महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भायखळा येथे विज्ञान प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज (१४ जानेवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी शास्त्रज्ञांचा आदर करा, असं विद्यार्थ्यांना आवाहन करताना राजकीय टोलेबाजीही केली आहे.

राज ठाकरे म्हणाले, संजय नाईक यांनी विज्ञान प्रकल्प स्पर्धेचं आयोजन केलंय असं समजल्यावर मला धक्काच बसला. पण नंतर त्यांनी या कार्यक्रमातील इतर मंडळीही दाखवली. मग माझा विश्वास बसला. पोरितोषिक स्वीकारताना मुलांमधील उत्साह क्रिकेट मॅचवेळेला पारितोषिके मिळतात त्यासारखा होता. विज्ञान विषयात पारितोषिके मिळवून विद्यार्थी उड्या मारत आहेत, हे पाहून मलाही आश्चर्य वाटलं.

raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024 (1)
Raj Thackeray: “निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील”, राज ठाकरेंचं सूचक विधान; नेमकं राज्यात काय घडणार आहे?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Raj Thackeray
Raj Thackeray in Nashik : “निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray bhivandi
Raj Thackeray Health Update : “माझी प्रकृती नाजूक…”, राज ठाकरेंनी दोन मिनिटांत आटोपलं भाषण!
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान राहिले आहेत, कारण..”
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”

विज्ञानाचा भुका मी कधीच नव्हतो

“शाळेपासून मी ज्ञानाचा भुका होतो. पण विज्ञानाचा कधीच नव्हतो. विज्ञानातील माझे मार्क पाहता आज मला इथे का उभं केलंय असा अनेकांना प्रश्न पडेल”, अशी मिश्किल टीप्पणीही त्यांनी केली. “रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रातून काय करायचं असतं? इथूनच पुढे जात नाहीत, कोणता शोध लावणार आम्ही? पण, हे विज्ञानशास्त्र इतकी मोठी गोष्ट आहे की ते कल्पनेच्या बाहेरच्या जगातलं आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> “अजितदादांचे घड्याळ कधीच…” महायुतीच्या मेळाव्यात नरहरी झिरवाळांचं विधान

गरज ही शोधाची जननी

“विज्ञान कसं येतं, याचा कोणालाच पत्ता लागत नाही. कोणत्याही प्रकारचा शोध हा इच्छेने किंवा गरजेने लागला आहे. गरज ही शोधाची जननी आहे. अशा अनेक गरजांमध्ये, इच्छांमधून शोध लागले. मला आज एवढंच सांगायचं आहे की शास्त्रज्ञांचा आदर राखणं गरजेचं आहे. जगभरातील शास्त्रज्ञांनी जे निर्माण करून ठेवलंय, याची आपल्याला कल्पना नाही. सहज आपल्या आजूबाजूला नजर टाकली तरी शोध म्हणजे काय हे लक्षात येईल. आपल्या लक्षात येत नाही, आपण सहज त्या वातावरणात मश्गुल होतो”, असंही राज ठाकरे म्हणाले.

शास्त्रज्ञांनी अनेक चमत्कार घडवले

“मोबाईल फोनचा शोध कोणी लावला कल्पना आहे का? मुळात टेलिफोनचा शोध, मग मोबाईलचा फोन, टेलिव्हिजनचा शोध, एअर कंडिशनचा शोध, दिव्याचा शोध कोणी लावला? प्रत्येक गोष्टीचा शोध कसा लागला, त्यामागचं शास्त्र काय आहे, विज्ञान काय आहे. या सगळ्या आयुधांमुळे पुढे जाता, हे कोणी केलंय हे माहीत नाही. इतक्या शास्त्रज्ञांनी इतके चमत्कार घडवले, पण मी कधी त्यांचे होर्डिंग्स नाही पाहिले”, असंही राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> “कोणत्याही एका राजकीय पक्षनिष्ठेच्या जाळ्यात न अडकता…”, शिंदे गटात प्रवेश करताच मिलिंद देवरा यांचे समर्थकांना खुलं पत्र

शास्त्रज्ञांनी आता भरभरून दिलंय

“शास्त्रज्ञ जगाला दोन्ही हाताने भरभरून देत असतात. अनेकांचे त्यात प्राणही गेले आहेत. विज्ञान म्हटलं की फक्त रॉकेट सुटतं. पण अनेकांचे शोध लागलेले असतात. आपल्या पदरात काय गोष्टी पडल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे. त्यांचे आभार मानले पाहिजेत, असंही राज ठाकरे म्हणाले.

“ठराविक संपादक, ठराविक काही राजकीय पुढारी असतात. सकळपासून ते चॅनेलवर बोलायला सुरुवात करात. त्यांना असं वाटतं की त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं. पण काही कळत नसतं, पण कॅमेरा समोर आला की बोलायला लागतं. त्याप्रमाणे मला काही सगळ्यातलं सगळं कळत नाही. शास्त्रातले पंडित येथे बसलेले आहेत, त्यामुळे मी फार बोलणार नाहीत”, अशी अप्रत्यक्ष टीकाही राज ठाकरे यांनी केली.