LPG Gas Cylinder Price Hike : आज १ मार्च अर्थात महिन्याचा पहिला दिवस. मात्र, महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का बसला आहे. आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर ६ रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी आता १८०३ रुपये मोजावे लागणार आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आल्यामुळे याचा फटका छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बसणार आहे.

दरम्यान, तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी भारतातील सर्व शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता १,७९७ रुपयांवरून १,८०३ रुपयांवर पोहोचली आहे, म्हणजे प्रति सिलेंडर ६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच १४.२ किलो घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आलेले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली असली तर घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे तुर्तास तरी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर कसे असणार?

१ मार्च रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशातील विविध शहरात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत किती असणार? याविषयी माहिती जाणून घेऊयात.
दिल्ली : १,८०३ रुपये
मुंबई : १,७५५
कोलकाता : १,९१३
चेन्नई : १,९६५

दरम्यान, आज १ मार्च २०२५ पासून आता हे नवे दर लागू होणार आहेत. आता नव्या दरानुसार मुंबईत सिलेंडरची किंमत १,७४९.५० रुपयांवरून १,७५५ रुपये झाली आहे. कोलकात्यात हा दर १,९०७ रुपयांवरून १,९१३ रुपयांवर गेला आहे. चेन्नईमध्ये सिलिंडरची किंमत आता १,९५९.५० रुपयांऐवजी १,९६५ रुपये असणार आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आल्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना याचा फटका बसणार आहे.

Story img Loader