अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेशासाठी धनगर समाजाने आंदोलन तीव्र केले असताना आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी आदिवासींसाठी असलेले आरक्षण सातवरून १५ टक्के करण्याची मागणी केली आहे. येथील परशुराम साईखेडकर नाटय़गृहात रविवारी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित मेळाव्यात बोलताना पिचड यांनी लहान स्वरूपात आदिवासी जिल्ह्यांची निर्मिती करण्यात यावी असा आग्रह धरला.
धनगर समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाविषयी थेट प्रतिक्रिया व्यक्त न करता पिचड यांनी आपला कोणालाही विरोध नसल्याचे नमूद केले. कोणाला पुरणपोळी द्यायची असेल तर ती द्या, परंतु आमची भाकरी हिसकाविण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा दिला. आपण शिवीगाळ केल्याचा आणि बनावट आदिवासी असल्याचा आरोप पाचपुतेंनी केला. परंतु आफण जर बनावट आदिवासी असतो तर, सातत्याने विधानसभेत निवडून गेलो नसतो. पाचपुते यांनी तर आदिवासी समाजाशी बेईमानी केली आहे. त्यांना ही बेईमानी शोभत नाही, असा आरोपही पिचड यांनी केला. दरम्यान, या मेळाव्यापूर्वी इगतपुरी तालुक्याती मुंढेगाव येथे आदिवासी विकास विभागातर्फे इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य या आश्रमशाळेचे उद्घाटन पिचड यांच्या हस्ते झाले.
यावेळी त्यांनी खासगी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा आदिवासी विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास मंडळाने प्रयत्न केले असल्याचे नमूद केले. या आश्रमशाळा केवळ शिक्षणकेंद्र न बनता आदिवासींच्या विकासाचे केंद्र बनविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केले.
आदिवासींसाठी १५ टक्के आरक्षण करावे- मधुकर पिचड
अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेशासाठी धनगर समाजाने आंदोलन तीव्र केले असताना आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी आदिवासींसाठी असलेले आरक्षण सातवरून १५ टक्के करण्याची मागणी केली आहे.
आणखी वाचा
First published on: 25-08-2014 at 02:26 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhukar pichad demands 15 percent reservation for tribals