सातारा: महाबळेश्वर येथील लॉडविक पॉईंट परिसरात गुरुवारी सायंकाळी एकाने चारशे फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली. संजय वेलजी रुघानी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
गुरुवारी सायंकाळी लॉडविक पॉईंट येथे पर्यटकांची मोठी गर्दी होती. नवदाम्पत्य व परदेशी पर्यटक या पॉइंटवर पर्यटनाचा आनंद घेत होते. याच वेळी रुघानी यांनी आपल्या जवळपास कुणीही नसल्याचा अंदाज घेत त्यांनी थेट स्वतःला दरीमध्ये झोकून देऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती स्थानिक व्यवसायिकांनी पोलिसांना दिली. यानंतर घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह काही गिर्यारोहकही लगोलग हजर झाले. यानंतर गिर्यारोहकांच्या मदतीने तब्बल सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर रुघानी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
हेही वाचा – सोलापुरात माथाडींच्या आंदोलनामुळे ५० हजार क्विंटल कांदा वाहनांमध्ये पडून
हेही वाचा – सोलापूर : बार्शीजवळ मोटारीची धडक बसून दुचाकीवरील महिलेसह दोघांचा मृत्यू
मृत रुघानी (सध्या रा पांचगणी, मूळ शांती नगर मिरा रोड, मुंबई ) हे हॉटेल व प्रवासी वाहानांच्या बुकिंगचा व्यवसाय करत होते. त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रौफ इनामदार करत आहेत.