देशाच्या सर्वांगीण प्रगतीत अत्यंत मोलाचा वाटा असणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या कामगिरीचे मोजमाप करणारा ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ सिद्ध झाला आहे. यानिमित्त मुंबईतल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्देशांक प्रसिद्ध होत आहे. या निर्देशांक प्रक्रियेत अनेक जिल्ह्यांत विविध क्षेत्रांत काही उल्लेखनीय कामगिरी झाल्याचे आढळले. त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव या सोहळ्यात केला जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कार्यक्रमात केला जाणार नऊ जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव

एका बाजूला टोकाची गरिबी आणि दुसरीकडे अमर्याद साधनसंपत्तीची उपलब्धता अशा असमानतेत राज्यातील जिल्हे विभागले गेले आहेत. त्यामुळे त्या सर्वाना एकाच मापात मोजणे अशक्य आणि अन्यायकारकही होते. त्यामुळे शेवटच्या ‘मानव्य विकास निर्देशांका’नुसार राज्यातील जिल्ह्यांची चार गटांत वर्गवारी करण्यात आली. त्यानंतर त्या-त्या गटातील जिल्ह्यांचे तौलनिक विश्लेषण करून प्रत्येक गटातील दोन असे एकूण आठ जिल्हे चांगल्या कामगिरीसाठी निवडले गेले. तसेच प्रगतीच्या फारशा सोयी-सुविधा नसतानाही, तळाला असूनही विविध परिमाणांत लक्षवेधी कामगिरी करणारा एक जिल्हा परीक्षकांनी निवडला. अशा एकूण नऊ जिल्हाप्रमुखांचा यावेळी फडणवीस यांच्या हस्ते गौरव केला जातो आहे.

Live Updates
20:11 (IST) 3 Mar 2023
देवेंद्र फडणवीस यांनी केलं लोकसत्ताच्या उपक्रमाचं कौतुक

'लोकसत्ता जिल्हा निर्देशांका'चं देवेंद्र फडणवीस आणि गौतम ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व विजेत्या जिल्हाधिकाऱ्यांनी फोटोही काढला

19:31 (IST) 3 Mar 2023
‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ याचा आम्हालाही अभ्यासासाठी उपयोग होणार आहे-फडणवीस

'लोकसत्ता जिल्हा निर्देशांक' याचा आम्हालाही अभ्यासासाठी उपयोग होणार आहे. यामध्ये एखादा जिल्हा तळाला आहे त्याला वरती आणण्यासाठी आम्हाला विचार करता येईल. 'लोकसत्ता'च्या या उपक्रमाचे मी आभार मानतो. या डेटाच्या आधारे अनेक मुलभूत बदल आपण घडवू शकतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

19:27 (IST) 3 Mar 2023
पुढचं आयटी कॅपिटल हे नवी मुंबई असणार आहे- देवेंद्र फडणवीस

आज आपण ट्रान्सहार्बर लिंक तयार करतो आहोत. नेक्स्ट आय टी कॅपिटल हे नवी मुंबई असेल. कारण एका पुलाने आपण नवी मुंबईला मुंबईचा भाग करतो आहोत. मेट्रोचे प्रकल्प, कोस्टल रोड या पायाभूत सुविधा आहेत. पायाभूत सुविधा मूलभूत बदल घडवू शकतात. महाराष्ट्राचा जो विकास झाला त्यामध्ये जेएनपीटी बंदराचं महत्त्व वेगळं आहे.

19:18 (IST) 3 Mar 2023
डेटाची अॅक्युरसीही महत्त्वाची आहे- फडणवीस

लोकसंख्येची गणना कोव्हिडमुळे होऊ शकली नाही. पण त्यामुळे समोर येणारा डेटा किती महत्त्वाचा आहे ते आपल्याला लक्षात येतं. ३० कोटी लोकांपर्यंत शुद्ध पाणी पोहचत नाही ही बाबही डेटामुळेच समोर आली. बेघरांची संख्याही डेटामुळेच समोर आली, त्यानंतर त्यांना घरं देण्याची योजना तयार करता आली. हे सगळं असलं तरीही डेटाची अॅक्युरेसीही महत्त्वाची आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

19:16 (IST) 3 Mar 2023
“निर्देशांकात तळाला असणाऱ्या जिल्ह्यांसाठी धोरण तयार करणं आवश्यक”

संगणकामुळे आणि डिजिटलायजेशनमुळे आपल्याला डेटा मिळू शकतो. निर्णय घेणं हे जर डेटावर आधारित असेल तर ते अधिक कार्यक्षम करता येतं. आज जो जिल्हा निर्देशांक सादर करतो आहोत. जे जिल्हे आजहीही तळाला आहेत किंवा निर्देशांकात कमी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला धोरण आखावं लागेल असंही मत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

19:14 (IST) 3 Mar 2023
लोकसत्ताचा उत्तम उपक्रम म्हणजे हा जिल्हा निर्देशांक-देवेंद्र फडणवीस

लोकसत्ता जिल्हा निर्देशांक या अतिशय चांगल्या कार्यक्रमात आपल्यात उपस्थित आमचे सहकारी मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, राजीव करंदीकर, गिरीश कुबेर, निरंजन राजाध्यक्ष, उपस्थित अनंत गोयंकाजी, सन्मानीय अतिथी गण आणि बंधू भगिनींनो. मी लोकसत्ता आणि सारस्वत बँकेचे गौतम ठाकूर यांचंं अभिनंदन करेन की एक चांगला उपक्रम समोर आणला.

19:12 (IST) 3 Mar 2023
लोकसत्ता जिल्हा निर्देशांक कार्यक्रम

लोकसत्ताचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.

19:10 (IST) 3 Mar 2023
लोकसत्ताच्या कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती

लोकसत्ता निर्देशांक या कार्यक्रमात दिग्गजांची उपस्थिती

19:08 (IST) 3 Mar 2023
लोकसत्ताच्या कार्यक्रमात दिग्गजांची उपस्थिती

पाहा लोकसत्ताचा विशेष कार्यक्रम

मान्यवरांच्या उपस्थित नव्या सोहळ्याची सुरूवात

18:53 (IST) 3 Mar 2023
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकसत्ताचा उपक्रम

राज्यातील जिल्ह्यांच्या प्रगतीच्या पाऊलखुणांचा मागोवा घेण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे हाती घेण्यात आलेल्या ‘जिल्हा निर्देशांक’ उपक्रमाची सांगता आज (३ मार्च) मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे.

‘लोकसत्ता’तर्फे हाती घेण्यात आलेल्या ‘जिल्हा निर्देशांक’ उपक्रमात विख्यात सांख्यिक आणि गणिती, केंद्रीय सांख्यिकी आयोगाचे प्रमुख राजीव करंदीकर यांचे ‘विकासासाठी विदा महती’ या विषयावर व्याख्यान होत आहे.

18:49 (IST) 3 Mar 2023
विजेत्या जिल्हाधिकाऱ्यांची नावं काय?

श्रीमती पवनीत कौर, जिल्हाधिकारी, अमरावती</p>

पृथ्वीराज बी. पी. जिल्हाधिकारी, लातूर

इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका

मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

डॉ. विबीन इटनकर, जिल्हाधिकारी, नागपूर

अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, नांदेड

रूचेश जयवंशी, जिल्हाधिकारी, सातारा

मनिषा खत्री, जिल्हाधिकारी, नंदुरबार

18:44 (IST) 3 Mar 2023
जिल्हा विकास निर्देशांक २०२२ सोहळ्याला सुरूवात

जिल्हा विकास निर्देशांक सोहळ्याला थाटात सुरूवात झाली आहे. जिल्हा निर्देशांक महत्त्वाचा कार्यक्रम आहे असं मनोगत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी व्यक्त केलं आहे. जिल्हा स्तर आणि राज्य स्तरावर एक नवा विमर्श तयार होईल असंही सीताराम कुंटे यांनी म्हटलं आहे.

18:37 (IST) 3 Mar 2023
लोकसत्ता जिल्हा निर्देशांक कार्यक्रमाला सुरूवात

लोकसत्ता जिल्हा निर्देशांक कार्यक्रमाला सुरूवात. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं भाषण सुरू