देशात २०२४ साली होणाऱ्या निवडणुकांसाठी ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ आघाडीनं तयारीला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. अशातच महायुतीचं काळजी वाढवणारा धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. यानुसार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुसंडी मारेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के अधिक मते मिळतील, असंही सर्व्हेत सांगण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्या पार्श्वभूमीवर एबीपी-सी व्होटर्सनं सर्व्हे केला आहे. त्यात २ लाखांहून अधिक नागरिकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. या सर्व्हेतील आकडे महाविकास आघाडीसाठी दिलासादायक तर भाजपासह शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाची काळजी वाढवणारे आहेत.

२०१९ साली शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर येत महाविकास आघाडीच्या नावाखाली सरकार स्थापन केलं. पण, २०२२ मध्ये शिवसेना आणि २०२३ जून मध्ये राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार गटाला बरोबर घेतल्यानं भाजपाची ताकद वाढल्याचं बोललं जातं. पण, सर्वेतून वेगळीच आकडेवारी समोर आली आहे.

सर्व्हेत काय?

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आहे. तर, महायुतीत शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपा आहे. सर्व्हेनुसार लोकसभेला महाविकास आघाडीला २६ ते २८ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, महायुतीला १९ ते २१ जागा मिळतील. अन्य पक्षांना २ जागा मिळतील, असं सर्वेत सांगण्यात आलं आहे.

कुणाला किती मते?

मतांच्या टक्केवारीतही महाविकास आघाडी वरचढ दिसत आहे. महाविकास आघाडीला ४१ टक्के मते मिळू शकतात. तर, महायुतीला ३७ आणि बाकी पक्षांना २२ टक्के मते मिळतील, असं अंदाज सर्वेत म्हटलं गेलं आहे.