सोलापूर : सोलापूर राखीव आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्जांची शनिवारी छाननी झाली. माढ्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उत्पन्नाचे स्रोत न दाखविल्याचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या उमेदवारी अर्जावर एका अपक्ष उमेदवाराने हरकत घेतली होती. परंतु निवडणूक अधिका-यांनी ही हरकत फेटाळत मोहिते-पाटील यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला.

माढ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील आणि भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात चुरशीची झुंज अपेक्षित आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवार नंदू मोरे यांनी मोहिते-पाटील यांच्या अर्जाला हरकत घेतली होती. मोहिते-पाटील यांनी दिलेल्या शपथपत्रात त्यांचे उत्पन्नाचे स्रोत नमूद केले नाही, असा हरकतीचा मुद्दा होता. त्यावर निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर यांच्यासमोर सुनावणी झाली. परंतु सुनावणीअंती ही हरकत फेटाळण्यात आली.

shrikant shinde
कल्याणमध्ये महेश गायकवाड यांच्याकडून खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाची बॅनरबाजी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
women given special discounts by builders in thane
ठाण्यात बिल्डरांकडूनही लाडक्या बहिणींना विशेष सवलत; यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांचे स्टॉल
competition between Ashok Chavan and Pratap Patil Chikhlikar over party defection
अशोक चव्हाण – चिखलीकरांमध्ये पक्षांतरावरून स्पर्धा
chaturang article on revolutionary tone of Indian womens liberation
भारतीय स्त्रीमुक्तीचा क्रांतिकारी सूर
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती

हेही वाचा : ‘सत्ता खूप वाईट, नंतर कुणी चहा सुद्धा पाजत नाही’, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत

सोलापूर राखीव मतदारसंघात ४१ तर माढा मतदारसंघात एकूण ४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांच्या छाननीच्यावेळी सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या अर्जाला अपक्ष उमेदवार सचिन म्हस्के यांनी हरकत घेतली. प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांचे कलम नमूद केले नाही. तर दुसरे अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांनी, प्रणिती शिंदे यांच्या अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती असल्याची हरकत घेतली आहे. त्यांच्या जातीच्या दाखल्याबाबतही हरकत घेण्यात आली आहे.

हेही वाचा : ‘हो, मी आदित्यला…’, उद्धव ठाकरेंच्या त्या दाव्यावर फडणवीस स्पष्टच म्हणाले, “मला वेड..”

भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. सातपुते यांच्या जातीचा दाखला बनावट असल्याचा आक्षेप घेतला आहे. दुसरे अपक्ष उमेदवार भारत कंदकुरे यांनी जातीच्या दाखल्यावर राम सातपुते यांच्या अर्जाला हरकत घेतली आहे. सातपुते यांचे जात वैधता प्रमाणपत्र २०१२ सालचे आहे. त्यांचे अभियांत्रिकी शिक्षण २०१५ मध्ये झाले होते. त्यांनी २०१३ साली वाहने खरेदी केली. ऊसतोड मजुराचा मुलगा असल्याचा दावा करणारे सातपुते यांच्याकडे एवढी वाहने कशी ? तसेच त्यांच्या पत्नी संस्कृती यांच्या नावाने संपत्ती नमूद करताना त्यांच्या नावाने पॕन कार्ड नाही. तर मग त्यांच्या नावाने संपत्ती कशी आली, असा सवाल हरकतीद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. या सर्व हरकतींवर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.

हेही वाचा : रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक: छाननीत सात उमेदवारी अर्ज अवैध, २१ उमेदवार निवडणूक रिंगणात

दरम्यान, माढ्यात आपल्या उमेदवारी अर्जावरील हरकत फेटाळली गेल्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला. प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधीच विरोधक रडीचा डाव खेळत आहेत, दोन हात होऊन जाऊ द्या, आपण तर तयार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader