गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी अनेकदा उपोषण आणि आंदोलनही केली. मात्र, राज्य सरकारने अद्याप त्यांच्या मागणीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला ओबीसींनी विरोध केल्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापलेला आहे.

आता विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर २८८ उमेदवार निवडणुकीत उभे करण्याबाबत मनोज जरांगे यांनी अनेकदा सूचक विधानं केली आहेत. याचसंदर्भात बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना खोचक टोला लगावला आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणूक महायुती बरोबर लढणार की नाही? याबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मनोज जरांगे पाटील यांनी बाहेर राहून बंदूक चालवण्यापेक्षा निवडणुकीत उतरलं पाहिजे”, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : Manoj Jarange On Maharashtra Politics : गुप्त बैठकांच्या चर्चांवर मनोज जरांगेंचं मोठं विधान; म्हणाले, “राजकारणात काही गोष्टी…”

महादेव जानकर काय म्हणाले?

“विधानसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप काही ठरलेलं नाही. सध्या राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे. महायुतीमध्ये सहभागी होत असतना मीच सांगितलं होतं की, आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करायची नाही. कारण आपल्या कार्यकर्त्यांची ताकद किती आहे? हे आम्हाला त्यावरून कळतं. युतीत असलं की मग त्याच पक्षांच्या जीवावर चालावं लागतं आणि आपल्या पक्षांचे कार्यकर्तेही असा विचार करतात की युती आहे मग नको जास्त लक्ष द्यायला. त्यामुळे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणाबरोबर युती करणार नाहीत. मात्र, लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकीत आम्ही युती करायला तयार असतो”, असं महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं.

मनोज जरांगेंना सल्ला

महादेव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना मराठा आणि ओबीसी आरक्षणच्या मुद्यावरही भाष्य केलं. तसेच मनोज जरांगे यांनाही एक राजकीय सल्ला जानकरांनी दिला. ते म्हणाले, “बाहेर राहून बंदूक चालवण्यापेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उतरलं पाहिजे. ते निवडणुकीत उतरले तर मी त्यांचं स्वागत करेन. आपण काही म्हणण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा त्यामध्ये उतरलं पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे”, असं महादेव जानकर यांनी म्हटलं.