सातारा : पांचगणी पालिका हद्दीत विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूल विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये उत्खननासाठी वापरण्यात आलेले जेसीबी व ट्रॅक्टर ही वाहने जप्त केली.

किरण धनंजय सालने व प्राजक्ता प्रसाद हसबनीस  पांचगणी (ता महाबळेश्वर)यांच्या मिळकतीतील  विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूल विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये उत्खननासाठी वापरण्यात आलेले जेसिबी व ट्रॅक्टर ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. या मिळकतीमध्ये पंचनामा करताना शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अनमोल कांबळे रा पांचगणी व त्याचे सहकारी यांच्यावर पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी पत्रकारांना दिली.

Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
deportation action against criminals is on paper only
पुणे : तडीपारीची कारवाई कागदावरच; तडीपार गुन्हेगारांचा सर्रासपणे शहरात वावर
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
anti-ragging rules, non-compliance of anti-ragging rules, National Medical Commission,
रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा वैद्यकीय महाविद्यालयांना इशारा
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
kala lake, Kalyan, Indurani Jakhad, contractor Notice,
कल्याण : काळा तलाव साफसफाईत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची कारवाई

हेही वाचा >>>Santosh Deshmukh Murder : अजित पवारांचं संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य; “सिव्हिल सर्जन म्हणाला, पोस्टमॉर्टेम करताना आजवर इतकी वाईट…”

त्यानंतर कांबळे यांनी समाज माध्यमावर प्रशासनाची बदनामी केली व त्याच जागी सूर्यास्तानंतर पुन्हा उत्खनन चालू केले. यानंतर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी थेट जागेवर जाऊन धडक कारवाई करत उत्खनन करताना पोकलेन मशीन व ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली.  सध्या ही वाहने पांचगणी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये तहसिलदार तेजस्विनी पाटील यांना क्षेत्रीय महसूल अधिकारी रुपेश शिंदे,मंडलाधिकारी पाचगणी सागर शिंदे,ग्राम महसूल अधिकारी,पाचगणी व कर्मचारी यांच्यासह पाचगणीचे सहा पोलीस निरीक्षक यांनी सहकार्य केले.

हेही वाचा >>>Chhagan Bhujbal : “मग मला निवडणूक लढायला सांगायचं नव्हतं ना?”, छगन भुजबळांचा थेट अजित पवारांवर निशाणा

मौजे भोसे ( ता महाबळेश्वर)येथे नुकतीच विनापरवाना   माती उत्खनन व वाहनावरील दंड असे एकूण रु ८ लाख ४१ हजार ८००ची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी दिली.

महाबळेश्वर तालुका हा पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील तालुका आहे. कोणत्याही जागेमध्ये विकसनाचे काम करीत असताना तहसील कार्यालयाकडे परवानगीबाबत रीतसर अर्ज करावा. विनापरवाना व बेकायदेशीरपणे कोणीही उत्खनन अथवा गौणखनिजाची वाहतूक करू नये. गौणखनिज उत्खननाबाबत या कार्यालयाकडून कोणत्याही रकमेची मागणी केली जात नाही,  कोणी व्यक्ती अथवा त्रयस्थ व्यक्ती मागणी करीत असेल तर या कार्यालयाचे तात्काळ निदर्शनास आणावे.- तेजस्विनी पाटील,तहसीलदार.

Story img Loader