पंढरपूर : मावळ येथील भाविक लक्झरी बसने पंढरपूरकडे येत असताना समोरून मालवाहतूक करणारा ट्रक सोमर आला. आणि दोन्ही गाड्यांची समोरासमोर जोरात धडक झाली. यात बस मधील २ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर ६ जन जखमी झाले आहेत. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

पंढरपूर शहरापासून जवळ असलेल्या भटुंबरे गावत रविवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. मावळ येथील काही भाविक दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले होते. पंढरपूर टेंभुर्णी रस्त्यावरील आणि शहरच्या जवळ हा अपघात झाला. भाविकांची बस ( क्र.एम.एच. १४ एल.एस.३९५५ ) चा पंढरपूरीच्या दिशेने जात होती. या बसने एका गाडीला ओव्हरटेक करत असताना समोरून मालवाहतूक ट्रक ( क्रमांक आर जे १४ जी एल १७८० ) आली. मात्र बस चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे ट्रक आणि लक्झरी बस समोरासमोर जोरात धडक झाली. यात दोन्ही गाड्यांचा पुढचा भाग चक्काचूर झाल्याचे दिसून आले.

anjali Damania
Anjali Damania : “मी गणपतीची शपथ घेऊन सांगते, धनंजय मुंंडेंचं राजकारण संपवण्यासाठी…”, बीड प्रकरणात अंजली दमानियांचा दावा
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Manoj Jarange
Manoj Jarange : “तुमचा भाऊ असता तर?”, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेवरून जरांगेंचा सरकारला सवाल
Sushma Andhare prajakta Mali
Sushma Andhare : “प्राजक्ता माळी RSS च्या मुख्यालयात जातात तेव्हाच…”, सुषमा अंधारेंचं विधान चर्चेत!
valmik karad surrendered in pune
Walmik Karad: “वाल्मिक कराडचा शेवटचा कॉल पुण्याचा होता, याचा अर्थ…”, अंजली दमानियांचा मोठा दावा; सरपंच हत्येप्रकरणी भाष्य
31 December Marathi Panchang
३१ डिसेंबर पंचांग: वर्षाच्या शेवटच्या दिवशी होईल अनपेक्षित लाभ, बाप्पाच्या कृपेने समस्या होतील दूर; वाचा १२ राशींचे मंगळवारचे भविष्य
Bharat Gogawale
Bharat Gogawale : “…अन्यथा आमच्या सरकारवर ठपका पडेल”, मंत्री भरत गोगावलेंचं बीडच्या सरपंच हत्या प्रकरणावरून मोठं विधान

हेही वाचा >>>Sudhir Mungantiwar : “आयुष्यात काहीक्षण धुकं येतं, पण…”, सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक विधान

यात बस मधील २ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ भाविक जखमी झाले. या परिसरातील नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवून पोलिसाना माहिती दिली .जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हालविण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने अपघाताच्या ठिकाणी पोहचले. या बाबत चौकशी सुरु असल्याचे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वय.मुजावर यांनी माहिती दिली. दोन्ही वाहनांचा अपघात झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.पहाटेच्या वेळी वाहन चालकाने सावधगिरीने वाहने चालवावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.

Story img Loader