सध्या नागपूरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवरूनही सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान, प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी विधानसभेत दमदार भाषण केलं. राज्यात शांतता ठेवायची असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज प्रकाश आंबेडकर यांनाच मुख्यमंत्री केलं पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

आम्ही आठ वर्षे मराठा मुख्यमंत्र्याला दिली. पण त्यांनी मराठ्यांना काहीच दिलं नाही, असा आरोप बच्चू कडूंनी आपल्या भाषणात केला. शिवाय राज्यात दलित, माळी किंवा तेली समाजाचेही मुख्यमंत्री व्हायला हवेत, अशी मागणीही त्यांनी केली.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”

विधानसभेत केलेल्या भाषणात बच्चू कडू म्हणाले, “राज्यात शांतता ठेवायची असेल तर पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज प्रकाश आंबेडकर यांनाच मुख्यमंत्री केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या देशाला घटना दिली, त्यांच्या वंशजासाठी आपण किमान एवढं तरी केलं पाहिजे. अशा पद्धतीने पुढे जायला काय हरकत आहे.”

हेही वाचा- मनोज जरांगेंच्या मागणीवर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया; म्हणाली, “मला यावर…”

“प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री झाले तर राज्यात शांतता राहील. हे मी मुद्दाम विधानसभेत बोलत आहे. पण असं करायला आपली काय हरकत आहे. दलित मुख्यमंत्री का होऊ नये? माळी किंवा तेली मुख्यमंत्री का होऊ नये? दलित, माळी किंवा तेली समाजाचाही मुख्यमंत्री झाला पाहिजे. आम्ही आठ वर्षे मराठा मुख्यमंत्र्याला दिले. पण त्यांनी मराठ्यांना काहीच दिलं नाही,” असंही बच्चू कडूंनी नमूद केलं.

Story img Loader