सॉफ्ट कॉर्नर व एलआयसीच्या सहकार्याने सुरू असणाऱ्या ‘लोकसत्ता-लोकांकिका’च्या विभागीय अंतिम फेरीत गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागाची ‘मसणातलं सोनं’ ही एकांकिका औरंगाबाद केंद्रातून प्रथम आली. विद्यापीठाच्या संगीत विभागाची ‘जाहला सोहळा अनुपम’ व ‘तिच्यासाठी वाट्टेल ते’ या देवगिरी महाविद्यालयाच्या एकांकिकांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला. ज्येष्ठ नाटय़कर्मी माधव वझे, वसंत दातार व रोहित देशमुख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
येथील संत एकनाथ रंगमंदिरात सकाळी साडेनऊ वाजता विभागीय अंतिम फेरीचे उद्घाटन झाले. विद्यापीठाच्या संगीत विभागाची ‘जाहला सोहळा अनुपम’ ही एकांकिका सादर झाली आणि स्पर्धेचा दर्जा किती उंचीवरचा आहे, हे उपस्थितांनी अनुभवले. ‘मृत्यू’ या विषयाभोवती रंगलेले नाटय़ वेगळ्या धाटणीने सादर केल्याने या एकांकिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर देवगिरी महाविद्यालयाने ‘तिच्यासाठी वाट्टेल ते’ ही एकांकिका सादर केली. अर्थात, प्रेक्षकांची उत्कंठा क्षणाक्षणाला वाढविणाऱ्या ‘मसणातलं सोनं’ या (पान महाप्रदेश पाहा)
वैयक्तिक पारितोषिकांचे मानकरी
सवरेत्कृष्ट दिग्दर्शक व अभिनय- रावबा गजमल (‘मसणातलं सोनं’), अभिनय- सिद्धेश्वर थोरात (‘जाहला सोहळा अनुपम’), लेखन- अनिलकुमार साळवे (‘तिच्यासाठी वाट्टेल ते’),  संगीत- भरत जाधव (‘मसणातलं सोनं’), नेपथ्य- रवी बारवाल (‘जाहला सोहळा अनुपम’), मंगेश तुसे व यशपाल गुमलाडू (‘तिच्यासाठी वाट्टेल ते’), प्रकाशयोजना- मंगेश भिसे (‘मसणातलं सोनं’ )

 

Story img Loader