2024 Lok Sabha Election Result Updates : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागला आहे. या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. मात्र, ४०० पारचा नारा दिलेल्या भाजपाला २४० जागांवरच समाधान मानावं लागलं. तर इंडिया आघाडीला २३३ जागा मिळाल्या आहेत. यानंतर आता एनडीएने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीचीही बैठर पार पडली असून इंडिया आघाडीकडूनही हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या आहेत तर महायुतीला १७ जागांवर समाधान मानावं लागलं. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठांकडे आपल्याला सरकारमधून मोकळं करावं, असं विधान केलं. त्यानंतर ते उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. आज शरद पवार गटाच्या नवनियुक्त खासदारांची बैठक आहे. दरम्यान, देशात आणि राज्यात राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा एका क्लिकवर…
Lok Sabha Election 2024 Result Live Update Today, 06 June 2024
कांदा क्षेत्र अधिक असलेल्या दिंडोरी, नाशिक, धुळे, शिर्डी, अहमदनगर, शिरूर, धाराशिव, बीड, बारामती अशा जवळपास १० लोकसभा मतदारसंघात कांदा निर्यातबंदीशी संबंधित निर्णयांचा कमी-अधिक परिणाम निकालातून अधोरेखीत झाला. सविस्तर वाचा…
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. त्यानंतर आज सुप्रिया सुळे या बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी बारामतीत सुप्रिया सुळे यांचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी सुप्रिया सुळे यांचं पुण्यात जंगी स्वागत करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाबद्दल विचारमंथन करण्यात येणार आहे. तसंच आगामी निधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या सूचना अजित पवार देण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील नगर व शिर्डी या दोन्ही जागा महायुतीला गमवाव्या लागल्या. या दोन्हीही जागांची जबाबदारी महायुतीने महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर सोपवली होती. त्यातील एक जागा तर मंत्री विखे यांना स्वतःच्या चिरंजीवाच्याच पराभवाने गमवावी लागली.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षासह महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठांनी सराकारमधून आपल्याला मोकळं करावं, असं विधान केलं होतं. त्यानंतर ते दिल्लीत जाऊन नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करत भेटल्यानंतर सविस्तर चर्चा करू, असं म्हटलं असल्याचं सांगितलं जात आहे.
३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं आणि स्वराज्याच्या या छत्रपतींच्या समाधीसमोर नतमस्तक झालो. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशभरातून आलेले असंख्य शिवभक्त उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांनी दिलेले विचार जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि आपली पिढी हे विचार जपतील, जगतील आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवतील, असा विश्वास आहे. सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या लाख लाख शुभेच्छा!
मान झुकवायचीच असेल तर दिल्लीऐवजी इथं रायगडावर झुकवा!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 6, 2024
३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं आणि स्वराज्याच्या या छत्रपतींच्या समाधीसमोर नतमस्तक झालो. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते… pic.twitter.com/xEZV81nwqx
उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळे करून पक्षात जबाबदारी देण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना करण्याचे जाहीर केल्यावर त्यांना वरिष्ठ नेत्यांनी तातडीने नवी दिल्लीत पाचारण केले. सविस्तर वाचा…
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यानंतर आज सुप्रिया सुळे या बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांचं बारामतीत जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यांच्या स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे.
राज्यमंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज सायंकाळी ४ वाजता सह्यात्री अतिथीगृहावर पार पडणार आहे. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या निवडणुकीनंतर ही पहिली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. विधानसभेला याहून मोठं यश मिळेल. आमच्या जागा चोरण्याचा, विजय चोरण्याचा प्रयत्न झाला. अमोल किर्तीकरांच्या जागेसाठी जो प्रयत्न झाला ते अनेक ठिकाणी झालं. विधानसभा निवडणुकीत ते होणार नाही. आम्ही १८० ते १८५ जागा सहज निवडून येऊ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचा सविस्तर बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या शपथविधीच्या सोहळ्यासाठी काही प्रमुख देशाच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी ८ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एनडीएच्या नेत्यांना उद्या भेटीची वेळ दिली असल्याची माहिती आहे. तर चंद्रबाबू नायडू आणि नीतीश कुमार यांच्या पक्षाला ५ मंत्रीपदं दिली जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षासह महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठांनी सराकारमधून आपल्याला मोकळं करावं, असं विधान केलं. त्यामुळे ते राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षासह महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत आपल्याला वरिष्ठांनी सराकारमधून आपल्याला मोकळं करावं, असं विधान केलं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवास्थानी भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर एनडीएने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीएचे नेते आज राष्ट्रपतींची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला बांगलादेच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्रपती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच आणखी काही देशाच्या नेत्यांना निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. तर इंडिया आघाडीला २३३ जागा मिळाल्या आहेत. यानंतर आता एनडीएने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत काल महत्वाची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी एनडीएमधील पक्षातील नेत्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील चुका सुधारून कामाला लागा, असं मोदींनी म्हटलं असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षासह महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत आपल्याला वरिष्ठांनी सराकारमधून आपल्याला मोकळं करावं, असं विधान केलं. त्यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली. तसंच ‘महाराष्ट्रात सुडाच्या भावनेचं, बदल्याचं, राजकारण चालणार नाही’, असा इशारा दिला.
भारतीय जनता पक्षाने देशभरातील खासदारांना उद्या दिल्लीत बोलावले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. एनडीएने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे भाजपाने सतर्कतेची भूमिका घेत सर्व खासदारांना दिल्लीत बोलावलं असल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपाला ६३ जागांचा फटका बसला असून ३०३वरून पक्षाची थेट २४० जागांवर घसरण झाली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी घटकपक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे.
NDA vs INDIA Alliance: उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला आहे. त्यात अयोध्या व वाराणसी भागातील एकूण १४ मतदारसंघांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत. यावेळी शरद पवार त्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील घडामोडीबद्दलही ते बोलण्याची शक्यता आहे.