Maharashtra Bus Accident in MP: मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून १३ प्रवाशांता मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. बचावकार्य व्यवस्थित पार पाडावं व जखमींवर उपचारासाठी मध्यप्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क साधला आणि सहकार्यासाठी विनंती केली. यादरम्यान त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट करत माहिती दिली आहे. “मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये बस बुडून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य परिवहन महामंडळाला दिले आहेत”.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Marijuana worth Rs 115 crore seized from Mumbai airport in three months
मुंबई विमानतळावरून तीन महिन्यात ११५ कोटींचा गांजा जप्त
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?

MP Bus Accident: महाराष्ट्राच्या एसटीला मध्यप्रदेशात भीषण अपघात; १३ ठार

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसंच राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या आहेतत. बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे.

नेमकं काय झालं?

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. जळगावच्या अंमळनेरकडे निघालेली ही बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील धार येथे हा अपघात झाला आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ –

अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र एसटी मंडळाची (MH40 N9848) होती. बस सकाळी ७.३० वाजता धार येथून अंमळनेरकडे निघाली होती. खलघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून मृतांची ओळख पटवली जात आहे.

Story img Loader