यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेते अण्णा हजारे यांना पत्र लिहिले असून त्यामध्ये लोकपाल विधेयक आगामी सत्रात संसदेत संमत केले जाईल, असे म्हटले आहे.
गेल्या २२ जानेवारी रोजी अण्णा हजारेंनी सोनिया गांधींना पत्र लिहिले होते त्याला उत्तर देताना त्यांनी असे म्हटले आहे. ७४ वर्षीय अण्णा हजारेंनी लोकपाल विधेयक संसदेमध्ये मान्य करण्यासाठी दिरंगाई केल्याबदद्ल कॉंग्रेसवर आरोप केले होते आणि या विधेयकाचा नवीन मसूदा तयार करण्यासाठी लोकांना आमंत्रित करावे अशी मागणीही त्यांनी केली होते.  
अण्णा हजारेंचे जवळचे सहकारी दत्ता आवरी म्हणाले की, २५ जानेवारीला दुपारी अण्णा हजारेंना फॅक्सद्वारे एक पानी पत्र पाठवण्यात आले आहे.
राळेगणसिध्दी येथे हजारे म्हणाले की, मला सोनिया गांधी यांच्याकडून पत्र मिळाले आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयातूनही मला दोन दिवसांपूर्वी पत्र मिळाले आहे. येत्या अधिवेशनात ते लोकपाल विधेयक संसदेत मांडतील असे आश्वासन त्यांनी मला या पत्रांद्वारे दिले आहे. तसेच अ, ब, क आणि ड दर्जाच्या अधिका-यांनाही लोकपालच्या छत्राखाली आणले जाईल अशी खात्री त्यांनी मला दिली आहे.
२०११ साली लोकसभेद्वारे भ्रष्टाचारविरोधी विधेयक संमत करण्यात आले, परंतू राज्यसभेमध्ये विरोधी पक्षांच्या विरोधामुळे आणि काही बाबींवर यूपीएच्या घटकपक्षांनी घेतलेल्या आक्षेपामुळे ते संमत होण्यास त्याला भरपूर दिव्यातून जावे लागले.
३० जानेवारी रोजी पटना येथून अण्णा हजारे आपल्या देशव्यापी दौ-याला सुरूवात करणार आहेत .   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा