महाड औद्योगिक वसाहतीतल्या ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत शुक्रवारी भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात एकूण ११ जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. एनडीआरएफची पथकं घटनास्थळी दाखल झाली असून अद्याप शुक्रवारी रात्रभर शोधकार्य चालू होतं. आज सकाळपर्यंत सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आलं आहे. मात्र, अद्याप ४ जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट घेऊन अपघात प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्योगमंत्र्यांनी केली घटनास्थळाची पाहणी

उद्योगमंत्री उदय सामंत पहाटे साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. तसेच, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन देखील केलं.

अपघाताच्या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश आपण दिल्याचं यावेळी उदय सामंत यानी सांगितलं. चौकशीनंतर अपघातामागचं कारण स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.

महाडमध्ये आगीत सात जखमी, ११ बेपत्ता; एमआयडीसीतील दुर्घटना

महाडमध्ये NDRF चा बेसकॅम्प

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू, असं आश्वासन यावेळी उदय सामंत यांनी दिलं. महाडमध्ये NDRF च्या कॅम्पची उभारणी करण्याच्या प्रस्तावाला तत्वत: मंजुरी मिळाली असून त्यासाठीही राज्य सरकारकडून पाठपुरावा केला जाईल. त्यामुळे भविष्यात पुण्याहून एनडीआरएफचं पथक बोलावण्याची वेळ येणार नाही, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahad midc blast case ndrf search operation on uday samant orders inquiry pmw