‘सॉफ्ट कॉर्नर’ व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने आयोजित ‘लोकसत्ता-लोकांकिका’च्या विभागीय अंतिम फेरीत शुक्रवारी नागपुरातील एलएडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘बोल मंटो’ने नागपूर विभागातून प्रथम क्रमांक पटकावला. शिवाजी सायन्स महाविद्यालयाची ‘त्या वळणावर’ व चक्रपाणी योग निसर्गोपचार महाविद्यालयाच्या ‘मिडिया’ या एकांकिकांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. ज्येष्ठ नाटय़कर्मी प्रसाद वनरसे, रुपाली मोरे-कोंडावार, श्रीपाद जोशी यांनी परीक्षक म्हणून काम केले.
लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात सकाळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार यांच्या हस्ते या फेरीचे उद्घाटन झाले. उमरेड येथील ज्योतिराव फुले ऑफ सोशल वर्क महाविद्यालयाची ‘पोशिंदा’ या एकांकिकेने स्पध्रेला सुरुवात झाली. त्यानंतर अमरावतीच्या शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयाने ‘काउंटर अटॅक’, चक्रपाणी योग निसर्गोपचार महाविद्यालयाची ‘मीडिया’, शिवाजी सायन्स महाविद्यालयाची ‘त्या वळणावर’ आणि शेवटी एलएडी महाविद्यालयाने ‘बोल मंटो’ ही एकांकिका सादर केली. बक्षीस वितरण सोहोळ्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, वेकोलीचे वरिष्ठ व्यवस्थापक आशीष तयाल, रेशीमबंध मॅरेज ब्युरोच्या संचालिका कविता देशपांडे, नाथे पब्लिकेशनचे मंगेश नाथे उपस्थित होते.

*सवरेत्कृष्ट नाटक प्रथम- ‘बोल मंटो’
*सवरेत्कृष्ट नाटक द्वितीय- ‘त्या वळणावर’
*सवरेत्कृष्ट नाटक तृतीय- ‘मिडिया’
*सवरेत्कृष्ट अभिनय- काजल काटे (बोल मंटो)
*सवरेत्कृष्ट अभिनय- मानसी जोशी (त्या वळणावर)
*सवरेत्कृष्ट दिग्दर्शन- अपूर्वा कुळकर्णी (बोल मंटो)
*सवरेत्कृष्ट लेखन- सांची जीवने (बोल मंटो)
*सवरेत्कृष्ट प्रकाशयोजना- चेतना वाडवे, पुष्पा पांडे (बोल मंटो)
*सवरेत्कृष्ट नेपथ्य- मिथिलेश जोशी (त्या वळणावर)
*सवरेत्कृष्ट संगीत- दिव्यानी अनमोलकर (बोल मंटो)

Story img Loader