महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशात गंगेतून वाहून गेलेल्या ५० मृतदेहांची चर्चा झाली पण बीडमध्ये एका व्हॅनमध्ये कोंबून भरलेल्या २२ मृतदेहांची चर्चा झाली नाही, असं राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यामध्ये प्रचार करण्यासंदर्भातील एक यंत्रणा उभारण्यात आली असून त्या माध्यमातून काम केलं जात असल्याची टीका करताना फडणवीस यांनी उत्तर प्रदेश आणि बीडमधील घटनेची तुलना केली. ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारने उभारलेल्या या प्रचारकी यंत्रणेला इकोसिस्टीम असं म्हटलं.

महाराष्ट्र सरकार रोज सकाळी एखादी खोटी किंवा दिशाभूल करणारी बातमी सोडून ती इकोसिस्टीमच्या माध्यमातून वाजवते असा आरोप फडणवीस यांनी केलाय. मात्र समाज माध्यमांवर सर्वात मोठी इकोसिस्टीम भाजपाची असतानाच महाराष्ट्र सरकारच्या या इकोसिस्टीमला उत्तर देण्यास भाजपाची इकोसिस्टीम कमी पडली का?, असा प्रश्न लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विचारला असता भाजपावर कितीही टीका करु शकता. समाज माध्यमे आणि प्रसारमाध्यमे भाजपावर हवी तेवढी टीका करु शकतात, त्यासंदर्भात कुठलीच अडचण नाहीय. मात्र शिवसेनेच्याविरुद्ध, मुख्यमंत्र्यांच्याविरुद्ध किंवा महाराष्ट्र सरकारच्या विरोधात एक जरी पोस्ट टाकली तरी नोटीस देण्यात येते. आमच्या १० हजार कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारे नोटीस देण्यात आल्या आहेत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील करोना कामाचं, ‘मुंबई मॉडेल’चं कौतुक केल्याचा पुरावा काय?; फडणवीसांचा सवाल

याच संदर्भात पुढे बोलताना फडणवीस यांनी उत्तर प्रदेश आणि बीडमधील घटनेची तुलना केली. उत्तर प्रदेशमधील ५० मृतदेह गंगेमधून वाहत बिहारमध्ये गेले. हे चुकीचंच आहे. याचं कोणी समर्थन करु शकत नाही. पूर्वीचीही प्रथा आहे. मग जुने व्हिडीओ समोर आले. जुन्या सरकारच्या काळातही लोक मृतदेह टाकायचे. पण हे चुकलं आहे. त्यावर जेवढा ‘बवाल’ झाला. महाराष्ट्रात आपण दोन दोन दिवस त्या गोष्टी चालवल्या. पण बीडमध्ये २२ मृतदेह एका व्हॅनमध्ये कोंबून त्यांची विटंबना करुन स्मशानात नेऊन टाकून दिले. याबद्दल दोन दिवस नाही चाललं. ते ५० मृतदेह जसे चुकीचे आहेत तसेच हे २२ मृतदेह चुकीचे आहेत. इथे मात्र मुंबई मॉडेल आहे आणि तिथे एवढी मोठी चूक बापरे. उत्तर प्रदेश म्हणजे गझब झाला, हे जे काही अंतर आहे. आता याला उत्तर देण्याचा विषय काय आहे. आम्ही स्पष्टीकरण देऊ शकतो. ते त्या त्या वेळी आम्ही देतो. पण आता जी इकोसिस्टीम तयार झालेली आहे त्याला उत्तर देणं मात्र कठीण जातं, असं फडणवीस म्हणाले.

नक्की वाचा >> मनसे भाजपा युती होणार का?; फडणवीस म्हणाले, “मनसेने हिंदुत्व…”

४० टक्के मृत्यू लपवल्याचं बोललो तर गैर काय?

“मुंबईमध्ये ४० टक्के मृत्यू हे इतर कारणांमुळे असल्याचं दाखवलं जात आहे. ज्या देशात ०.७ टक्के आणि महाराष्ट्रात ०.८ टक्के आहेत. पण मुंबईत ४० टक्के असे मृत्यू दाखवले जात असतील आणि माध्यमं प्रश्न विचारणार नसतील तरी मी विचारणार आहे. एकट्या मे महिन्यात २६ हजार मृत्यू झाले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीआर केला गेला, मुंबई पॅटर्न सांगितला जतोय, आकडेवारी दिली जातेय. जुन्या पिकच्या दोन महिन्यातही २६ हजार मृत्यू झाले नव्हते. एका महिन्यात महाराष्ट्रात २६ हजार लोक गेलेले आहेत. मुंबईतील ४० टक्के मृत्यू धडधडीतपणे लपवले जात आहेत. आता याच्यावर मी बोललो तर मी सत्तेकडे जाण्याचा काय प्रश्न आहे?,” असा प्रतिप्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला.

Story img Loader