‘आहाराद्वारे आरोग्य’ ही संकल्पना वाढीस लागल्याच्या काळात घराघरांतील ‘शेफ’ मंडळी स्वयंपाक करताना खास विचार करू लागली आहेत. खाणे, खिलवणे आणि त्याबरोबर आरोग्याची काळजी घेणे यात रुची असलेल्या प्रत्येकासाठी ‘लोकसत्ता’तर्फे ‘पूर्णब्रह्म’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ‘पूर्णब्रह्म पाककला स्पर्धे’चेही आयोजन करण्यात आले आहे. १८, १९ आणि २४ जानेवारी रोजी ही स्पर्धा अनुक्रमे ठाणे, पुणे आणि मुंबई येथे होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८ जानेवारी रोजी ठाणे येथील चेक नाक्याजवळ असलेल्या ‘हॉटेल टिपटॉप प्लाझा’ येथे ही स्पर्धा होणार असून या वेळी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत रत्नमालाची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांची मुख्य पाहुण्या आणि परीक्षक म्हणून उपस्थिती लाभणार आहे. निवेदिता यांचे पाककलेवरील प्रेम आणि अभिनयप्रेम या दोन्हीबद्दल त्यांच्याकडूनच जाणून घेण्याची संधी या वेळी उपस्थितांना मिळणार आहे. या प्रसंगी ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या आरोग्यपूरक आहार विशेषांकाचेही प्रकाशन होणार आहे. आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार आरोग्यदायी आहार, शरीराला पोषक ठरणाऱ्या आणि हल्ली लोकप्रिय होत चाललेल्या भरडधान्यांचे पदार्थ आणि पौष्टिक रानभाज्या अशी तिहेरी मेजवानी या अंकात वाचकांना वाचायला मिळणार आहे.

पुण्यात स्पर्धा १९ जानेवारी रोजी डेक्कनवरील आपटे सभागृहात सायंकाळी ५.४५ वाजता होणार असून या कार्यक्रमात परीक्षक म्हणून डॉ. अपूर्वा संगोराम आणि ‘मधुरा रेसिपीज’ च्या मधुरा बाचल उपस्थित राहणार आहेत. तसेच २४ जानेवारी रोजी मुंबईत विले पार्ले पूर्व येथे ‘लोकमान्य सेवा संघ, पार्ले’ येथे सायंकाळी ६ वाजता ही स्पर्धा घेतली जाणार आहे.

‘भरडधान्यांचे नावीन्यपूर्ण पदार्थ’ असा ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म पाककला स्पर्धे’चा विषय आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, वरई ही भरडधान्ये आपल्याकडे पूर्वापार वापरली जातात. आता राळा, कोदो, सामा, सावा ही भरडधान्येही मिळू लागली आहेत. स्पर्धकांनी यातील कोणत्याही भरडधान्यापासून एक पौष्टिक व नावीन्यपूर्ण पदार्थ स्पर्धेत मांडायचा आहे. हा पदार्थ तिखट वा गोड कोणत्याही प्रकारचा चालेल, तसेच हा पदार्थ स्पर्धकांनी घरूनच करून आणायचा आहे. एका स्पर्धकाला एकच पदार्थ स्पर्धेत मांडता येईल. या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही. स्पर्धेच्या वेळेआधी कार्यक्रमस्थळीच नावनोंदणी करून स्पर्धकांना प्रवेश दिला जाईल.

टायटल पार्टनर : पितांबरी रूचियाना फुड डिव्हिजन
सहप्रायोजक : अंजुमन- ए – इस्लाम, मेसर्स बी.जी.चितळे डेअरी आणि श्री धुतपापेश्वर लिमिटेड
पॉवर्ड बाय : केसरी टुर्स, ब्रह्मविद्या साधक संघ आणि व्ही.पी.बेडेकर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड

लोकसत्ता पूर्णब्रह्म पाककला स्पर्धा’कुठे व कधी?
ठाणे : १८ जानेवारी, हॉटेल टिपटॉप प्लाझा, सायंकाळी ६ वाजता
पुणे : १९ जानेवारी, गो. ल. आपटे सभागृह, सायंकाळी ५.४५ वाजता
विलेपार्ले : २४ जानेवारी, लोकमान्य सेवा संघ, पार्ले, सायंकाळी ६ वाजता

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta purnabrahm cooking competition for home cooks chef amy
Show comments