पुण्यातल्या एका कार्यक्रमात शुक्रवारी चंद्रकांत पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरून नवा वाद पेटणार हे वाटतच होतं. कारण त्यांचं वक्तव्यच तसं होतं. आपला एकही देव बॅचलर नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. तसंच एकही महापुरूष बॅचलर नाही संसारात राहूनही सगळं काही करता येतं असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांना आता जितेंद्र आव्हाड यांनी खास आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.

काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी?

आपला एकही देव बॅचलर नाही असं चंद्रकांतदादांनी म्हणताच इंद्रलोकात भुवया उंचावल्या आणि सगळ्यांनी मारुतीकडे पाहण्यास सुरूवात केली आणि मारुतीला चंद्रकांत पाटील यांचं म्हणं ऐकवलं. मारुतीने निर्णय घेतला आहे की लवकरच चंद्रकांतदादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत की नाही यावर सविस्तर चर्चा करणार. संसार करून पण सगळं करता येतं असं महापुरुष आणि देवांना उद्देशून चंद्रकांत दादांनी म्हटलं आहे. त्यावर आता रामदास स्वामी काय उत्तर देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. असं खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

चंद्रकांत पाटील यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

आपला कुठलाही देव बॅचलर नाही आपले कुठलेही महापुरूष बॅचलर नाहीत. संसार करून सगळं करता येतं. सेवाही करता येते.जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याचं रक्त हिरवं किंवा निळं आहे. देवाने माणसाला घडवताना कुठलाही भेद केला नाही. सगळ्यांना सारखंच बनवून पाठवलं. सगळ्यांना दोन कान, दोन डोळे आणि समान शरीर देवाने दिलं आहे.
माणसाचा जन्म हा स्पर्मपासून होतो. स्पर्म कुणाला दिसत नाही तो स्पर्म १०० किलोचा माणूस तयार करतो. तो माणूस कसा आहे हे ठरवतो. त्या स्पर्ममधून माणूस निर्माण करणारा कुणीतरी आहे ना? सगळी माणसं त्याने बनवली आहेत. इंग्रज आले आणि आपली संस्कृती बदली. आईला मम्मी आणि वडिलांना पप्पा म्हणायाला लागलो. आपली संस्कृती विसरलो.

आपल्या जगात तीन संस्कृती आहेत


मुघलांनी आपल्या देवांवर हल्ले केले. मात्र आक्रमणापासून वाचवण्यासाठी त्यांच्या मुलीही लपवल्या. मुघलांनी मुलींचा चेहरा कुणी पाहू नये म्हणून घुंगट आणले. पण आता तिला बाहेर काढा. तिला शिकू द्या. आपल्या जगात तीन संस्कृती आहेत. एक सांगते बापाला मारा, दुसरी सांगते तू तुझा विचार कर दुसऱ्याचा विचार सोडून दे, तिसरी आपली हिंदू संस्कृती आहे जी सांगते तू आधी दुसऱ्याला मोठं कर हिंदू शब्दावर आक्षेप असेल तर भारतीय म्हणा पण ही संस्कृती दुसऱ्याला मोठं करणारी आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. आता कुठलाच देव बॅचलर नव्हता या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड यांनी खास शैलीत समाचार घेतला आहे.