महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६२ संभाजीनगर प्रभागातील चुरशीच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद करीत अपक्ष उमेदवार माधुरी किरण नकाते यांनी रविवारी झालेल्या मतमोजणीत विजय प्राप्त केला. नकाते यांना १६०९ इतकी मते पडली. निकटचे प्रतिस्पर्धी स्वाती सासने यांचा त्यांनी २८६ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे प्रभागाच्या दिवंगत नगरसेविका बराले यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनसुराज्यशक्ती पक्षाकडून लढणाऱ्या त्यांच्या सासू शशिकला बराले या बाजी मारणार अशी शक्यता वर्तवली जात असताना नकाते यांनी विजयाची नोंद केली आहे.
महापालिकेच्या माजी शिक्षण मंडळ सभापती आशा बराले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी हे मतदान घेण्यात आले होते. येत्या सव्वा वर्षांसाठी हे नगरसेवकपद राहणार आहे. या प्रभागातून एकूण चार उमेदवार निवडणूक िरगणात उतरले होते. यामध्ये जनसुराज्यकडून शशिकला यशवंत बराले, शिवसेनेकडून संस्कृती तुषार देसाई, तर अपक्ष म्हणून स्वाती अजित सासने व माधुरी किरण नकाते िरगणात उतरल्या होत्या. या प्रभागासाठी चुरशीने ६६.३८ टक्के मतदान झाले होते. यामध्ये माधुरी नकाते यांना १६०९, स्वाती सासने यांना १३२३, शशिकला बराले यांना ७६१, संस्कृती देसाई यांना १६० मते मिळाली आहेत. तर एकूण मतदानापकी २३    मते ‘नोटा’ ला मिळाली  आहेत. यंदाची पोटनिवडणूक ही आगामी निवडणुकांची रंगीत तालीम असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत खरी लढत शशिकला बराले आणि संकृती देसाई यांच्यात असल्याचे बोलले जात होते. तसेच शिवसेना, भाजप यांचे वातावरण असल्याने या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार संस्कृती देसाई यांनी विजयावर दावा सांगितला होता. मात्र या निवडणुकीत शिवसेनेला केवळ १६० मतांवरच समाधान मानावे लागले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.
 
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा