2024 Lok Sabha Election Result: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींनी पराभवाची मीमांसा केली पाहिजे असं म्हटलं आहे. तसंच एनडीए प्रणित सरकार स्थापन करण्याचा दावा होत असला तरीही असं सरकार टिकणार नाही असंही संजय राऊत म्हणाले आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे राजीनामा देण्यावर ठाम आहेत. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. या पातळीवर काय काय घडामोडी घडतात ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. मान्सूनचं आगमन झालं आहे. राजकीय घडामोडींसह राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Lok Sabha Election 2024 Result 07 June 2024 | “शिंदे गटाचे खासदार चोऱ्यामाऱ्या करुन निवडून आले”, संजय राऊत यांचा आरोप, यासह महत्त्वाच्या बातम्या

17:51 (IST) 7 Jun 2024
सांगली : मनुस्मृतीचे पुरोगामी संघटनांकडून मिरजेत दहन

सांगली : शालेय शिक्षणात मनुस्मृतीतील काही भागाचा समावेश करण्यास विरोध करण्यासाठी शुक्रवारी मिरजेत संविधानवादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवून मनुस्मृतीचे दहन केले.

या देशातल्या हजारो वर्षांच्या सहिष्णुतेच्या संस्कृतीला तडा देत मनुस्मृतीने देशात विषमतेचे, वर्ण व्यवस्थेचे विष पेरले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात नव्याने विषमतेचे विष पेरण्याच्या या निर्णयाला विरोध म्हणून शुक्रवारी मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. या आंदोलनामध्ये राष्ट्र सेवा दल, अनुभव शिक्षा केंद्र, इन्कलाब युथ फाउंडेशन, मराठा सेवा संघ, काँग्रेसचे कार्यकर्ते, समविचारी संस्था, संघटना, पक्ष सहभागी होते. यावेळी रोहित शिंदे, हेरंब माळी, वैष्णवी जाधव, शिवश्री जमादार, पार्थ हेगाने, मिलिंद कांबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

17:50 (IST) 7 Jun 2024
सुनील मेंढेंच्या पराभवास पालकमंत्र्यांची  निष्क्रियताही कारणीभूत… आ. भोंडेकर यांचा  घणाघात….

भंडारा गोंदिया मतदार संघात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना विजयी करणे हे आमचे सामूहिक कर्तव्य होते त्यामुळे या पराभवाची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. सविस्तर वाचा…

17:12 (IST) 7 Jun 2024
बुलढाणा जिल्ह्यात ‘ट्रॅव्हल्स’ उलटली; १७ प्रवासी जखमी

नागपूर कडे भरधाव वेगाने जाणारी खाजगी प्रवासी बस उलटल्याने झालेल्या अपघातात १७ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सविस्तर वाचा…

15:50 (IST) 7 Jun 2024
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये मोटारीची काच तोडून रोकड लंपास

पनवेल ः तळोजा औद्योगिक वसाहतीमधील दीपक फर्टीलायझर कंपनीसमोरील रस्त्यावर उभ्या केलेल्या मोटारीची काच तोडून चोरट्यांनी २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. संजय भोईर यांनी त्यांची मोटार गुरुवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उभी केली होती. कामानिमित्त संजय हे मोटारीतून बाहेर गेले. १० मिनिटांत पुन्हा मोटारीजवळ आल्यावर त्यांना मोटारीची डाव्या बाजूची काच फोडल्याचे दिसले. चोरट्याने संजय यांच्या मोटारीतून दोन लाख रुपयांची रोकड आणि ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट चोरले. याबाबत संजय यांनी तळोजा पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल केला आहे.

15:49 (IST) 7 Jun 2024
सुप्रिया सुळे यांची अजितदादांच्या निवासस्थानी भेट; ‘हे’ आहे कारण

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेल्या सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट दिली.

सविस्तर वाचा…

14:45 (IST) 7 Jun 2024
ताटातूट झाल्याने अस्वस्थ असलेल्या मादी बिबट्यानं अखेर बछड्यास ताब्यात घेऊन…

वर्धा : सेलू तालुक्यातील हिवरा शिवारात गावाकऱ्यांच्या हाती बिबट्याचे पिल्लू लागले होते. अखेर ते पिल्लू व माता बिबट यांची भेट घालून देण्यात वन खात्याच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. गुरुवारी रात्री ते आज पहाटे चार पर्यंत ही घडामोडी चालली.

वाचा सविस्तर…

14:37 (IST) 7 Jun 2024
कल्याणचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना धमकी देणारा अटकेत

कल्याण : कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांना दोन दिवसापूर्वी गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या प्रकाश भीमसेन बनसोडे (५४) या इसमाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर वाचा…

13:47 (IST) 7 Jun 2024
पनवेल महापालिकेला आर्थिक सक्षम बनवून लोकाभिमुख सेवा देण्यास प्राधान्य राहील – आयुक्त मंगेश चितळे 

पनवेल : पनवेल महापालिकेच्या आयुक्त पदाची सुत्रे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी अतिरीक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्याकडून स्वीकारली. आयुक्त पदाच्या खुर्चीला वंदन करुन या पदाची सूत्रे स्वीकारल्यावर आयुक्त चितळे यांनी पालिकेचा विकासाभिमुख कारभार करण्यासाठी पालिकेला आर्थिक सक्षम बनविण्यासोबत लोकाभिमुख पारदर्शक कारभार करु असा मानस व्यक्त यावेळी केला.

सविस्तर वाचा…

13:21 (IST) 7 Jun 2024
नागपुरात काँग्रेसच्या वाढत्या मताधिक्याने भाजप चिंतेत! विधानसभेसाठी काय नियोजन…

नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडक सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. परंतु २०१४ च्या तुलनेत काँग्रेस उमेदवाराने २०२४ मध्ये १५ टक्के अधिक मते मिळवली व भाजपचे मताधिक्य कमी केले. यामुळे विधानसभेची निवडणूक समोर असताना भाजपची चिंता वाढली आहे.

वाचा सविस्तर…

13:20 (IST) 7 Jun 2024
‘नीट’ परीक्षेत मोठा गोंधळ, गुणांमध्ये प्रचंड वाढ! ‘चांगले गुण मिळवूनही दर्जेदार संस्थेत प्रवेश दुरापास्त

नागपूर : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या ‘नीट’ सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होताच देशभर वाद निर्माण झाला आहे. २०२३ मध्ये केवळ दोन विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले असताना यंदा त्यात भर पडून तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले असून ‘पात्रता गुणां’मध्ये (कट ऑफ) प्रचंड वाढ झाली. ७०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला थेट दोन हजारांच्या जवळपास ‘रँक’ मिळणार आहे.

वाचा सविस्तर…

13:18 (IST) 7 Jun 2024
घाटकोपर दुर्घटना: फलकाची सदोष संरचना, ‘व्हीजेटीआय’चा अहवाल मुंबई महापालिका प्रशासनाला सादर

मुंबई : कमकुवत पाया आणि सदोष संरचनेमुळे घाटकोपरमधील छेडानगर परिसरातील महाकाय फलक पडल्याचा अहवाल व्हीजेटीआय संस्थेच्या दोन तज्ज्ञांनी दिला आहे. मुंबईला वादळी वाऱ्याचा धोका असतो.

सविस्तर वाचा…

12:58 (IST) 7 Jun 2024
कपिल पाटील यांच्या पराभवामुळे आलेल्या नैराश्यातून तरूणाची आत्महत्या, शहापूरमधील घटना

कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचा पराभव झाल्यामुळे अस्वस्थ असलेल्या शहापूर तालुक्यातील साजिवली गावातील खैरेपाडा येथील संजय पद्माकर अधिकारी (३५) या भाजपच्या कार्यकर्त्याने बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

सविस्तर वाचा…

12:24 (IST) 7 Jun 2024
समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, सीआरपीएफच्या दोन जवानांचा मृत्यू

यवतमाळ : बीड येथील निवडणूक बंदोबस्त आटपून गडचिरोलीकडे जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवानांच्या वाहनाला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली. ही धक्कादायक घटना धामणगावजवळील समृद्धी महामार्गावर गुरूवारी दुपारी घडली. या अपघातात एक जवान जागीच तर दुसऱ्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वाचा सविस्तर…

12:23 (IST) 7 Jun 2024
१३ वर्षांची मुलगी सहा महिन्यांची गर्भवती, प्रियकराचे नाव…

नागपूर : कामठीतील कुख्यात गुन्हेगाराची १३ वर्षीय मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला डॉक्टरांकडे नेले. तपासणीत मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले. मुलीला गर्भवती झाल्याबाबत विचारणा केली असता ती काहीही सांगण्यास तयार नाही. या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

वाचा सविस्तर…

12:10 (IST) 7 Jun 2024
“मोदींना एनडीएचं सरकार चालवताना नाकीनऊ येतील”; राऊतांचं सूचक विधान

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता एनडीएने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. पुढच्या एक ते दोन दिवसांत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यावरून आता खासदार संजय राऊत यांनी सूचक इशारा दिला. “नरेंद्र मोदी यांना एनडीएचं सरकार चालवताना नाकीनऊ येतील, आम्ही भारतीय जनता पक्षाला बहुमतापासून रोखलं आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आज तुमच्याबरोबर असले तरी उद्या आमच्याबरोबर येतील”, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.

12:01 (IST) 7 Jun 2024
‘म्हाडा’च्या १७३ दुकानांसाठी ५७० अर्ज

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मुंबईतील १७३ दुकानांच्या ई- लिलावासाठी नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृतीची प्रक्रिया अखेर संपुष्टात आली असून या दुकानांसाठी ५७० अर्ज सादर झाले आहेत. आता बोली निश्चित करून ११ किंवा १२ जून २०२४ रोजी १७३ दुकानांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे.

म्हाडाच्या गृहप्रकल्पात काही दुकानांसाठीच्या गाळ्यांची बांधणी करणे बंधनकारक असते. या दुकानांची विक्री संबंधित विभागीय मंडळामार्फत ई-लिलाव पद्धतीने केली जाते. यासाठी अर्ज मागविण्यात येतात आणि म्हाडाच्या मुंबईमंडळाकडून एक बोली निश्चित केली जाते, या बोलीपेक्षा अधिक बोली लावणाऱ्या अर्जदाराला दुकान वितरीत केले जाते. त्यानुसार मुंबई मंडळाने मुंबईतील विविध ठिकाणच्या १७३ दुकानांच्या ई – लिलावासाठी फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध केली होती. १ मार्चपासून नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृतीला सुरुवात करण्यात आली होती. आचारसंहितेमुळे या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढीनुसार ५ जून रोजी नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृतीची मुदत अखेर संपुष्टात आली.

11:59 (IST) 7 Jun 2024
घोडबंदर मार्गवर आज सायंकाळपासून कोंडीमुक्ती, घाट रस्त्याचे काम पूर्ण होणार

ठाणे : घोडबंदर मार्गावरील घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी संपणार होते. परंतु रस्त्याचे डांबरीकरण अद्यापही शिल्लक असल्याने हे काम आज, शुक्रवारी सायंकाळी पूर्ण होणार आहे. त्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत केली जाईल अशी माहिती ठाणे वाहतुक शाखा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

सविस्तर वाचा…

11:33 (IST) 7 Jun 2024
धक्कादायक! कसब्यात घटस्फोटीत महिलेच्या दुसऱ्या पतीचा कोयत्याने वार करून खून; गुंड राजा मारटकरच्या मुलासह साथीदारावर गुन्हा

पुणे : पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरा विवाह केल्याने खडकी बाजारातील गुंड राजा मारटकर याच्या मुलाने तरूणाचा खून केल्याची धक्कादायक घटना कसबा पेठेतील पवळे चौक परिसरात घडली. घरात शिरून आरोपी आणि त्याच्या साथीदाराने तरुणावर कोयत्याने वार केले. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी गंभीर जखमी झाली.

वाचा सविस्तर

11:20 (IST) 7 Jun 2024
६ कोटींचा धानखरेदी घोटाळा, तत्कालीन व्यवस्थापकासह कनिष्ठ सहायकास अटक

गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या धान खरेदीत ६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महामंडळाचे गडचिरोली येथील तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांच्यासह महामंडळाच्या तत्कालिन कनिष्ठ सहायकास अटक केली आहे. न्यायालयाने दोघांनाही १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वाचा सविस्तर…

11:02 (IST) 7 Jun 2024
३०० कोटींच्या मालमत्तेच्या वाद, सुनेनेच दिली सासऱ्याच्या खुनाची सुपारी

नागपूर : जवळपास ३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या वादातून एका वृद्धाची सुपारी देऊन हत्या करण्यात आली. वृद्धाला कारने धडक देऊन अपघाताचा बनाव करण्यात आला. मृतकाच्या चुलत भावाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर…

11:01 (IST) 7 Jun 2024
थरार! शेतकऱ्याचा हल्ला अन् चवताळलेल्या बिबट्याकडून पाठलाग…

वर्धा : सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प वन्यजीव व मनुष्य यातील संघर्षाने नेहमी चर्चेत असतो. गावांचे पुनर्वसन करण्याची सातत्याने मागणी होते. मात्र अद्याप हालचाल नाहीच. त्यातूनच गुरुवारी रात्री घडलेली घटना गावकरी मंडळीचा रोष ओढविणारी ठरली.

वाचा सविस्तर…

फडणवीस यांची नागपुरात संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा (image credit – Devendra Fadnavis/fb)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींनी पराभवाची मीमांसा केली पाहिजे असं म्हटलं आहे. तसंच एनडीए प्रणित सरकार स्थापन करण्याचा दावा होत असला तरीही असं सरकार टिकणार नाही असंही संजय राऊत म्हणाले आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे राजीनामा देण्यावर ठाम आहेत.