Mahadev Jankar On Chhagan Bhujbal : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राज्यात भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन करण्यात आली. मात्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलं नाही. यानंतर भुजबळांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत हा ओबीसी समाजावर अन्याय असल्याची बोलून दाखवली. यानंतर छगन भुजबळ आगामी काळात वेगळी भूमिका घेऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यादरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भुजबळांनी राजकीय पक्ष काढावा असा सल्ला दिला आहे.

महादेव जानकर नेमकं काय म्हणाले?

छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न महादेव जाणकर यांनी विचारण्यात आला, यावर बोलताना म्हणाले की, “या ओबीसींची अशीच अवस्था होणार आहे. जिस समाज का दल है उस समाज का बल है. आपण अन्याय झाला असं आता म्हणू शकणार नाही. कारण आपला पक्षच तयार पाहिजे होता. आपला पक्ष नाही. आपण इथे याचिकाकर्ता, मागतकरी आहोत. देणारे बणानार असाल… तर आम्ही आमचं दल तयार केलं पाहिजे. आम्ही त्यांना सांगितलं होतं की समता परिषदेचा एखादा पक्ष काढा आम्ही तुमच्याबरोबर युती करू, पण भुजबळांनी त्यासंबंधी निर्णय घेतला तर फार चांगलं होईल, अशी माझी त्यांना विनंती आहे. आताच नाही तर पुढच्या येणार्‍या पिढ्यांचं तरी चांगलं होईल” असेही जाणकर म्हणाले. ते टीव्ही९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
Loksatta readers reactions on lokrang article
पडसाद : दबंग, पण सहृदयी अधिकारी
Chhagan Bhujbal On Amit Shah
Chhagan Bhujbal : अमित शाहांबरोबर आज राजकीय चर्चा झाली का? भुजबळांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले, “एवढी चर्चा…”
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? स्वतः सैफनेच पोलिसांना सांगितलं; जबाबात म्हणाला, “मी हल्लेखोराला…”
Mira Road, Bangladesh nationals arrested ,
सैफ प्रकरणानंतर बांगलादेशींची धरपकड सुरू, मिरा रोडमधून ३ बांगलादेशी नागरिकांना अटक

हेही वाचा >> Video: पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची बेफाम ड्रायव्हिंग, थेट कीर्तन यात्रेत घुसवली थार; संतप्त जमावानं लाखोंची कार फोडली!

ईव्हीएममध्ये १०० टक्के घोळ

लोकसभा निवडणुकीत नाही पण विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा दावादेखील जानकर यांनी यावेळी केला. तिसऱ्या पक्षांची मते भाजपाकडे वळवण्यात आल्याचा आरोप करत जानकर म्हणाले की, “विधानसभेच्या निवडणुकीत १०० टक्के ईव्हीएमने घोळ केला आहे. तुमचं सरकार आणि तुमचं विकासाचं काम एवढं चांगलं आहे तर मग बॅलेटवर निवडणूक घ्या. आमचा पराभव झाला तर मान्य करू. महाविकास आघडी आणि एनडीए या दोघातच दाखवलं, तिसर्‍या पक्षाची सगळी मते भाजपाकडे वळवली हा माझा दावा आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाची अशी स्पष्ट मागणी आहे की ईव्हीएम बंद करा आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्या”, असेही जाणकर यावेळी म्हणाले.

Story img Loader