समाजात नेहमीच त्रृतीयपंथीयांना हिणवल्या जातं. मात्र, बीडमध्ये याच तृतीयपंथीयाशी विवाह करण्यासाठी एक तरुण पुढे आलाय. मागील अडीच वर्षांपासून किन्नर सपना आणि बाळू प्रेमाच्या नात्यात (रिलेशनशिप) आहेत. आता त्यांनी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विवाह करण्याचा निर्णय घेतलाय. पाहुयात नेमकी कशी आहे या दोघांची अनोखी प्रेम कहाणी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीड शहरात वास्तव्यास असणारे बाळू आणि सपना मागील अडीच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अडीच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु समाजात आजही हा विवाह करण्यास अनेक अडथळे आहेत. समाजातून होणाऱ्या विरोधाला झुगारून या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

“अडीच वर्ष लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर संसाराचा निर्णय”

बाळू धुताडमल हा जागरण गोंधळात हलगी वाजवून आपला उदरनिर्वाह करतो. अशातच त्याची ओळख सपनाशी झाली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झालं आणि तब्बल अडीच वर्ष लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहून त्यांनी आपला संसार फुलवण्याचा निर्णय घेतलाय. रुसव्या फुग्यातून या दोघांच्या प्रेमाची गोडी अधिक घट्ट झालीय. समाजात आजही या घटकाला स्वीकारण्यासाठी नाकं मुरडली जातात. त्यामुळे लग्न करण्याचा पेच या जोडप्या समोर निर्माण झाला आणि चर्चेतून मार्ग काढून अखेर विवाह जुळवण्याचा निर्णय बीडच्या पत्रकार संघाने घेतला.

हेही वाचा : Valentine’s Day: हिंदू-मुस्लीम असल्याने लग्नाला झाला विरोध पण…; पुणेकर जोडप्याची फिल्मी स्टाइल खरीखुरी लव्हस्टोरी

याआधी मनमाडमध्ये किन्नर शिवलक्ष्मी आणि संजय झाल्टे हे विवाह बंधनात अडकले होते. या विवाहानंतर मराठवाड्यातील हा पहिला विवाह होणार आहे. या घटकाला देखील समाजात मान सन्मान देण्यात यावा, अशी भावना व्यक्त केली जातेय. त्यामुळे स्वतःहून जर असे विवाह इच्छुक असतील, तर त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचं असल्याचं मत बीड पत्रकार संघाने व्यक्त केलंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love marriage of transgender sapana and balu in beed after 2 years live in relationship pbs