पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून महा रक्तदान अभियान हाती घेण्यात आले असून या अभियानामध्ये एक लाख बाटल्या रक्त संकलित करण्यात येणार असल्याची माहिती डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. देशातील हे सर्वात मोठे रक्तदान अभियान असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 देशाच्या सीमांचे रक्षण करणारे सैनिक आणि थैईलीसिमयाग्रस्त मुलांच्यासाठी या रक्तदान अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.18 मे रोजी या महा रक्तदान यात्रेचा शुभारंभ कराड ते पुणे अशी भव्य दुचाकी रॅली काढून पुणे येथील सैनिकी इस्पितळ येथे प्राथमिक रक्तदान करून करण्यात येणार आहे. या रॅलीत दोन हेलिकॉप्टर देखील सहभागी असणार आहेत असे पैलवान पाटील यांनी सांगितले.  सदरची महा रक्तदान यात्रा सुमारे दीडशे ते दोनशे दिवस सांगली जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे,यामध्ये प्रत्येक गावातून दररोज रक्त संकलन करण्यात येणार आहे, त्याचबरोबर दररोज पुण्याच्या सैनिकी इस्पितळामध्ये देखील जाऊन रक्तदाते रक्तदान करतील याचे नियोजन करण्यात आले आहे.या रक्तदान यात्रेसाठी जिल्ह्यातल्या सामाजिक संस्था आणि प्रशासन यांची मदत घेण्यात येणार आहे. देश सेवा करणार्‍यांसाठी, देश सेवेचा हा उपक्रम असून या अभियानात रक्तदान करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha blood donation campaign through pailwan chandrahar patil youth foundation zws
Show comments