वाई:महाबळेश्वर व जोर येथे मागील पाच दिवसात सर्वाधिक विक्रमी पावसाची नोंद झाली आहे . महाबळेश्वर, प्रतापगड, तापोळा, चिंचवड, जोर, जांभळी येथे पावसाची संततधार सुरूच आहे. महाबळेश्वर जोर येथे मागील पाच दिवसात एक हजार मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जोरदार वारे, पाऊस, धुके आणि गारठ्याने महाबळेश्वर येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सांगली: पावसाची संततधार सुरुच; चांदोलीत ७० टक्के पाणीसाठा

सध्या महाबळेश्वर येथे पावसाळी पर्यटनाने जोर धरला आहे. दाट धुके, हवेतील गारठा, जंगलात उतरणारे ढग पावसाचा अनुभव पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वर येथे पर्यटक ही अनोख्या निसर्गाचा अनुभव घेत आहेत. शनिवारी महाबळेश्वर येथे १६४ मिमी ,एकूण २७३६.७० (१०७.७४४ इंच) जोर १४७ मिमी(२९४१ मिमी) प्रतापगड १३५ मिमी(२४५९ मिमी) जांभळी ४२मिमी (१५७६ मिमी ) पावसाची नोंद झाली आहे. या पावसाच्या पाण्याने कोयना ,धोम व बलकवडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. महाबळेश्वर पाचगणी ला पाणीपुरवठा करणारा वेण्णा लेक भरून वाहत असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून वेण्णा लेक मधील बोटिंग बंद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> अजित पवारांकडून बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “केवळ त्यांच्याबरोबर…”

आज रविवारी ही दिवसभर पाऊस सुरू असून पावसाचा जोर वाढला आहे. पसरणी घाट व महाबळेश्वर येथील धबधबे ओसंडून वाहत आहेत. शनिवार रविवार सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी आले होते. गार गार वातावरणातही पर्यटक घोडेसवारी गरमागरम भजी मक्याचे कणीस आल्याचा चहा चा अनुभव घेत आहेत.वेण्णा लेक मधील बोटिंग बंद करण्यात आदरणीय पर्यटक नाराज आहेत.आज भिलार(ता महाबळेश्वर) गावातील विशाल शिवाजी  पिलावरे यांच्या घरावर मोठे झाड पडुन त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे.  कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.घावरी ते येरणे(ता महाबळेश्वर) रस्ता दरड बाजूला करून मोकळा करण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahabaleshwar and jor in satara recorded highest rainfall in the last five days zws