धनगर समाजाचा आदिवासींच्या आरक्षणात समावेश करण्यास आदिवासी समाजाचा तीव्र विरोध असून आदिवासींच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार उदासिनता दर्शविणार असेल तर मुंबई शहराचा पाणी पुरवठा धरणातून बंद करण्यात येईल असा इशारा माजीमंत्री मधुकर पिचड यांनी दिला. येथील अखिल भारतीय विकास परिषदेच्यावतीने महाकवी कालिदास कला मंदिरात शुक्रवारी आदिवासी समाजाचा प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

Story img Loader