वाई : महाबळेश्वर पाचगणीचा दिवाळी पर्यटक हंगाम सुरू झाला असून, सर्वत्र पर्यटकांची गर्दी दिसत आहे. सुट्या, लवकर आलेली थंडी यामुळे सहलींची मजा दुणावल्याचे जाणवत आहे.

दिवाळी पाडव्यापासूनच दिवसापासून या पर्यटक महाबळेश्वरला गर्दी करतात. यंदाही महाराष्ट्रासह गुजरातमधून पर्यटक गटागटाने आले आहेत. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा तलाव असो की, येथील विविध पॉइंट सर्वत्रच या गर्दीने हे नंदनवन फुलून गेले आहे. महाबळेश्वर प्रसिद्ध विविध फळांचे जेम, जेली, सिरप, चिक्की, फज तसेच, कातडी चप्पल, बूट व कातडी चीज वस्तू तसेच विविध प्रकारच्या चीज वस्तू आपल्या लाडक्यांसाठी खरेदी करण्यासाठी दिवसभर व रात्री येथील बाजारपेठही येथे आलेल्या दिवाळी पाहुण्यांनी बहरलेली आहे. विविध पॉईंट फिरून फिरण्याचा शीण घालवण्यासाठी पर्यटकांनी येथील विविध ठिकाणच्या आइस गोळा गाड्या, पॅटिस, वडा, कचोरीच्या गाड्यांभोवतीही गर्दी दिसते. ही गर्दी पुढील आठ-दहा दिवस कायम राहील, असे स्थानिकांनी सांगितले.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
The murder of a minor girl will be tried in a fast track court thane news
अल्पवयीन मुलीचे हत्याप्रकरण जलदगती न्यायालयात चालणार

आणखी वाचा-चंद्रपूरच्या प्रदूषणात वाढ; दिवाळीतील आतषबाजी आणि औद्योगिक प्रदूषणही कारणीभूत

पाचगणी टेबल लॅन्ड, तेथील गुहा आणि सर्व पॉइंटवर गर्दी होत आहे. चणे, फुटाणे, चिक्की खरेदीसाठी गर्दी आहे. रात्री बाजारपेठेत मस्त शॉपिंगचा आनंद पर्यटक घेत आहेत. या दिवाळी हंगामात पर्यटकांसाठी पालिकेने त्याचे रे गार्डन येथील वाहनतळ विनामोबदला पर्यटकांसाठी खुले केल्याने पर्यटकांत समाधानाचे वातावरण आहे. पाचगणीहून महाबळेश्वरकडे येणारा रस्ता तसेच महाबळेश्वरमधील सर्वच रस्त्यांची अवस्था गंभीर असल्याने वाहनधारक स्थानिकांसह पर्यटकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. किल्ले प्रतापगडलाही पर्यटक भेट देत आहेत. यावर्षी दिवाळी हंगामासाठी पालिका प्रशासनाने पर्यटकांच्या स्वागताची मोठी तयारी केली असल्याचे महाबळेश्वरचे मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश पाटील आणि पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखील जाधव यांनी सांगितले.

Story img Loader