2024 Lok Sabha Election Result Updates : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागला आहे. या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. मात्र, ४०० पारचा नारा दिलेल्या भाजपाला २४० जागांवरच समाधान मानावं लागलं. तर इंडिया आघाडीला २३३ जागा मिळाल्या आहेत. यानंतर आता एनडीएने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीचीही बैठर पार पडली असून इंडिया आघाडीकडूनही हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या आहेत तर महायुतीला १७ जागांवर समाधान मानावं लागलं. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठांकडे आपल्याला सरकारमधून मोकळं करावं, असं विधान केलं. त्यानंतर ते उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. आज शरद पवार गटाच्या नवनियुक्त खासदारांची बैठक आहे. दरम्यान, देशात आणि राज्यात राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा एका क्लिकवर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Lok Sabha Election 2024 Result Live Update Today, 06 June 2024

15:07 (IST) 6 Jun 2024
धानोरकर यांच्या विजयात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आ.सुभाष धोटे यांची भूमिका महत्त्वाची, तिकीट मिळविण्याच्या संघर्षात…

चंद्रपूर : बहुजन, दलित, मुस्लिम समाजाची गठ्ठा मते, मोदी विरोधी लाट तथा राज्य व केंद्र सरकारच्या फोडाफोडीचे राजकारणाला कंटाळलेले मतदार अशा विविध कारणांनी या लोकसभा मतदार संघात प्रतिभा धानोरकर २ लाख ६० हजारांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या.

सविस्तर वाचा…

15:06 (IST) 6 Jun 2024
छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल चकमक, स्फोटके नष्ट

गडचिरोली : तेंदूपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलावून पैसे उकळण्याचा नक्षल्यांचा डाव उधळून लावत जवानांनी त्यांचा तळ उध्वस्त केला.यावेळी घातक स्फोटके घटनास्थळीच नष्ट केली. नक्षल्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.

सविस्तर वाचा…

15:05 (IST) 6 Jun 2024
चंद्रपूर : ताई कन्नमवार यांच्यानंतर सहा दशकानंतर प्रतिभा धानोरकर ठरल्या दुसऱ्या महिला खासदार

चंद्रपूर : तब्बल सहा दशकानंतर चंद्रपूर लोकसभा मतदार संघाला प्रतिभा धानोरकर यांच्या रूपाने दुसरी महिला खासदार मिळाली आहे.यापूर्वी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व माजी मुख्यमंत्री स्व. मारोतराव कन्नमवार यांच्या पत्नी ताई कन्नमवार यांनी केले आहे.

सविस्तर वाचा…

15:04 (IST) 6 Jun 2024
तब्बल ४० तोळे दागिने व २७ लाखांच्या रोख रकमेवर डल्ला! मानलेला भाऊ व त्याच्या पत्नीने…

नागपूर : मानलेला भाऊ आणि त्याच्या पत्नीने बिल्डरकडील २७ लाख रोख आणि ४० तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढला. ही खळबळजनक घटना मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत घडली. या प्रकरणी बिल्डरच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भाऊ आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

सविस्तर वाचा…

15:03 (IST) 6 Jun 2024
पुणे : आरोपी अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातच मुक्काम, बाल न्याय मंडळाचा आदेश; कल्याणीनगर अपघात प्रकरण

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला १२ जूनपर्यंत बालसुधारगृहातच ठेवण्याचा आदेश बाल न्याय मंडळाने बुधवारी दिला. मुलाचे समुपदेशन करण्यात येत असून, सुधारगृहातून सुटका झाल्यास त्याच्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सविस्तर वाचा…

15:03 (IST) 6 Jun 2024
‘आरटीई’ घोटाळा : शाहिदचा भाऊ राजाला शरीफला रविवारपर्यंत पोलीस कोठडी

नागपूर : आरटीईअंतर्गत शाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शाहिद शरीफ हा अद्याप फरार असला तरी सदर पोलिसांनी त्याचा भाऊ राजा शरीफला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपासात तो पोलिसांना सहकार्य करीत नाही.

सविस्तर वाचा…

15:02 (IST) 6 Jun 2024
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेश यंदा आव्हानात्मक… झाले काय?

पुणे : सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशांसाठी यंदा मोठ्या प्रमाणावर चुरस असेल. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेच्या (नीट) निकालात ‘गुण’वंतांची संख्या प्रचंड वाढल्याने ‘नीट’मध्ये उत्तम गुण मिळवलेल्यांनाही सरकारी महाविद्यालयांतील प्रवेश दूरचा ठरण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

15:01 (IST) 6 Jun 2024
NCP Sharad Pawar Group Meeting : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची मुंबईत बैठक सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची मुंबईत बैठक सुरू झाली असून नवनिर्वाचित खासदारांना शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काही महत्वाच्या सूचना देण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील घडामोडीबद्दलही ते बोलण्याची शक्यता आहे.

15:01 (IST) 6 Jun 2024
वर्धा : अमर काळे यांच्या विजयाचे पडद्यामागील ‘हे’ आहेत सूत्रधार

वर्धा : उमेदवाराचा विजय होण्यामागे अनेक कारणे असतात. पक्ष, पैसा, पदाधिकारी, पक्षनेते, पोहोच अशी विविध कारणे सांगितल्या जातात. मात्र, पडद्यामागे पण काही सूत्रधार मनापासून झटत असतात.

सविस्तर वाचा…

14:59 (IST) 6 Jun 2024
आढळरावांना ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांनीच रोखले?

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीच्या शिवाजी आढळराव पाटील यांचा एक लाख ४० हजार ९५१ मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा दिमाखात दिल्लीवर स्वारी केली.

सविस्तर वाचा…

14:59 (IST) 6 Jun 2024
कल्याण पूर्वेत काटेमानिवलीत दोन गटांच्या राड्यात घरे आणि वाहनांची तोडफोड

कल्याण पूर्वेत काटेमानिवली महालक्ष्मी शाॅपिंंग सेंटर भागात बुधवारी रात्री दोन गटात पूर्व वैमनस्यातून तुफान हाणामारी झाली. यावेळी या गटांनी परिसरातील घरांवर, महावितरणच्या रोहित्रावर, परिसरात उभ्या केलेल्या वाहनांंवर दगडी मारून, लाकडी दांडक्याने वाहनांचा काचा फोडून परिसरातील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे.

वाचा सविस्तर…

14:57 (IST) 6 Jun 2024
गोंडवाना विद्यापीठात तब्बल १.४६ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार, चार लिपिकांचा सहभाग

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या वित्त विभागात कार्यरत तृतीय श्रेणी तीन लिपिकांनी सिनेट सदस्य, विविध प्राधिकरणांचे सदस्य तसेच प्राध्यापकांच्या प्रवास भत्त्यांच्या देयकाची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात वळती न करता स्वत:च्या खात्यात वळती करून १.४६ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उजेडात आले आहे.

सविस्तर वाचा…

14:57 (IST) 6 Jun 2024
बळवंत वानखडे यांना अमरावतीकरांनी दिलेली साथ ठरली निर्णायक

काँग्रेसचा बालेकिल्‍ला राहिलेला अमरावती मतदार संघ १९९० च्‍या दशकात काँग्रेसच्‍या हातून निसटला.

सविस्तर वाचा…

14:55 (IST) 6 Jun 2024
शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपला धोक्याचा इशारा; मताधिक्य घटल्याचा काँग्रेसला फायदा

पुणे : लोकसभा निवडणूक निकालात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य घटल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे.

सविस्तर वाचा…

14:54 (IST) 6 Jun 2024
वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा पराभव भाजपसाठी चिंतेचा विषय

चंद्रपूर : मोदी विरोधी लाट, शेतकरी, शेतमजुरांची नाराजी, बहुजन, दलित व मुस्लीम समाजाची विरोधात गेलेली गठ्ठा मते, महागाई, बेरोजगारीसोबतच संविधान बदलाचा घरोघरी झालेला प्रचार यामुळेच कोट्यवधींची विकास कामे करूनही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा २ लाख ६० हजार मतांनी पराभव झाला.

सविस्तर वाचा…

14:53 (IST) 6 Jun 2024
लसीकरणानंतर लहान मुलांना पॅरासिटामॉल द्या! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून योग्य मात्रा जाहीर; पुरेसा साठा ठेवण्याचेही निर्देश

पुणे : लहान मुलांना लसीकरणानंतर अनेक वेळा ताप येतो. त्यावेळी डॉक्टरांकडून पॅरासिटामॉल औषध देण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, लहान मुलांना या औषधाची नेमकी किती मात्रा द्यावयाची याबाबत स्पष्टता नव्हती.

सविस्तर वाचा…

14:52 (IST) 6 Jun 2024
उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण नाशिक, जालना, नागपुरात; ‘या’ जिल्ह्यात मृत्यूची नोंद…

नागपूर : राज्यातील काही भागात उन्हाचा प्रकोप कायम असून यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताची रुग्णसंख्या ३१८ वर पोहचली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे नाशिक, जालना, नागपुरात नोंदवले गेले.

सविस्तर वाचा…

14:51 (IST) 6 Jun 2024
पिंपरी : पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड शहर तुंबणार?

पिंपरी : पावसाला सुरुवात झाली, तरी पिंपरी-चिंचवड शहरातील नालेसफाई पूर्ण झाली नसल्याने आयुक्त शेखर सिंह यांनी नालेसफाईची पाहणी केली. नालेसफाईला गती देऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

सविस्तर वाचा…

14:39 (IST) 6 Jun 2024
मुंबई: ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील स्थानकांजवळ आणखी २६०० झाडे

आता इतर स्थानकांजवळ २६०० झाडे लावण्यात येणार आहेत. एमएमआरसीने मुळ जागी वृक्षारोपण करण्यासाठी तीन कंत्राटे दिली आहेत.

सविस्तर वाचा…

14:38 (IST) 6 Jun 2024
एका सामान्य शिक्षकाच्या विजयाची सर्वत्र चर्चा

सामान्य शिक्षकाला जनतेतून केवळ भरभरून मते मिळाली नाही तर, ज्या ज्या गावात ते प्रचाराला गेले, तिथे झोळीत शक्य तितका निधी संकलित करून दिला गेला.

सविस्तर वाचा…

14:32 (IST) 6 Jun 2024
पालिका सीबीएसई शाळा प्रवेशासाठी १०४२ अर्ज

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळांना मोठी मागणी असून त्याच्या प्रवेशासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडते. महापालिकेने प्रवेशासाठी लिंक पाठवली होती. नवी मुंबई महापालिकेच्या सीवूड्स सेक्टर ५० येथील शाळा क्रमांक ९३, कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक ९४ व सारसोळे येथील शाळा क्रमांक ९८ येथील शाळांमध्ये सन २४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी ते इयत्ता ७ वी च्या वर्गातील रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यासाठी ४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. सीबीएसई शाळांमधील प्रवेशासाठी १०४२ अर्ज लिंकद्वारे प्राप्त झाले आहेत.

14:31 (IST) 6 Jun 2024
पनवेलमध्ये ४८ उद्यानांत ११०० वृक्षांचे रोपण

पनवेल : जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने पनवेल महापालिकेच्यावतीने शहरातील ४८ विविध उद्यानांमध्ये तब्बल ११०० वृक्षांच्या रोपणाचा कार्यक्रम पालिकेने बुधवारी हाती घेतला. पनवेल महापालिका आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या हस्ते खारघर वसाहतीमधील सेक्टर १२ मधील आद्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

14:22 (IST) 6 Jun 2024
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या शुभेच्छा फलकांनी कल्याण, डोंबिवली शहरांचे विद्रुपीकरण; प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना फलक न काढण्यासाठी दमदाटी

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विजयी उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पक्षाच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवकांमध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे. सविस्तर वाचा…

14:16 (IST) 6 Jun 2024
Ahmadnagar Politics : निलेश लंकेंच्या स्वीय सहाय्यकावर पारनेरमध्ये जीवघेणा हल्ला, पोलिसांचा फौजफाटा तैनात

अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे स्वीय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पारनेरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यावर अद्याप प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पारनेरमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात कऱण्यात आला आहे.

14:10 (IST) 6 Jun 2024
पवईत पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक

मुंबईतील पवईत पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. तेथील झोपडपट्टीवाशियांनी ही दगडफेक केली असल्याची माहिती समोर येत आहे. येथील झोपडपमध्ये कारवाई सुरु असताना ही दगडफेक झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

14:00 (IST) 6 Jun 2024
Lok Sabha Election Result Updates : दिल्लीत मोठ्या हालचाली, फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याआधी विनोद तावडे अमित शाहांच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता दिल्लीत मोठ्या घडामोडी वाढल्या आहेत. एनडीएने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे लवकरच पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या हालचाली सुरु आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा आहेत. त्या संदर्भात दिल्लीच्या दौऱ्यावर ते जाणार आहेत. मात्र, त्याआधी विनोद तावडे यांनी अमित शाह यांची भेट घेतली असून त्या भेटीत काय चर्चा होते? याकडे लक्ष लागलं आहे.

13:55 (IST) 6 Jun 2024
बीडच्या गेवराईत पवनचक्की कोसळली

बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील पालख्या डोंगराजवळ असलेल्या टेंभी तांडा परिसरातील पनामा कंपनीची २४ नंबरची पवनचक्की गुरुवारी सकाळी कोसळली. यामध्ये पवनचक्कीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. २४ नंबरची पवनचक्की कोसळण्या कारणामागचा शोध घेतला जात आहे.

बीड जिल्ह्यात गेवराई, केज तालुक्यातील विहा मांडवा आदी भागात पवनचक्क्या असून, काही ठिकाणी नव्याने उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे.

13:25 (IST) 6 Jun 2024
‘वंचित’ आघाडीची मतांची टक्केवारी निम्म्यावर

दलित, अल्पसंख्यांक व आलुते-बलुतेदारांचा पक्ष असल्याची शेखी मिरवणाऱ्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’ला लोकसभा निवडणुकीत जबर फटका बसला आहे. सविस्तर वाचा…

13:14 (IST) 6 Jun 2024
सुप्रिया सुळेंच्या अभिनंदनाचे बॅनर न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरमध्ये झळकले

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या अभिनंदनाचे बॅनर न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरमध्ये झळकले आहेत.

13:09 (IST) 6 Jun 2024
महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. देश आणि महाराष्ट्रातील राजकीय गरमागरमीपूर्वी प्रचंड उकाड्याने सगळेच हैराण झाले होते. अशात महाराष्ट्रात वरुणराजाचं आगमन झालं आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज झालं आहे. कोकणातील रत्नागिरीनंतर सोलापूर तसंच पुढे मेडक, भद्राचलम, विजयनगर आणि त्यानंतर बंगालची खाडी असा पाऊस सुरु झाला आहे. हवामान तज्ञ्ज के. एस. होसाळीकर यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे उकाड्याने आणि प्रचंड झळांमुळे त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत. यावेळी शरद पवार त्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील घडामोडीबद्दलही ते बोलण्याची शक्यता आहे.

अजित पवार आणि शरद पवार