अभिनेता संजय दत्त याच्यासह अन्य दोषी कैदेत असलेल्या पुण्यातील येरवडा कारागृहात सुरक्षेच्यादृष्टिने ५५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, हेराफिरी करून आणलेली कोणतीही वस्तू कारागृहाच्या आवारात जाऊ नये, यासाठी बॅगेज स्कॅनरही बसविण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
आमदार विनायक निम्हण आणि इतरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पाटील यांनी राज्यातील कारागृहांच्या सुरक्षेसाठी सरकारने योजलेल्या उपायांची माहिती विधानसभेमध्ये दिली. येरवडाप्रमाणेच मुंबई आणि नवी मुंबईतील कारागृहातही सुरक्षेच्यादृष्टीने विविध उपाय योजण्यात आले आहेत. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि बॅगेज स्कॅनर बसविण्यात आले आहे. राज्यातील या तीन कारागृहांत २३२ सीसीटीव्ही कॅमेर बसविण्यात आले आहेत.
कारागृह प्रशासनातील ५६३ रिक्त जागा २०१५च्या आत भरण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader