बंगल्याच्या पिछाडीच्या दारातून आत शिरून शस्त्राचा धाक दाखवत घरातील लोकांचे हातपाय बांधून लुटण्याचा प्रकार सांगलीतील दत्तनगरमध्ये शुक्रवारी पहाटे घडला. सुमारे सात लाखाचा ऐवज लंपास झाला असून दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.

हेही वाचा- “शीशीशी, नारायण राणेंकडे आम्ही…”, आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली; म्हणाले…

कर्नाळ रस्त्यावर असलेल्या दत्तनगर परिसरामध्ये आशिष चिंचवाडे यांचा बंगला आहे. आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागे असलेल्या दरवाजातून प्रवेश केला. घरातील लोकांना घातक हत्याराची धमकी देत हातपाय बांधून लूट केली. चिंचवाडे यांच्या आईच्या गळ्यातील सव्वा आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने, कपाटात ठेवण्यात आलेली १०० ग्रॅम चांदी व दोन लाखांची रोकड असा ऐवज लंपास केला. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे . या चोरीनंतर सांगली शहर पोलिसांनी तीन पथक रवाना केली असून त्या पथकाद्वारे चोट्यांचा माग काढला जात आहे . घटनास्थळी पोलीस अधीक्षक बसवराज तेली, उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली. या चोरीचा तपास जलद गतीने करण्याच्या सूचनाही पोलीस अधीक्षकांनी शहर पोलिसांना दिल्या आहेत.

हेही वाचा- “दिशा सालियन प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांनी खोटी माहिती दिली”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप; म्हणाले, “सोमवारी फडणवीसांविरोधात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या घरात चोरी झाली त्या घरातील लोकांकडून माहिती घेऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाच ते सहा जणांनी घराच्या मागील बाजूच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील झोपलेल्या लोकांना उठवून घातक हत्यारांचा धाक दाखवला. कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर त्यांचे हातपाय बांधले. मग घरातील चार लाखांचे सोन्या चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले अशी फिर्याद कुटूंबाकडून देण्यात आली आहे.