2024 Lok Sabha Election Result Updates : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागला आहे. या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. मात्र, ४०० पारचा नारा दिलेल्या भाजपाला २४० जागांवरच समाधान मानावं लागलं. तर इंडिया आघाडीला २३३ जागा मिळाल्या आहेत. यानंतर आता एनडीएने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीचीही बैठर पार पडली असून इंडिया आघाडीकडूनही हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या आहेत तर महायुतीला १७ जागांवर समाधान मानावं लागलं. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठांकडे आपल्याला सरकारमधून मोकळं करावं, असं विधान केलं. त्यानंतर ते उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. आज शरद पवार गटाच्या नवनियुक्त खासदारांची बैठक आहे. दरम्यान, देशात आणि राज्यात राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा एका क्लिकवर…

Live Updates

Lok Sabha Election 2024 Result Live Update Today, 06 June 2024

19:38 (IST) 6 Jun 2024
कोल्हापूर : शिवतीर्थ जीर्णोद्धाराचे काम रखडल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाडमध्ये उपोषण

कोल्हापूर : कुरुंदवाड येथील शिवतीर्थाच्या जीर्णोद्धाराचे काम रखडल्याच्या निषेधार्थ गुरुवारी धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास समिती, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गुरुवारी लाक्षणिक उपोषण केले.

जून महिन्यामध्ये या शिवतीर्थाच्या १ कोटी खर्चाच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीमध्ये झाला होता. या कामाला गती मिळाली नसल्याने शिवराज्याभिषेक दिनी आंदोलन करण्याचा इशारा पालिकेला दिला होता.

आजच्या उपोषणात समितीचे अमृत पोकळे, सागर पाटील, हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. निवेदन दिले की तोंडाला पाने पुसण्याचे काम सहा महिने सुरु आहे. लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

19:36 (IST) 6 Jun 2024
राज्यात आनंद सरींचा वर्षाव; मोसमी पाऊस दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्रात दाखल

गोव्याच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील मोसमी पावसाची शाखा वेगाने पुढे वाटचाल करीत आहे.

सविस्तर वाचा...

19:26 (IST) 6 Jun 2024
कृष्णा खोऱ्यातील ९०० धरणे सुरक्षित, जलसंपदा विभागाकडून धरणांची तपासणी

जलसंपदा विभागाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी सर्व प्रकारच्या धरणांच्या सुरक्षिततेची तपासणी केली जाते.

सविस्तर वाचा...

19:18 (IST) 6 Jun 2024
मुंबई: रस्ते कामांसाठी आता १० जूनची अंतिम मुदत, पावसापूर्वी रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश

शहर आणि उपनगरात सुरू असलेली रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंत्राटदारांना आता १० जूनची अंतिम मुदत दिली आहे.

सविस्तर वाचा...

19:09 (IST) 6 Jun 2024
सोलापुरात शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह; शिंदे पिता-पुत्रींनी केले अभिवादन

सोलापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सोलापुरात शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यासह तेथील उत्सव मूर्तीला अभिवादन करण्यासाठी गर्दी उसळली होती. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी आपले वडील तथा ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवछत्रपती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

18:58 (IST) 6 Jun 2024
मुंबईत २३९ ‘आपला दवाखाना’ सुरू, आतापर्यंत ५७ लाख रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

खासगी निदान केंद्रांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या दरात एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय या सेवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा...

18:50 (IST) 6 Jun 2024
पुनर्मूल्यांकनाचा निकाल रखडला; मात्र ‘एटीकेटी’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेचे नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात

पुनर्मूल्यांकनाच्या निकालाची अद्यापही प्रतीक्षा असल्यामुळे ‘एटीकेटी’ परीक्षेसाठी जायचे का ? असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

सविस्तर वाचा...

18:38 (IST) 6 Jun 2024
देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, थोड्याच वेळात अमित शाहांची भेट घेणार

देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत आपल्याला सरकारमधून मुक्त करावं, असं सूचक विधान केलं होतं. त्यानंतर ते उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा आहेत. त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहचले आहेत. ते थोड्याच वेळात अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

18:33 (IST) 6 Jun 2024
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी २ हजार कोटींचा निधी द्या, छत्रपती संभाजीराजे यांची मागणी

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने २ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

सविस्तर वाचा...

18:26 (IST) 6 Jun 2024
विश्वजित कदमांची जयंत पाटील यांच्यावर मात ?

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत काँंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष मैदानात उतरून विजय संपादन केला एवढाच या निकालाचा अर्थ नसून जिल्ह्याचे किंबहुना पश्‍चिम महाराष्ट्रातील नेतृत्व कोणाचे याचा फेसला करणारी निवडणूक ठरली.

सविस्तर वाचा...

17:56 (IST) 6 Jun 2024
स्टॉक मार्केटमध्ये सर्वात मोठा घोटाळा : राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आधी एक्झिट पोल समोर आले होते. या सर्व एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पार्टीला ३०० च्या आसपास जागा दाखवल्या होत्या. त्यानंतर शेअर मार्केट अचानक मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. मात्र, ४ जूनला निवडणुकीच्या दिवशी दिवशी शेअर मार्केट खाली पडलं होतं. आता यावरकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाष्य केलं असून स्टॉक मार्केटमध्ये सर्वात मोठा घोटाळा झाला असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

17:44 (IST) 6 Jun 2024
मुंबई: महाराष्ट्र सदन प्रकरणातील झोपडीवासीयांची इमारत धोकादायक घोषित! गच्चीवर बुलडोझर नेऊन इमारतीचे पाडकाम

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना तुरुंगवास भोगावा लागलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणातील १५ वर्षे जुनी इमारत महापालिकेने धोकादायक घोषित केली आहे.

सविस्तर वाचा...

17:44 (IST) 6 Jun 2024
फ्रान्सच्या संसदेत डॉ. जयंत आठवले 'भारत गौरव पुरस्कारा’ने सन्मानित

कोल्हापूर : सुलभ भाषेत अध्यात्माचा प्रसार करून समाजाला दिशादर्शन करणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना फ्रान्सच्या सीनेटमध्ये (संसदेमध्ये) ‘भारत गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

17:43 (IST) 6 Jun 2024
मुंबई: कामा रुग्णालयात आता आयुर्वेदिक उपचार, बाह्यरुग्ण विभाग सुरू

कामा रुग्णालयामध्ये आयुर्वेदिक बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, रुग्णालयातील हा विभाग नुकताच सुरू करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

17:17 (IST) 6 Jun 2024
नागपूर लोकसभा निवडणूकीत बसपच्या मतांमध्ये घट, सलग चौथ्या निवडणूकीत…

नागपूरसह महाराष्ट्रातील बसपाच्या उमेदवारांसाठी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी नागपुरात सभाही घेतली.

सविस्तर वाचा...

17:16 (IST) 6 Jun 2024
पवईमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पोलिसांवर दगडफेक, संतप्त जमावाकडून जोरदार घोषणाजी; अनेकजण जखमी

दोन महिन्यांपूर्वी संबंधित परिसरात आग लागली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने या भागातील रहिवाशांना जागा रिकामी करण्याची नोटीस पाठवली होती.

सविस्तर वाचा...

16:56 (IST) 6 Jun 2024
वैद्यकीय उपचारासाठी आता आभा कार्ड आवश्यक, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा निर्णय

आता सर्व नागरिकांना आभा कार्ड काढणे आवश्यक आहे. रुग्णालयांचे मूल्यांकन, रुग्ण आणि संबंधित वैद्यकीय सामग्रसाठी आभा कार्डची नोंदणी ग्राह्य धरली जाणार आहे.

सविस्तर वाचा...

16:42 (IST) 6 Jun 2024
Maharashtra Monsoon Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून होणार

राज्यमंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. तसेच राज्याचं पावसाळी अधिवेशन हे २७ जूनपासून होणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

16:38 (IST) 6 Jun 2024
देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, अमित शाहांची भेट घेणार

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या घडामोडी वाढल्या आहेत. एनडीएने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत आपल्याला सरकारमधून मुक्त करावं, असं सूचक विधान केलं होतं. त्यानंतर ते उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा आहेत. त्या संदर्भात आज देवेंद्र फडणवीस वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. ते दिल्लीत अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

16:32 (IST) 6 Jun 2024
Nationalist Congress Party : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन दिन १० तारखेला अहमदनगरमध्ये होणार

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर नवनिर्वाचित खासदारांची ओळख राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करून दिली. तसेच या बैठकीला सुप्रिया सुळे आणि नगरचे खासदार निलेश लंके नियोजित कार्यक्रमामुळे अनुपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन दिन १० तारखेला अहमदनगरमध्ये होईल, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

16:29 (IST) 6 Jun 2024
नवी मुंबई : पालिका विद्यार्थ्यांना यंदा वेळेवर गणवेश

नवी मुंबई : मागील वर्षी शालेय साहित्य आणि गणवेश वाटपात कोणताही घोटाळा अथवा भ्रष्टाचार होऊ नये म्हणून महापालिकेने ई-रुपीच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून शालेय गणवेश आणि साहित्य देण्यात येणार होते, परंतु अनेक त्रुटींमुळे नियोजन बारगळले होते. विद्यार्थ्यांना केवळ गणवेश आणि पाठ्यपुस्तके देण्यात आली होती. यंदा मात्र शाळा सुरू होताच पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्य देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती शिक्षण विभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सविस्तर वाचा...

16:07 (IST) 6 Jun 2024
भाजपा नेते नारायण राणे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांचा मोठ्या मताधिक्यांनी वियज झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली होती. या निवडणुकीत नारायण राणे यांचा विजय झाल्यानंतर आता ते राज ठाकरे यांची आज भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत.

16:02 (IST) 6 Jun 2024
मोसमी पावसाचे आगमन, की नुसतीच घाई..!

फक्त केरळमध्ये मोसमी पावसाच्या आगमनाचा अंदाज बरोबर असतो. मात्र, महाराष्ट्रात त्याच्या आगमनाची घोषणा करण्याची घाईच केली जाते.

सविस्तर वाचा...

15:52 (IST) 6 Jun 2024
भाजप आमदारांच्या मतदारसंघातच शिवसेनेला फटका…बावनकुळेंच्या कामठीतही…

आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणारे उमेदवार राजू पारवे यांचा दारुण पराभव झाला. पारवे उमरेड विधानसभेचे आमदार होते.

सविस्तर वाचा...

15:44 (IST) 6 Jun 2024
उरणमध्ये १५ गावांना पुराचा धोका, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा जाहीर

उरण : पावसाळी काळात प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा जाहीर केला असून तीन गावे दरडग्रस्त तर १५ गावांना अतिवृष्टीमुळे पुराचा धोका आहे. उरण तालुक्यात एकूण ६२ गावे आणि ३५ ग्रामपंचायती आहेत. पावसाळ्यात येणाऱ्या आपत्तीचे निराकरण करण्यासाठी उरणचे प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी नियंत्रण कक्षही तयार केला आहे.

सविस्तर वाचा...

15:42 (IST) 6 Jun 2024
अमरावती: ‘त्‍यांनी’ चक्‍क स्‍मशानभूमीत सुरू केले उपोषण, एका उपोषणकर्त्‍याची प्रकृती….

मालमत्ता संबंधितांच्या नावांवर न चढविल्याने संबंधित रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच त्यांनी चक्क स्मशानभूमीत उपोषण सुरु केले आहे.

सविस्तर वाचा...

15:33 (IST) 6 Jun 2024
“महाविकास आघाडी कारस्थान करून शकुनी नितीने जिंकली”, पराभवानंतर बावनकुळेंची टीका

आम्ही विकसित भारतासाठी मत मागितले होते मात्र या निवडणुकीत जातीवाद जिंकला आणि विकासाचा पराभव झाला असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा...

15:30 (IST) 6 Jun 2024
उरणमधून महाविकास आघाडीला मताधिक्य, निकालातून विधानसभेची नांदी

उरण : मंगळवारी लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने मताधिक्य मिळविले आहे. या मतदारसंघात भाजपचे अपक्ष विद्यमान आमदार असताना महाविकास आघाडीने अधिकची मते घेतल्याने जोरदार चर्चा सुरू आहे.

सविस्तर वाचा...

15:21 (IST) 6 Jun 2024
रुंंदीकरण केलेल्या ठाण्यातील रेल्वे फलाटावर पावसाच्या पाण्याचे तळे, लोकलमध्ये चढताना प्रवाशांची कसरत

६२ तासांचा मेगाब्लाॅक घेऊन ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहाचे रुंदीकरण करण्यात आले. कमी कालावधीत केलेल्या या कामांचा सर्वस्तरातून गौरव झाला. आता पाऊस पडल्यावर या रुंदीकरण केलेल्या फलाटावर पावसाच्या पाण्याचे तळे साचते.

वाचा सविस्तर...

15:08 (IST) 6 Jun 2024
वर्धा: ‘या’ एकच मतदारसंघाने दाखविली काळे यांना गळती तर तडस यांना बढती; कारण काय?

अमर काळे खासदार झालेत. पण त्यांनी घोषित केलेला एक लाख मताधिक्याचा आकडा मात्र ते पार करू शकले नाही.

सविस्तर वाचा...

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत. यावेळी शरद पवार त्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील घडामोडीबद्दलही ते बोलण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar and Sharad Pawar

अजित पवार आणि शरद पवार

Story img Loader