अरबी समुद्रात कोकण किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. सदर विशिष्टकालिक हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे कोकण व गोवा या हवामान उपविभागामध्ये दि. २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान तुरळक ठिकाणी अती मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, असे ग्रामीण कृषी मौसम सेवा मुळदे यांनी अंदाज व्यक्त केला आहे.
हेही वाचा – सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
हा अंदाज अखिल भारतीय हवामान सारांश आणि हवामान अंदाज पत्रानुसार व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यालगत मध्यपूर्व अरबी समुद्रावर समुद्रसपाटीपासून सरासरी ३.१ किमी उंचीवर एक कमी दाबाचे क्षेत्र (चक्रीय परिवलन) आहे. सदर कमी दाबाचे क्षेत्र नैऋत्येकडे झुकत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सदर विशिष्टकालिक हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे कोकण व गोवा या हवामान उपविभागमध्ये २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान तूरळक ठिकाणी अती मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे यांनी व्यक्त केला आहे.
© The Indian Express (P) Ltd