) 3 Jun 2024
Maharashtra Live News : ‘चंदीगडप्रमाणे फेरफार होण्याची शक्यता, सतर्क राहा’, जयंत पाटील काय म्हणाले?

चंदीगडमधील महापौर निवडणुकीत ज्याप्रकारे फेरफार झाला होता, त्याप्रमाणेच मतमोजणीत गडबड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सावधगिरी बाळगावी, मतमोजणीवर बारकाईने लक्ष द्यावे आणि शांतता ठेवावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे.

12:39 (IST) 3 Jun 2024
वाढदिवसाचा केक उशीरा आणल्याने पत्नी, मुलावर चाकूने हल्ला

वाढदिवसाचा केक उशीरा आणल्यामुळे झालेल्या वादातून साकीनाका येथे ४५ वर्षीय व्यक्तीने पत्नी व मुलावर चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी साकीनाका परिसरात घडली.

सविस्तर वाचा…

12:21 (IST) 3 Jun 2024
मुंबईत कोरडे तर ठाणे, पालघरमध्ये उष्ण दमट वातावरणाचा अंदाज; हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

मुंबईच्या तापमानाचा पारा घसरला असला, तरी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे उकाडा कायम आहे.

सविस्तर वाचा…

12:15 (IST) 3 Jun 2024
ताडोबात जूनाबाई वाघिणीची दोन पिल्लांसोबत मौजमस्ती, व्हिडिओ समाज माध्यमावर सार्वत्रिक

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जूनाबाई वाघीण तिच्या दोन पिल्लांसह मस्ती करीत आहे. नागपूरचे पर्यटक कल्पक डोर्लीकर यांनी हा व्हिडिओ चित्रबद्ध केला आहे. विशेष म्हणजे वाघीण तारांचे कुंपण लांब उडी मारून पार करीत आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच सार्वत्रिक झाला आहे.

वाचा सविस्तर…

12:14 (IST) 3 Jun 2024
नाशिक, दिंडोरीतील महायुती, मविआचे उमेदवार विजयावर ठाम, मतदानोत्तर चाचण्यांविषयी सावधगिरी

नाशिक : दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत काट्याची टक्कर होणार असल्याचे मतदानोत्तर चाचण्यांमध्ये उघड झाले असले तरी दोन्ही गटांचे उमेदवार आपापल्या विजयाची खात्री बाळगून आहेत. चाचण्यांचे कल पाहून काहींना हायसे वाटले तर, काहींनी त्यात फारसे तथ्य नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

वाचा सविस्तर…

पश्चिम आणि मध्य रेल्वे खोळंबली (फोटो – प्रातिनिधिक छायाचित्र)

तब्बल ६३ तासांच्या मेगाब्लॉकमध्ये अवघ्या मुंबईकरांचा घामटा निघाल्यानंतर सोमवारी तरी वेळेत आणि आरामात कार्यालयत पोहोचू या आशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरलं आहे. कारण, आज सकाळपासूनच मध्य आणि पश्चिम रेल्वे खोळंबली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच लेटलतिफ झाल्याने सामान्य नोकरदारवर्गाने नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.